Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 573
ऋषिः - द्वित आप्त्यः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - उष्णिक्
स्वरः - ऋषभः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
0
प्र꣡ पु꣢ना꣣ना꣡य꣢ वे꣣ध꣢से꣣ सो꣡मा꣢य꣣ व꣡च꣢ उच्यते । भृ꣣तिं꣡ न भ꣢꣯रा म꣣ति꣡भि꣢र्जु꣣जो꣡ष꣢ते ॥५७३॥
स्वर सहित पद पाठप्र꣢ । पु꣣नाना꣡य꣢ । वे꣣ध꣡से꣢ । सो꣡मा꣢꣯य । व꣡चः꣢꣯ । उ꣣च्यते । भृति꣢म् । न । भ꣣र । मति꣡भिः꣢ । जु꣣जो꣡ष꣢ते ॥५७३॥
स्वर रहित मन्त्र
प्र पुनानाय वेधसे सोमाय वच उच्यते । भृतिं न भरा मतिभिर्जुजोषते ॥५७३॥
स्वर रहित पद पाठ
प्र । पुनानाय । वेधसे । सोमाय । वचः । उच्यते । भृतिम् । न । भर । मतिभिः । जुजोषते ॥५७३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 573
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 10;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 10;
Acknowledgment
विषय - परमेश्वराप्रत मनुष्याचे कर्तव्य
शब्दार्थ -
(पुनानाय) उपासकाचे हृदय पवित्र करणाऱ्या (वेधसे) आनंद-देणाऱ्या (सोमाय) रस-भांडार परमेश्वराप्रत (वचः) धन्यवादाचे वचन (प्र उच्यते) आम्हा उपासकांद्वारे म्हणले जात आहेत. हे मित्रा, तुम्हीदेखील (मतिभिः) आपल्या बुद्धीद्वारे (जुजोषते) तुम्हाला तृप्त करणाऱ्या परमेश्वराला (भृतिंन) वेतनाच्या रूपाने वा उपहार-रूपाने काही देणाऱ्याला जसे कोणी धन्यवाद देता, तद्वत त्या परमेश्वराला तुम्ही धन्यवादाचे वचन (भर) प्रदान करा. म्हणजे जसे तुमचे काही कार्य करणाऱ्याला तुम्ही मोबदला म्हणून उपहार वा वेतन देता, तसेच उत्तम बुद्धी देणाऱ्या परमात्म्याला तुम्ही धन्यवाद द्या (त्याचे उपकार माना)।।८।।
भावार्थ - जो परमेश्वर सन्मति दान करून आम्हांवर उपकार करतो, त्याच्याविषयी आम्ही कृतज्ञता का बरे व्यक्त करू नये? (अर्थात अवश्य व्यक्त करावी ।।८।।
विशेष -
या मंत्रात ‘भृति न भर’मधे उत्प्रेक्षा अलंकार आहे.।।८।।