साइडबार
ऋग्वेद - मण्डल 9/ सूक्त 114/ मन्त्र 4
यत्ते॑ राजञ्छृ॒तं ह॒विस्तेन॑ सोमा॒भि र॑क्ष नः । अ॒रा॒ती॒वा मा न॑स्तारी॒न्मो च॑ न॒: किं च॒नाम॑म॒दिन्द्रा॑येन्दो॒ परि॑ स्रव ॥
स्वर सहित पद पाठयत् । ते॒ । रा॒ज॒न् । शृ॒तम् । ह॒विः । तेन॑ । सो॒म॒ । अ॒भि । र॒क्ष॒ । नः॒ । अ॒रा॒ति॒ऽवा । मा । नः॒ । ता॒री॒त् । मो इति॑ । च॒ । नः॒ । किम् । च॒न । आ॒म॒म॒त् । इन्द्रा॑य । इ॒न्दो॒ इति॑ । परि॑ । स्र॒व॒ ॥
स्वर रहित मन्त्र
यत्ते राजञ्छृतं हविस्तेन सोमाभि रक्ष नः । अरातीवा मा नस्तारीन्मो च न: किं चनाममदिन्द्रायेन्दो परि स्रव ॥
स्वर रहित पद पाठयत् । ते । राजन् । शृतम् । हविः । तेन । सोम । अभि । रक्ष । नः । अरातिऽवा । मा । नः । तारीत् । मो इति । च । नः । किम् । चन । आममत् । इन्द्राय । इन्दो इति । परि । स्रव ॥ ९.११४.४
ऋग्वेद - मण्डल » 9; सूक्त » 114; मन्त्र » 4
अष्टक » 7; अध्याय » 5; वर्ग » 28; मन्त्र » 4
Acknowledgment
अष्टक » 7; अध्याय » 5; वर्ग » 28; मन्त्र » 4
Acknowledgment
भाष्य भाग
संस्कृत (1)
पदार्थः
(राजन्) हे परमात्मन् ! (ते) तव (यत्, शृतं) यत्परिपक्वं (हविः) ज्ञानरूपफलं (तेन) तद्द्वारा (सोम) हे सर्वोत्पादक परमात्मन् ! (नः) अस्मान् (अभि, रक्ष) अभितः परिपालय (अरातिवा) शत्रुः (नः) अस्मान् (मा, तारीत्) मा पराभूत (च) तथा (नः) अस्माकं (किञ्चन) मोक्षसम्बन्धि किञ्चिदप्यैश्वर्यं (मो, आममत्) न नाशयेत् (इन्दो) हे परमात्मन् ! (इन्द्राय) कर्मयोगिने (परि, स्रव) सुधावृष्टिं करोतु ॥४॥ इति चतुर्दशोत्तरशततमं सूक्तं सप्तमोऽनुवाकः अष्टाविंशतितमो वर्गश्च समाप्तः ॥ इति श्रीमदार्य्यमुनिनोपनिबद्धे ऋक्संहिताभाष्ये सप्तमेऽष्टके नवमं मण्डलं समाप्तम् ॥
हिन्दी (3)
पदार्थ
(राजन्) हे सर्वोपरि विराजमान परमात्मन् ! (ते) तुम्हारा (यत्) जो (शृतम्) परिपक्व (हविः) ज्ञानरूप फल है, (तेन) उसके द्वारा (सोम) हे सर्वोत्पादक परमात्मन् ! (नः) हमारी (अभि, रक्ष) सर्व प्रकार से रक्षा करें। (अरातिवा) शत्रु लोग (नः) हमको (मा, तारीत्) मत सतावें (च) और (नः) हमारे (किञ्चन) मोक्षसम्बन्धी किसी भी ऐश्वर्य को (मो, आममत्) नष्ट न करें। (इन्दो) हे परमात्मन् ! (इन्द्राय) कर्मयोगी के लिये (परि, स्रव) सुधा की वृष्टि करें ॥४॥
भावार्थ
इस मन्त्र में मुक्तिरूपी फल का उपसंहार करते हुए सब विघ्नों की शान्ति के लिये प्रार्थना की गयी है कि हे सर्वरक्षक भगवन् ! वैदिक कर्म तथा वैदिक अनुष्ठान के विरोधी शत्रुओं से हमारी सब प्रकार से रक्षा करें, ताकि वे हमारे किसी अनुष्ठान में विघ्नकारी न हों और अपनी परम कृपा से मोक्षसम्बन्धी ऐश्वर्य हमें प्रदान करें, यह हमारी आपसे सविनय प्रार्थना है ॥४॥ यह ११४ वाँ सूक्त, सातवाँ अनुवाक और अट्ठाईसवाँ वर्ग समाप्त हुआ ॥ यह श्रीमदार्य्यमुनि के द्वारा उपनिबद्ध ऋक्संहिता के भाष्य में सातवें अष्टक में नवम मण्डल समाप्त हुआ ॥
विषय
न वासनाएँ, न रोग
पदार्थ
१. हे (राजन्) = जीवन को दीप्त बनानेवाले (सोम) = सोम ! [वीर्यशक्ते] (यत्) = जो (ते) = तेरे लिए (हवि) = यज्ञशेष के रूप में पवित्र भोजन श्रते परिपक्व किया जाता है, (तेन) = उससे (नः अभिरक्ष) = तू हमारा रक्षण करने वाला हो, यज्ञशेष के रूप में सात्त्विक भोजन से उत्पन्न हुआ हुआ सोम शरीर में सुरक्षित रहता है। और रक्षित हुआ हुआ सोम हमारा रक्षक करता है। २. हे सोम ! (नः) = तेरे से रक्षित हुए हुए हम लोगों को (अरातीवा) = [अरातित्वान्] शत्रुत्व की भावनाओं वाली ये वासनाएँ (मा तारीन्) = मत पराभूत करें। हम इन वासनाओं के शिकार न हों। (उ) = और (नः) = हमें (किंचन) = कुछ भी रोग आदि (मा आममत्) = मत हिंसित करें - हम किन्हीं भी व्याधियों से पीड़ित न हों। इसलिए हे (इन्दो) = सोम ! तू (इन्द्राय) = इस जितेन्द्रिय पुरुष के लिए (परिस्रव) = शरीर में चारों ओर परिस्रुत हो । शरीर में व्याप्त होकर तू वासनाओं व रोगों से हमें बचानेवाला हो ।
भावार्थ
