Loading...
अथर्ववेद > काण्ड 10 > सूक्त 7

काण्ड के आधार पर मन्त्र चुनें

  • अथर्ववेद का मुख्य पृष्ठ
  • अथर्ववेद - काण्ड 10/ सूक्त 7/ मन्त्र 20
    सूक्त - अथर्वा, क्षुद्रः देवता - स्कन्धः, आत्मा छन्दः - उपरिष्टाज्ज्योतिर्जगती सूक्तम् - सर्वाधारवर्णन सूक्त

    यस्मा॒दृचो॑ अ॒पात॑क्ष॒न्यजु॒र्यस्मा॑द॒पाक॑षन्। सामा॑नि॒ यस्य॒ लोमा॑न्यथर्वाङ्गि॒रसो॒ मुखं॑ स्क॒म्भं तं ब्रू॑हि कत॒मः स्वि॑दे॒व सः ॥

    स्वर सहित पद पाठ

    यस्मा॑त् । ऋच॑: । अ॒प॒ऽअत॑क्षन् । यजु॑: । यस्मा॑त् । अ॒प॒ऽअक॑षन् । सामा॑नि । यस्य॑ । लोमा॑नि । अ॒थ॒र्व॒ऽअ॒ङ्गि॒रस॑: । मुख॑म् । स्क॒म्भम् । तम् । ब्रू॒हि॒ । क॒त॒म: । स्वि॒त् । ए॒व । स: ॥७.२०॥


    स्वर रहित मन्त्र

    यस्मादृचो अपातक्षन्यजुर्यस्मादपाकषन्। सामानि यस्य लोमान्यथर्वाङ्गिरसो मुखं स्कम्भं तं ब्रूहि कतमः स्विदेव सः ॥

    स्वर रहित पद पाठ

    यस्मात् । ऋच: । अपऽअतक्षन् । यजु: । यस्मात् । अपऽअकषन् । सामानि । यस्य । लोमानि । अथर्वऽअङ्गिरस: । मुखम् । स्कम्भम् । तम् । ब्रूहि । कतम: । स्वित् । एव । स: ॥७.२०॥

    अथर्ववेद - काण्ड » 10; सूक्त » 7; मन्त्र » 20

    व्याख्यान -
    भाषार्थ : प्रथम ईश्वराला नमस्कार करून व प्रार्थना करून वेदाच्या उत्पत्तीचा विषय लिहिला जात आहे. वेद कुणी उत्पन्न केलेले आहेत? (तस्मात् यज्ञात्स.) सत् ज्याचा कधी नाश होत नाही, चित् जो सदैव ज्ञानरूप असून, ज्याच्यात अज्ञानाचा लवलेशही नसतो, जो सदैव आनंदमय व सुखस्वरूप असून, सर्वांना सुख देणारा असतो. या लक्षणांनी युक्त पुरुष सर्वत्र व्याप्त आहे, परिपूर्ण आहे. जो सर्व माणसांनी उपासना करण्यायोग्य इष्टदेव व सर्व सामर्थ्याने युक्त आहे. त्याच परब्रह्मापासून (ऋच:) ऋग्वेद, (यजु:) यजुर्वेद, (सामानि) सामवेद व (छन्दांसि) अथर्ववेद हे चार वेद उत्पन्न झालेले आहेत. त्यासाठी सर्व माणसांनी वेदांचे ग्रहण करावे व वेदोक्त रीतीने आचरण करावे. ‘जज्ञिरे’ व ‘अजायत’ या दोन क्रियांच्या अधिकतेमुळे वेद अनेक विद्यांनी युक्त आहेत, असे म्हटले जाते, तसेच ‘तस्मात्’ ही दोन पदे अधिक असल्यामुळे हे निश्चित जाणले पाहिजे, की ईश्वरापासूनच वेद निर्माण झालेले आहेत. एखाद्या माणसापासून नव्हे. वेदात सर्व मंत्र गायत्री इत्यादी छंदांनीच युक्त आहेत. त्यामुळे ‘छन्दांसि’ या पदाने अथर्ववेदाच्या उत्पत्तीवर प्रकाश पडतो. शतपथ इत्यादी ब्राह्मण व वेदमंत्रांच्या प्रमाणाने हे सिद्ध होते, की यज्ञ शब्दाने विष्णू व विष्णू शब्दाने सर्वव्यापक परमेश्वराचे ग्रहण होते. कारण सर्व जगाची उत्पत्ती करणारा परमेश्वरच आहे, इतर कोणी नाही. ॥१॥ (यस्मादृचो अपा.) जो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. त्याच्यापासूनच (ऋच:) ऋग्वेद, (यजु:) यजुर्वेद, (सामानि) सामवेद व (आङ्गिरस:) अथर्ववेद, हे चारही वेद उत्पन्न झालेले आहेत. याच प्रकारे रूपकालंकाराने वेदाची उत्पत्ती ईश्वरच करतो. अथर्ववेद माझ्या मुखाप्रमाणे, सामवेद लोमाप्रमाणे, यजुर्वेद हृदयाप्रमाणे व ऋग्वेद प्राणाप्रमाणे आहे. (ब्रूहि कतम: स्विदेव स:) चारही वेद ज्याच्याद्वारे उत्पन्न झालेले आहेत, तो कोणता देव आहे? ते मला सांगा. या प्रश्नाचे उत्तर असे आहे, की (स्कम्भंतं.) जो सर्व जगाचा धारणकर्ता परमेश्वर आहे, त्याचे नाव स्कम्भ आहे. त्यालाच तुम्ही वेदांचा कर्ता जाणा व हेही जाणा, की त्याला सोडून माणसांनी उपासना करण्यायोग्य दुसरा कोणी इष्टदेव नाही. असा दुर्दैवी मनुष्य कोण असेल जो वेदकर्त्या सर्वशक्तिमान परमेश्वराला सोडून दुसऱ्याला परमेश्वर मानून उपासना करील? ॥२॥ (एवं वा अरेऽस्य.) महाविद्वान महर्षी याज्ञवल्क्यांनी आपल्या पंडिता पत्नी मैत्रेयीला उपदेश केलेला आहे, की हे मैत्रेयी! जो आकाशापेक्षा मोठा परमेश्वर आहे त्याच्यापासनूच ऋक्, यजु:, साम व अथर्व, हे चार वेद उत्पन्न झालेले आहेत. जसा माणसाच्या शरीरातून श्वास बाहेर जातो व पुन्हा आत जातो त्याच प्रकारे सृष्टीच्या आरंभी ईश्वर वेद उत्पन्न करून जगात प्रकाश पसरवतो. प्रलयामध्ये वेद नसतात; परंतु त्याच्या ज्ञानात ते सदैव असतात. बीजांकुराप्रमाणे असतात. जसे बीजात अंकुर, प्रथमच असतो, तोच वृक्षरूप बनून बीजात असतो, याच प्रकारे वेद हे ईश्वराच्या ज्ञानात सदैव असतात. त्यांचा कधी नाश होत नाही. कारण ती ईश्वराची विद्या आहे, त्यामुळे ती नित्य आहे, हे जाणावे. ॥३॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top