Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 669
ऋषिः - विश्वामित्रो गाथिनः
देवता - इन्द्राग्नी
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
0
इ꣡न्द्रा꣢ग्नी꣣ आ꣡ ग꣢तꣳ सु꣣तं꣢ गी꣣र्भि꣢꣫र्न꣣भो व꣡रे꣢ण्यम् । अ꣣स्य꣡ पा꣢तं धि꣣ये꣢षि꣣ता꣢ ॥६६९॥
स्वर सहित पद पाठइ꣡न्द्रा꣢꣯ग्नी । इ꣡न्द्र꣢꣯ । अ꣣ग्नीइ꣡ति꣢ । आ । ग꣣तम् । सुत꣢म् । गी꣣र्भिः꣢ । न꣡भः꣢꣯ । व꣡रेण्य꣢꣯म् । अ꣣स्य꣢ । पा꣣तम् । धिया꣢ । इ꣣षि꣢ता ॥६६९॥
स्वर रहित मन्त्र
इन्द्राग्नी आ गतꣳ सुतं गीर्भिर्नभो वरेण्यम् । अस्य पातं धियेषिता ॥६६९॥
स्वर रहित पद पाठ
इन्द्राग्नी । इन्द्र । अग्नीइति । आ । गतम् । सुतम् । गीर्भिः । नभः । वरेण्यम् । अस्य । पातम् । धिया । इषिता ॥६६९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 669
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 7; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 2; सूक्त » 4; मन्त्र » 1
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 7; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 2; सूक्त » 4; मन्त्र » 1
Acknowledgment
विषय - प्रथम मंत्रात इन्द्राग्नी नवीन जीवात्म्याचे तसेच मनाला आवाहन केले आहे. इन्द्र शब्दाचा अर्थ आत्मा आहे, हे सर्वज्ञात आहे. अग्नी शब्दाचा अर्थ होतो व मन यात प्रमाण शतपथ ब्राह्मण १०/१/२/३।। तिथे म्हटले आहे. अग्निश्च मन: ।।
शब्दार्थ -
साधक म्हणतो हे (इन्द्राग्नी) माझ्या अंत:करणा आणि हे मना, तुम्ही दोघे (--) गुरूजनांच्या वाणीतून (सुतम्) व्यक्त होणाऱ्या आणि (नभ:) सुर्याप्रमाणे प्रकाशमान व (वरेण्यम्) वरणीय श्रेष्ठ ज्ञानरस ग्रहण करण्यासाठक्ष (आगतय्) या (रे मना, गुरू जे सांगताहेत, ते लक्ष देऊन ऐका) (इषिता) ज्ञान ग्रहण कार्यात तत्पर व प्रयत्नशील होऊन तुम्ही दोघे (धिया) बुद्धीद्वारे (अस्य) या गृहीत ज्ञानाचे (पातम्) रक्षण करा. (गुरूने जे ज्ञान दिले, ते स्मरणात जपून ठेवा, विसरू नका) ।।१।।
भावार्थ - वाणीचा स्वामी गुरू, शिष्याला जे ज्ञान सांगत आहे, शिष्याने ते ज्ञान काळजीपूर्वक ऐकून आपल्या मन, आत्मा आणि बुद्धीमध्ये साठवून ठेवावे. त्यावर मनन करावे, त्या ज्ञानाचा प्रचार करावा. तसेच त्यानुसार स्वत: आचरण करावे आणि इतरांकडूनही करवून घ्यावे. ।।१।।
विशेष -
या मंत्रात नभ: याचा सुर्याप्रमाणे प्रकाशमान असा अर्थ होत असल्यामुळे वाचकधर्म लुप्तोपमा अलंकार झाला आहे. ।।१।।