भावार्थ - सात्त्विक याज्ञिक भोजन से उत्पन्न सोम शरीर में सुरक्षित रहता है । यह हमें वासनाओं व रोगों से शिकार नहीं होने देता।
विषय
राजा का कर्तव्य। प्रजा की सब कष्टों से रक्षा।
भावार्थ
हे (राजन्) राजन् ! हे तेजस्विन् ! (यत् ते शृतं हविः) जो तेरा परिपक्व हवि, अन्न और ज्ञान है (तेन नः अभि रक्ष) उससे तू हमारी सब ओर से रक्षा कर (अरातीवा) शत्रु भाव से युक्त जन (नः मा तारीत्) हमारा नाश न करे। (नः किंचन मो आममत्) हमें कुछ भी पदार्थ किसी प्रकार का कष्ट न दे। हे (इन्दो) ऐश्वर्यवन् ! तू (इन्द्राय) ऐश्वर्ययुक्त, समस्त प्रजा को अन्न जल देने वाले मेघ सूर्य आदि के तुल्य तेजस्वी पद के लिये (परि स्रव) आगे बढ़। इत्यष्टाविंशो वर्गः॥ इति सप्तमोऽनुवाकः॥
टिप्पणी
॥ इति पावमानं सौम्यं नवमं मण्डलं समाप्तम्॥ इति श्रीमीमांसातीर्थ-विद्यालंकार विरुदोपशोभित-श्रीपण्डितजयदेवशर्मणा कृते ऋग्वेदस्यालोकभाष्ये नवमं पावमानं सौम्यं मण्डलं समाप्तम्॥
ऋषि | देवता | छन्द | स्वर
कश्यप ऋषिः॥ पवमानः सोमो देवता॥ छन्द:- १, २ विराट् पंक्तिः। ३, ४, पंक्तिः। चतुर्ऋचं सूक्तम्॥
इंग्लिश (1)
Meaning
O Soma, spirit of light and life of the universe, whatever your ripest gifts of knowledge and power, with those, pray, bless and promote us. Let no enemy oppress us. Let none hurt anything of ours. O Indu, spirit of light and bliss, may your presence flow for the soul and promote the life and spirit of humanity.
मराठी (1)
भावार्थ
या मंत्रात मुक्तिरूपी फळाचा उपसंहार करत सर्व विघ्नांच्या शांतीसाठी प्रार्थना केलेली आहे की हे सर्वरक्षक भगवान! वैदिक कर्म व वैदिक अनुष्ठानाच्या विरोधी शत्रूंपासून आमचे सर्व प्रकारे रक्षण कर. ते आमच्या कोणत्या अनुष्ठानात विघ्नकारी नसावेत व तुझ्या परमकृपेने मोक्षासंबंधी ऐश्वर्य आम्हाला दे. ही आमची तुला नम्र प्रार्थना आहे. ॥४॥
टिप्पणी
उपसंहार $ या नवव्या मंडलात १०९७ मंत्र आहेत. सायण इत्यादी भाष्यकार या सर्व मंत्रांचा सोम कुटण्यामध्येच अर्थ लावतात. केवळ सायण इत्यादी स्वदेशी भाष्यकारच नव्हे तर विल्सन, ग्रिफ्थ व मोक्षमूलर इत्यादी युरोपियन भाष्यकारांनी ही बहुतेक सर्व मंत्राचा अर्थ सोम कुटण्याबाबतच लावलेला आहे. युरोपियन भाष्यकारांनी असा अर्थ करण्याचा खेद यासाठी नाही की त्यांनी सायण इत्यादी भाष्यकारांच्या भाष्यावरून अर्थ केलेला आहे. सायणाचार्यानी सर्व मंत्रात अर्थ पुनरुक्ती मानलेली आहे. अर्थात्, एकाच अर्थाचा हे सर्व मंत्र पुनरुच्चारण करतात. हा सायणाचार्याच्या भाष्याचा निष्कर्ष आहे. वेद ईश्वरकृत आहेत हे सायणाचार्याच्या ऋग्वेद भाष्य भूमिकेत स्पष्ट प्रतीत होते. या गोष्टीच्या सिद्धीसाठी ‘‘तस्माद्यज्ञात्सर्वहुत’’ ऋग्. ८।४।१८ या मंत्राचे प्रमाण दिलेले आहे. त्या सर्व पूज्य परमात्म्याकडून वेदाची उत्पत्ती होते, जो संपूर्ण विश्वाचा कर्ता आहे. याच गोष्टीला हिंदूधर्माचे शास्रकार व मोठमोठे भाष्यकार मानत आलेले आहेत. जसे ‘‘शास्त्रयोनित्वात’’ ब्र.सू. १।१।३ यात शंकराचार्यानी वेदाची उत्पत्ती ईश्वराकडून झालेली आहे हे मानलेले आहे व वेदात पुनरुक्ती नाही हेही मानलेले आहे. याचप्रकारे रामानुजाचार्यानीही वेदाचा कर्ता ईश्वरालाच मानलेले आहे. $ ईश्वराने अकराशेच्या जवळजवळ एकाचेच चर्वितचर्वण का केले? त्याला कोणता लाभ झाला? हा प्रश्न पडतो तेव्हा उत्तर मिळते की ईश्वराने हे केलेले नाही. या मंत्रांना सायण इत्यादी भाष्यकारांनी एकाच अर्थाचे प्रतिपादन केलेले आहे. जसे - $ सोमो मीढ्वान्पवते गातुवित्तम ऋषिर्विप्रो विचक्षण : । $ त्वं कविरभवो देववीतम आ सूर्यं रोहयो दिवि ॥ $ या मंत्रात सायणाचार्याने हा अर्थ केलेला आहे की, ‘‘सोम’’ जो सर्व कामनांचा दाता आहे तो (पवते) रसरूप असल्यामुळे वाहतो. तो सर्व गाणाऱ्यांमध्ये उत्तम गाणारा, ऋषि, विप्र विचक्षण-बुद्धिमान व कवी आहे. एवढेच नव्हे तर त्याने आकाशात सूर्य उत्पन्न केलेला आहे ‘‘सोम’’ जो सायणच्या अर्थाप्रमाणे एक प्रकारचे औषध आहे तर कवी, गायक व सूर्याला उत्पन्न करणारा कसा असू शकतो? सोमलतेने सूर्य उत्पन्न केलेला आहे अथवा सोमलता चांगले गाऊ शकते किंवा कवीप्रमाणे चांगले काव्य बनवू शकते. मग हा अनर्थ कसा होऊ शकतो की, सोमलता चांगली गाते व चांगले काव्य बनविते. जर असे म्हटले की हा अर्थवाद आहे, सोमलतेची स्तुती केलेली आहे. तर मग वेदात इतर ठिकाणीही हा अर्थवाद आहे का? असंभव व प्रकृतिविरुद्ध अर्थांचे ग्रंथन केलेले आहे काय? कदापि नाही. $ वेदात हे लिहिलेले आहे ‘‘को अद्धा वेद क इह प्रवो’’ ऋ. ८।७।१७ कोण साक्षात जाणतो? कोण सांगू शकतो की, नाना प्रकारची विचित्र रचना असलेली सृष्टी कुठून झाली? हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर असे की त्या सृष्टीचा स्वामी महदाकाशामध्ये आहे. तोच या तत्त्वाला जाणतो, अन्य नव्हे. दार्शनिक तत्त्वांचे भांडार जी ब्रह्मविद्या आहे, तिचा एकमेव आधार वेद आहे. तो मिथ्यास्तुतीरूपी अर्थवादाचा आधार कधी होऊ शकत नाहीत. या शैलीवरून हे कळून येते की, ‘‘सूय्यचिन्द्रमसौ धाता यथा पूर्वमकल्पयत’’ ऋ. ८।८।४८. जसे या मंत्रात सूर्य, चंद्र इत्यादीचा कर्ता परमात्मा धाता नावाने संबोधला गेला आहे. याच प्रकारे ‘‘सोमो मीढ्वान पवते’’ या मंत्रात ही सोम नाव परमात्म्याचे आहे व त्याचा अर्थ ‘‘सूते चराचरं जगदितिसोम’’ या व्युत्पत्तीने असे जो चराचर जगाला हिरण्यगर्भाच्या अवस्थेत आणतो. अर्थात, प्रकृतीपासून सर्व बीज उत्पन्न करतो. त्याचे नाव येथे ‘‘सोम’’ आहे. येथे हेही लक्षात घेतले पाहिजे की हा शब्द ‘‘सूङ् प्राणिगर्भविमोचने’’ ने बनतो. त्याचा अर्थ प्राण्यांचे गर्भाद्वारे उत्पन्न होणे असा आहे व जो ‘‘सोम’’ शब्द ‘‘पुत्र अभिषवे’’ ने बनतो त्याचा अर्थ सोमलता असा होतो. येथे ‘सोम’ शब्दाचा अर्थ ईश्वर असा आहे. कारण सूर्याला उत्पन्न करणारा कवी, सर्वज्ञ इत्यादी चैतन्याच्या गुणाचा एखादा चेतन पदार्थच होऊ शकतो, जड नाही. $ याचा अर्थाच्या पुष्टीसाठी हे प्रमाण आहे की, ‘‘यो देवानां नामधा एक एव तं सं प्रश्नं भुवना यं त्यन्या’’ ऋग्. १०।८२।३ या मंत्रात सर्व दिव्य वस्तूंचे नाव धारण करणारा एक तोच परमात्मा मानलेला आहे. त्यासाठी ज्या प्रकारे अग्नी, इंद्र व वरुण इत्यादी परमेश्वराची नावे आहेत. याचप्रकारे सोमही परमेश्वराचे नाव आहे. ज्याच्या पुष्टीसाठी हे प्रमाण आहे - $ इन्द्रं मित्रं वरुणमग्निमाहुरथो दिव्य: स सुपर्णो गरुत्मान् । $ एकं सद्विप्रा बहुधा वदन्त्यग्निं यमं मातरिश्वानमाहु: ॥ $ ऋ. १।१६४।४६ $ ‘गरुत्मान’ शब्दाचा अर्थ महत्त्वपूर्ण पदार्थ असे कथन करताना वेद परमात्मा असा ही अर्थ करतो. प्राकृत पुरुषांना बोधन करण्याचा हा प्रकार आहे. कारण परमेश्वर महान आहे व महत्त्वपूर्ण पदार्थांच्या नावामुळे त्याचे बोधन चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे विद्युत इत्यादी नावानीही तो ओळखला जातो. तसेच सोमही एक नाव आहे. याच कारणामुळे निरुक्त इत्यादी वेदाच्या कोशात ‘‘सोम’’ शब्दाची व्याख्या ईश्वर परकच आहे. विष्णूची सहस्र नावे मानणारे लोक ‘‘सोमऽपोऽमृतप: सोम:’’ इत्यादी वाक्यांद्वारे सोम इत्यादी नावानेच विष्णूच्या सहस्रनावाची पूर्ती करतात. या प्रकारे येथे सोम हे परमेश्वराचे नाव होते. ते न समजल्यामुळे लोकांनी सोमलतेचा अर्थ करून अर्थाचा अनर्थ केलेला आहे. वेदाचा मिथ्या अर्थ करून १०९७ मंत्रांवर पुनरुक्तीचा कलंक लावलेला आहे. त्याच प्रकारे वेदाचे तुच्छ अर्थ करून कित्येक कलंक लावलेले आहेत. जसे - (१) ‘‘वनानिमहिषा इव’’ ऋ. ९।३३।१ या मंत्राचा अर्थ असा केलेला आहे की, हे सोम! तू आम्हाला असा प्रिय आहेस जसे म्हशीना गवत प्रिय असते. (२) ‘‘कन्याजारमिवप्रियम्’’ तू आम्हाला असा प्रिय आहेस जसे कन्यांना जार प्रिय असतो. (३) ‘‘योषाजारमिव प्रियम्’’ ऋग. ९।३२।४ तू आम्हाला असा प्रिय आहेस जसे स्त्रियांना जार प्रिय असतो. वास्तविक या वाक्यांचे अर्थ अत्यंत उच्च होते. म्हशीना गवत, कन्या आणि स्त्रियांना जार असे विधान कधीही नव्हते. यांच्या सत्यार्थांना जाणवायचे असेल त्यानी वरील प्रतीकाद्वारे आमच्या नवव्या मंडलाचे भाष्य पाहावे. $ याच प्रकारे ‘‘हरिश्चन्द्रो मरुद्गण:’’ ऋग्. ९।६६।२६ या मंत्राने अल्पदर्शी लोक हरिश्चन्द्र राजाचे नाव समजून वेदात इतिहास समजू लागतात; परंतु येथे हरिश्चंद्र हे विद्वानाबाबत विश्लेषण आहे. या सर्व गोष्टींचे उत्तर या मंडलाचे वाचन करून चांगल्या प्रकारे सापडते. $ सोमयज्ञाविषयी हिंसासूचित मंत्र उद्धृत करून वेदाला दूषित केले जाते. जसे ‘‘बृहद्वोवय उच्यतेसभासु’’ ऋग्. ६।२८।६ चा अर्थ केला गेला की सोमचे सर्वात मोठे अन्न भक्ष्य आहे त्यासाठी गौ, अश्व इत्यादी पदार्थांचा बळी दिला पाहिजे याचे उत्तर असे की येथे गोरक्षणानिमित्त जे अन्न दिले जाते त्याचे वर्णन आहे. बलिदानाचे नाही ‘‘त्री यच्छता महिषाणामघो मास्री सरांसि मघवा सोम्यापा:’’ $ ऋग्वेद् ५।२९।८ $ या मंत्राचा अर्थ तीनशे म्हशींचे मांस खाणे व तीन तलाव मद्य पिणे असा केलेला आहे. ते सर्वस्वी खोटे आहे. कारण ‘‘महिष’’ शब्द वेदात मोठे किंवा पूज्य यासाठी येतो. जसे ‘‘पर्जन्यवृद्धं महिषं’’ ऋग्. ९।११३।३ या मंत्रात मोठे असा अर्थ आलेला आहे. त्याच प्रकारे तीनशे महिषचे तात्पर्य येथे मोठमोठ्या शूरवीरांचे आहे. अर्थात्, जो योद्धा तीनशे मोठमोठ्या शूर वीरांवर विजय मिळवून भूमी, अंतरिक्ष व द्युलोकामध्ये आपल्या बाणाने तीन रांगा तयार करतो तो उत्तम योद्धा म्हणविला जातो. हा राज प्रकरणाचा मंत्र आहे. यात म्हशीचे मांस व मद्याचा प्रसंग कसा असेल? याच प्रकारे जे मंत्र मद्य मांसाच्या विषयी उध्दृत केले जातात ते वास्तविक मद्यमांसाचा अर्थ दर्शवित नाहीत. मिथ्यार्थ करून मद्य मांसाचे पोषक मानले जातात. वास्तविक कारण हे आहे की ज्या कोशांनी आजकाल वेदाचे अर्थ केले जातात ते वेदार्थाचे कोश नाहीत तर अत्यंत अर्वाचीन संस्कृत भाषेचे कोश आहेत. जसे - अमर कोशात ‘‘वाजी’’ घोड्याचे नाव आहे त्यानुसार ‘‘ये वाजिनं परिपश्चन्ति पक्व’’ ऋग्. १।१६२।१२ या मंत्रातील ‘‘वाजी’’ शब्दाचा अर्थ हाच केला जाईल की जे घोड्यांना शिजविताना व गंधाचा आस्वाद घेताना पाहतात त्यांचा उद्यम आम्हाला प्राप्त व्हावा; परंतु जेव्हा आम्ही निरुक्त पाहतो तेव्हा ‘‘बाज’’चा अर्थ अन्न, यश, बल तसेच ऐश्वर्य इत्यादी होतो. त्यामुळे ‘‘वाजि’’ शब्दाचे अन्नवान, धनवान, बलवान इत्यादी अर्थ होतात. या वैदिक कोशानुसार ‘‘ये वाजिनं परिपश्यन्ति पक्वं’’ ऋग्. १।१६२।१२ या मंत्राचा अर्थ केल्यास तो असा की जो लोक वसंतऋतूत यव इत्यादी धान्याची शेती पिकल्यावर म्हणतात ‘‘सुरभिर्निहरति’’ ही पिकून सुगंधीयुक्त झालेली आहे. आता त्यांना कापले पाहिजे. या प्रकारे वैदिक कोश व अमर इत्यादी आधुनिक कोशात शेकडो कोशांचे अंतर पडते. या रीतीने ‘‘महिष’’ शब्दाचा अर्थ येथे रेडा करण्याने अत्यंत अनर्थ झालेला आहे. निरुक्तअ३खंड १३ मध्ये ‘‘महिष’’ शब्दाचा अर्थ महान आहे. पुन्हा निरुक्त अ.७ खं २६ च्या दैवतकाण्डात ‘‘महिष’’ शब्दाचा अर्थ महान देवगण असा केलेला आहे. रेडे नाही. या प्रकारे मीमांसा करण्याने ज्ञात होते की, सायण इत्यादी भाष्यकारांनी आधुनिक अमरकोश इत्यादी कोशांच्या साह्याने जे वेदार्थ केले गेले ते संपूर्ण मिथ्या आहेत. $ कित्येक लोक हा आक्षेप घेतात की वेदात ज्याला सोमरस म्हटले आहे ते एक प्रकारचे मादक द्रव्य होते किंवा असे म्हणता येईल की एक प्रकारची मदिरा होती. याचे उत्तर असे की जेथे ‘‘सोम’’ औषध विशेषाच्या अर्थाने आलेला आहे. तेथे त्याचा अर्थ मदिरा कधीही होत नाही. कारण सोम मादक पदार्थ नव्हता तर आल्हादक होता. आल्हादक व मादकमध्ये हा भेद आहे की जो केवळ आनंद उत्पन्न करतो व मेंदूमध्ये कोणत्याही प्रकारचा बुद्धिनाशक विकार उत्पन्न करत नाही त्याला आल्हादक म्हणतात व जो बुद्धिमध्ये विकार उत्पन्न करतो व उन्मत्त करतो त्याला मादक म्हणतात. ऋग्वेदमंडल दहामध्ये याचा स्पष्ट रीतीने भेद वर्णिलेला आहे. ‘‘हृत्सु पीतासु युद्धन्ते दुर्मदासो व सुरायाम्’’ ऋग्. ८।२।१२ सोमरस पिण्याने योद्धा लोक युद्ध करतात; परंतु मद्याप्रमाणे उन्मत्त होत नाहीत तर सावधान करून युद्ध करतात. विकलेन्द्रिय होऊन नाही. यावरून स्पष्ट कळते की सोमरस मादक द्रव्य नव्हते. $ याचप्रकारे भारतीय व युरोपियननिवासी कित्येक भाष्यकारांनी हेही आक्षेप घेतलेले आहेत की आर्यांमध्ये बुद्धापूर्वी वर्णव्यवस्था नव्हती. जेव्हा आम्ही त्यांना हे उत्तर देतो की, ‘‘ब्राह्मणोऽस्यमुखमासीद् बाहू राजन्य कृत:’’ ऋग्. १०।९०।१२ या मंत्रात चारही वर्णात नावे स्पष्ट आहेत. तेव्हा ते लोक प्रश्न विचारतात की ज्या सूक्ताचा हा मंत्र आहे ते सूक्त कित्येक सहस्र वर्षांपूर्वी वेदात मिळालेले आहे. जे लोक वेदात प्रक्षिप्त मंत्र मानतात त्याचे उत्तर हे आहे की तर वेदात प्रक्षिप्त मंत्र असते तर त्यात भाषेचा भेद अवश्य असता; परंतु हे लक्षात ठेवले पाहिजे की या सूक्ताची भाषा व इतर स्थलांच्या भाषेत अंशमात्रही भेद नाही. जर भेद असता तर एका स्थानी तरी दिसला असता. हे सूक्त चार ही वेदांमध्ये एक प्रकारचे आढळते. या वेदमंत्राच्या संख्येत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अर्थववेद सनातन काळापासून असेच चालत आलेले आहेत. जसे आज आहेत केवळ हाच मंत्र नाही तर वर्णव्यवस्थेचे प्रतिपादक इतरत्र ही कित्येक मंत्र आढळतात. जसे - ‘‘तमेव ऋषिं तमु ब्रह्याणमाहु:’’ $ ऋग्. १०।१०७।६ $ या मंत्रात ब्राह्मण तसेच ऋषी इत्यादी गुणकृत पदव्या आढळतात. याच अभिप्रायाने गीतेत कथन केलेले आहे की, ‘‘चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुण कर्म विभागश:’’ चारही वर्ण परमात्म्याने गुणकर्माच्या भेदाने भिन्नभिन्न रचले आहेत. भगवान बुद्धानंतर वर्णव्यवस्था निर्माण झाली हे मानणाऱ्यांनी हे विचारात घेतले पाहिजे गीता महाभारताच्या भीष्म पर्वाचा एक भाग आहे तो बुद्धाच्या १५०० वर्षांपूर्वी बनलेला आहे. मग त्यात चारही वर्णांचे कथन कसे येऊ शकते? जर हिंदूमध्ये वर्णव्यवस्था बुद्धानंतर आली असती तर या प्रकारची मीमांसा करण्याने वेदावर जे आक्षेप घेतले जातात ते संपूर्णपणे निर्मूल वाटतात. $ या आक्षेपाचा समूळ उच्छेद व ब्राह्मण इत्यादी वर्णाचा विभेद तसेच आर्यजातीच्या सिद्धातांचे विस्तृत वर्णन दशम मंडलाच्या अवतरणिकेत करू. त्यासाठी येथे संक्षिप्तपणे समाप्त करतो. $ आर्य्यमुनि:॥ $ १. ब्राह्मण काल, आरण्यकाल व उपनिषत काल हे विभाजन उपयुक्त नाही. केवळ ईशावास्य उपनिषद सोडून सर्व उपनिषद ब्राह्मण भाग आहेत. याच प्रकारे आरण्यक ही ब्राह्मणच आहेत. $ ब्राह्मण ब्रह्म अर्थात वेदाची व्याख्या आहे त्यासाठी मूलत: ब्राह्मण आरंभापासून शेवटपर्यंत ब्राह्मणच आहेत. व्याख्येय विषयाच्या विभाजनाच्या दृष्टीने बोधसौकर्यासाठी आरण्यक व उपनिषद नाव दिलेले आहे. चौदाव्या कांडात्मक शतपथ ब्राह्मणाच्या अंतिम कांडाच्या अंतिम सहा अध्याय अर्थात चतुर्थपासून नवव्या अध्यायापर्यंतचा भाग ‘‘बृहदरण्यकोपनिषत’’ नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्या नावात आरण्यक व उपनिषदही आहेत. या प्रकारे हा एकटा ग्रंथ ब्राह्मण आरण्यक व उपनिषत् आहे. $ कधी ज्ञान मुख्य तर कधी कर्म मुख्य होते. या प्रकारची स्थिती वेदभाष्य ब्राह्मणांमध्ये नाही. या व्याख्या प्रतिक्रियात्मक कधी नव्हत्या. सर्व प्रकारच्या व्याख्या आध्यात्मिक, आधिभौतिक इत्यादी सदैव बरोबरच होत्या. $ १. शतपथ ब्राह्मणाचे प्रवचन महान ऋषी याज्ञवल्क्याने केलेले आहे. याज्ञवल्क्य मिथिलेच्या ब्रह्मपरिषदेत होते. त्यावेळी या परिषदेचे संचालक देवरात जनक व देवरातचा पुत्र दैवराति ज्याचे प्रतिस्विक नाव बृहदुत्थ होते. ते श्रीरामाचे सासरे सीरध्वज जनकाच्या १५-१६ पिढीपूर्वी होते. प्रत्येक धार्मिक नरेशाच्या राज्यात अशी धर्मपरिषद असे. $ २. बिभर्ति सर्वमिति ब्रह्म या यौगिक अर्थानुसार पृथ्वीचा ब्रह्म आप: अप चा तेज, तेजाचा वायू, वायूचे आकाश. या प्रकारे उत्तरोत्तर ब्रह्मत्व क्रम आहे. तेव्हाच वेदामध्ये ‘‘तस्मै ज्येष्ठाय ब्रह्मणे नम:’’ (अथर्व.) म्हटले आहे. स्थूलापासून सूक्ष्माकडे गतीचा क्रम विभिन्न प्रतीकांनी दर्शविलेला आहे. $ १. महाभारतात ‘बौद्ध दर्शन’ नाही. बुद्ध दर्शनाचे कित्येक विचार जे महाभारतात येतात ते अत्यंत प्राचीन काळाच्या विभिन्न वादांचे विचार आहेत जे बुद्धाने स्वीकारले होते व दार्शनिक पद्धतीचे अंग बनविलेले आहे. जसे येथेही वर सांगितलेले आहे. $ १. महर्षी दयानंद सरस्वती-आद्य शंकराचार्याचा काळ विक्रमाब्दापूर्वी ४००-५०० वर्षांपूर्वीचा मानला जातो. कुमारिल शंकरापेक्षा मोठे असून त्यांच्याच वेळी होते. कुमारिलने शबर भाष्यावर वार्तिक लिहिलेले आहेत. त्यामुळे शबर त्यांच्या पुष्कळ पूर्वीचे आहेत. बुद्धाचा काळ स्वीकारल्यानंतर शबर कुमारिल बुद्धापूर्वी सिद्ध होतात. त्यामुळे त्यांच्यावर बुद्धाचा प्रभाव कसा? $ वास्तविक बुद्धाचा जन्म ईसामसीह पूर्वी १००० वर्षे झालेला आहे. $ स्वामी दयानंदांचे जीवन वेदसमर्पित होते. त्यांचे वैदिक ज्ञान स्पष्ट व विचार प्रखर होते. भाषेत दृढता व लेखनात युक्तियुक्तता होती. वैदिक साहित्याचे गहन व विस्तृत अध्ययन करून त्यांनी ते ज्ञान अंतिम सत्य म्हणून स्वीकारले होते. त्यांच्या दृष्टीने वेदात लौकिक इतिहास नसून वेदाचा संदेश सार्वकालिक व सार्वजनिक आहे. त्यांनी वेदाचा संदेश जगात प्रसृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. $ स्त्री-पुरुष समानता, जातिभेदाचा विरोध, प्रचलित रूढी व अंधविश्वासाचे खंडन, अन्याय, अज्ञानाविरुद्ध संघर्ष करण्याचा अविरत प्रयास त्यांनी केलेला आहे. त्यामुळे ते सामाजिक सुधारकांच्या श्रेणीत गणले गेलेले आहेत. $ पाश्चात्त्य लेखक रोम्यां रोला म्हणतात - पैaेूप्aू rarा ण्दस्ंग्हaूग्दह,ूप्ग्हव्ar aह् स्aह दf aम्ूग्दहैग्ूप्ुाहग्ल्े fदr त्ीर््ीेप्ग्ज्. $ त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आदर्श चिंतन व कर्मठतेचा संयोग होता. बुद्धिमत्ता व नेतृत्वाच्या क्षमतेचा संचय होता. त्यांनी आपले जीवन समाज व देशाच्या उत्थानासाठी वाहिले होते. आर्य समाजाच्या माध्यमातून जगाला दिव्य वैदिक सिद्धान्ताचे दर्शन घडविलेले आहे. $ योगी अरविंद म्हणतात - पैaे स्aहैग्ूप् उद् ग्ह प्ग्ेेदल्त्, न्ग्ेग्दह ग्ह प्ग्ेाबे aह् ज्दैी ग्ह न्ग्ेग्दह. Daब्aहaह् एaraेैaूग्ैaे दहा दfूप्देा. $ यापूर्वी मी दयानंद सरस्वतींच्या ऋग्वेद भाष्य मंडल १,२,३ चा मराठीतून अनुवाद केलेला असून ते ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. त्यापुढील ऋग्वेद भाष्य मंडल ४ ते ७ मंत्र ६१ पर्यंतचा मराठी अनुवाद वाचकांच्या सुपूर्द केलेला आहे. या ग्रंथात ही सुलभ मराठी भाषेत अनुवाद करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तरीही काही त्रुटी आढळल्यास निदर्शनास आणाव्यात. माझा हा मराठी वेदभाष्य अनुवाद विशाल अंतराळात चिमुकल्या पक्ष्याने मारलेल्या भरारीप्रमाणे आहे. $ हा ग्रंथ आर्य समाज संभाजीनगरतर्फे प्रकाशित होत आहे, त्याबद्दल मी आर्य समाजाची ऋणी आहे. श्री. दयाराम बसैये, श्री. जुगलकिशोर दायमा व श्री. जोगेंद्रसिंह चौहान यांची मी अत्यंत आभारी आहे. वेळोवेळी साह्य केल्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत. माझे पती श्री. बळवंतराव जोशी यांनीही मला अमूल्य असे मार्गदर्शन केलेले आहे. श्री. सुहास अंजनकर यांनीही वेळोवेळी साह्य केलेले आहे. उत्कृष्ट रूपात छपाई-बायंडिंग करून देणारे अक्षररंग ऑफसेटचे श्री. बियाणी बंधूंचीही मी आभारी आहे. $ मागील दोन्ही खंडांचे वाचकांनी भरभरून स्वागत केले आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच चार ते सात मंत्र ६१ पर्यंत मंडलांचे काम मी उत्साहाने करू शकले. याही खंडाला त्यांचा असाच प्रतिसाद मिळेल या अपेक्षेसह. $ धन्यवाद! $ - सौ. सविता बळवंतराव जोशी $ समाजात अंधविश्वास व अज्ञानामुळे अनेक ईश्वर आहेत. त्यामुळे ईश्वरीय ज्ञानही अनेक आहेत. जो संप्रदाय ज्या ईश्वराला मानतो त्याने त्याचे ज्ञानही बनविले. या सर्व प्रकारचे ईश्वर व त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या ज्ञानात अंतर आहे. जगात प्रचलित असलेले सर्व ईश्वरीय ज्ञान माणसांच्या माध्यमाने समाजाला प्राप्त झालेले आहे. त्या सर्वांची प्रामाणिकता ही आहे, की जी व्यक्ती त्या ज्ञानाची संवाहक व माध्यम बनून समोर आली तिचे म्हणणेच त्या ज्ञानाची सत्यता व प्रामाणिकता यांचा आधार आहे. $ समाजात प्रचलित ईश्वरीय ज्ञानाची ही सर्वांत मोठी न्यूनता आहे. जगात प्रथम मनुष्य आला व ईश्वरीय ज्ञान म्हणविणारे ग्रंथ नंतर आले. जर ते ग्रंथ ईश्वराने पाठविलेले आहेत व माणसांसाठी आहेत तर हा परमेश्वराचा मोठा अन्याय होईल. त्याने काही लोकांना ज्ञानाशिवाय जगात पाठविले, त्यांचे जीवन नियमांच्या माहितीशिवाय अपूर्ण राहिले. एकीकडे ते सुखापासून वंचित राहिले व नियमांच्या माहितीच्या अभावात जीवनात चुका करत राहिले. या चुकांमुळे जे पाप झाले ते त्यासाठी जबाबदार न राहता त्या पापाचे कारण ईश्वर झाला व अपराधाविना सुखापासून वंचित करण्यामुळे ईश्वराला न्यायकारीही म्हणता येणार नाही. $ या ईश्वरी ग्रंथाबरोबर दुसरी समस्या अशी, की त्यांचे क्षेत्रीय (प्रांतीय) होणे व वर्गविशेषाच्या हिताची गोष्ट करणे. जेव्हा ईश्वराला संसार बनविणारा, चालविणारा मानतात तर त्यांनी जगाचे इतर भाग व तेथील लोकांची गोष्ट करता कामा नये व लहान देश व लहान थोड्याशा लोकांच्या हिताचा विचार असेल तर त्याला ईश्वर म्हणता येणार नाही. त्याच्यापेक्षा चांगले अनेक महापुरुष आहेत जे पूर्ण समाज व पूर्ण मानवतेसाठी विचार करतात. जसे कुराण केवळ अरबांसाठी, अरबांमध्येही जे केवळ मोहंमदावर विश्वास करतात, त्याला खुदाचा (ईश्वराचा) पैगंबर मानतात त्यांच्यासाठी आहे. त्यात इतर लोकांची निंदा आहे व त्यांचे नुकसान करण्याची कामना केलेली आहे. असे ग्रंथ ईश्वरीय गुणांनी रहित असल्यामुळे ईश्वरीय ज्ञानाच्या रूपात स्वीकारता येत नाहीत. त्याच प्रकारे बायबल इस्त्रायलमध्ये राहणाऱ्यासाठी लिहिलेले आहे. जे लोक ईसाला परमेश्वराचा पुत्र मानतात व त्याच्यावर ईयान (विश्वास) ठेवतात. त्याच लोकांसाठी बायबल लिहिलेले आहे. त्यामुळे बायबलही ईश्वरीय ग्रंथ म्हटला जाऊ शकत नाही. हीच स्थिती जगात उपलब्ध इतर ईश्वरीय ग्रंथांची आहे. $ ईश्वरीय ग्रंथाची सर्वांत मोठी विशेषता ही असली पाहिजे, की तो सर्वांसाठी असला पाहिजे. त्यासाठी हे आवश्यक आहे, की मनुष्याच्या अस्तित्वाबरोबरच त्याचे सहज सुलभ असणे. या वैशिष्ट्याशिवाय कोणत्याही ग्रंथाला ईश्वरीय ग्रंथ म्हणता येणार नाही. आता प्रश्न येतो, की ईश्वरीय ग्रंथाची आवश्यकता आहे किंवा नाही? जर हे मानले, की ईश्वरीय ग्रंथाची आवश्यकता नाही तेव्हा प्रश्न पडतो, की माणसाजवळ जे ज्ञान आहे, ते कुठून आले? जर हे मानले, की ते त्याच्याजवळ नेहमीसाठी आहे तर ही गोष्ट चुकीची आहे. कारण जे ज्ञान सदैव असते ते सर्वांजवळ असते व एकसारखे असते. जसे गायीचे वासरू त्याच्या आई-वडिलांप्रमाणे पोहते व आई-वडिलांसारखाच चारा खाते. जर माणसाजवळचे ज्ञान त्याचे स्वत:चे असते तर सर्वांजवळ असते व समान असते; परंतु एखादा माणूस पुष्कळ जाणतो व एखादा त्या विषयात मूर्ख असतो. सर्वांच्या ज्ञानाचा स्तर भिन्न भिन्न असतो. एखादा एक विषय जाणतो तर दुसरा त्या विषयाबाबत अनभिज्ञ असतो. यावरून हे स्पष्ट होते, की जे ज्ञान कमी-जास्त होते, ते कारण असल्यामुळे वाढते, कारण नसल्यामुळे कमी होते. यामुळे माणसांना माणसांना जो विषय शिकविला जातो तो विषय तो मनुष्य शिकतो. दुसरा विषय तो शिकू शकत नाही. जंगलात राहणाऱ्या वनवासींचे ज्ञान शून्य असते तर नागरिकांचे ज्ञान वाढलेले असते. ही स्थिती ज्ञानाच्या संपर्कामुळे असते. $ यावरून हे स्पष्ट होते, की माणसाजवळ सर्वज्ञान नेहमीसाठी नसते. काही ज्ञान सर्वांजवळ असते व समान रूपाने असते. या प्रकारे जगात माणसापेक्षा भिन्न जे प्राणी आहेत त्यांचे ज्ञान कमी-जास्त होत नाही. ते परंपरेने प्राप्त होते; परंतु माणसाजवळ काही ज्ञान परंपरेने येते जे सर्वांना समान रूपाने प्राप्त असते व काही ज्ञान कमी-जास्त होत राहते. त्यामुळे माणसाला विद्यमान ज्ञान दोन भागांत वाटलेले आहे. एक परंपरेने प्राप्त असलेले भूक, तहान, गर्मी, सर्दी, राग-द्वेष हे सर्व ज्ञान संवेगरूपाने सर्वांजवळ आहे; परंतु कपडे घालणे, भोजन तयार करणे, शेती करणे, घर बनविणे, यंत्र उपकरण बनविणे, भाषा बोलणे, लिहिणे हे सर्व ज्ञान अर्जित ज्ञान आहे. जितका या ज्ञानाचा माणसाशी संपर्क होतो तितके ते ज्ञान वाढत जाते. ज्ञानाचा संपर्क तुटल्यावर माणूस त्या ज्ञानापासून वंचित होतो. त्यासाठी या ज्ञानाला नैमित्तिक ज्ञान म्हटले गेले आहे. जे निमित्त अर्थात कारणाने प्राप्त होते. कारण नसल्यावर समाप्त होते. हे नैमित्तिक ज्ञान प्राप्त करण्याची योग्यता परमेश्वराने माणसाला दिलेली आहे. ज्याला आम्ही बुद्धी म्हणतो. ती आमचे संस्कार, पुरुषार्थाने कमी किंवा अधिक माणसांमध्ये दिसून येते. बुद्धी माणसाजवळ असते तेव्हा ज्ञान त्याच्यासाठी बनलेले आहे. माणसात ती स्वाभाविक ज्ञानापेक्षा भिन्न आहे. त्यासाठी ज्ञानाचा स्रोत असणे आवश्यक आहे. तो स्रोत आहे तर जे ज्ञान जगात शक्य आहे ते सर्व ज्ञान त्या स्रोतांपासून प्राप्त होईल. तो सर्वकाळी सर्व माणसांना ज्ञान देतो. त्यासाठी परमेश्वराला सर्वज्ञ म्हटले जाते. त्यामुळे सर्व काळी संपूर्ण ज्ञानाने युक्त होणे आवश्यक आहे. तो सर्वज्ञ, सर्वव्यापक असल्यामुळे सर्वकाळी सर्व माणसांना प्राप्त आहे. ज्ञानच सर्वांत मोठी शक्ती आहे व तो परमेश्वर सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमानही आहे. त्याचे ज्ञान माणसापूर्वीही होते व नंतरही असते. त्याचे ते ज्ञानच माणसाला प्राप्त होते. माणसाला प्राप्त झालेल्या याच ज्ञानाला ईश्वरीय ज्ञान म्हणतात. हे ईश्वरीय ज्ञान ज्या सक्षम लोकांच्या माध्यमाने समाजाला प्राप्त झाले त्यांना ऋषी म्हणतात व त्या ज्ञानाला वेदज्ञान म्हणतात. वेद प्रथम आहे, वेद सर्वांसाठी आहेत. त्यासाठी भेदभाव व अन्यायाचा दोष वेदावर येत नाही. $ काही लोक एक विचित्र तर्क करतात, जी वस्तू नवी बनते, नंतर येते तेव्हा ती पूर्वीपेक्षा सुधारलेल्या रूपात येते. या सुधारलेल्या रूपाला नवीन मॉडेल म्हटले जाते. त्यांच्या विचाराने वेदापेक्षा बायबल, कुराण इत्यादी नवीन ग्रंथ वेदापेक्षा अधिक सुधारलेल्या ज्ञानाच्या रूपात आहेत. त्यामुळे या नवीन ग्रंथांबद्दल आदर वाटणे उचित आहे; परंतु हा तर्क योग्य नाही. प्रकृतीचे नियम कधीही बदलत नाहीत. सूर्य मोहंमद साहेबांपूर्वीही उगवत होता, आजही त्याच नियमाने उगवतो. अग्नी, वायू, पाणी, आकाशाचे जे नियम आदिकाळात होते, आजही तेच नियम आहेत. जीवजंतू जसे उत्पन्न होत होते, तसेच आजही उत्पन्न होतात व मरतात. माणसातही पुरुष व स्त्री जसे पूर्वी होते तसेच आजही आहेत व पुढेही होत राहतील. माणसाची प्रत्येक रचना परमेश्वराच्या रचनेपेक्षा लहान असते. विज्ञान नवीन बनविलेल्या नियमांना म्हणत नाहीत, तर प्रकृतीच्या नियमांचे आकलनच विज्ञानाचा आविष्कार म्हटले जाते. $ माणसांच्या शरीरात डोळे, नाक, कान, हात, पायाचे स्थान बदलून त्यांची चांगली रचना बनविता येत नाही. माणसाच्या शरीर रचनेत थोडेही परिवर्तन असेल तर विकार किंवा दोष म्हणविला जातो. कुरूपता, अपूर्णता म्हणविली जाते. कुणी डोक्याच्या बलाने चालत नाही. त्यामुळे हे जाणले पाहिजे, की माणूस अल्पज्ञ, अल्पबुद्धिमान असल्यामुळे त्याची रचना अपूर्ण असते. त्यात प्रत्येक वेळी सुधारणा करणे शक्य आहे; परंतु जशी प्रकृतीची रचना, जीवजंतूंच्या शरीराची रचना, माणसांच्या शरीराची रचना पूर्ण आहे त्याच प्रकारे त्याने दिलेले ज्ञानही पूर्ण असल्यामुळे अपूर्ण नाही. कधी जीर्ण होत नाही. पूर्णताच सुंदरता आहे. त्यामुुळे जे काही आहे ते परमेश्वराचे आहे. ते पूर्ण आहे, नवीन आहे, सुंदर आहे. जसा सूर्य प्रकाशाद्वारे डोळ्यांची साह्यता करतो तसे वेद ज्ञान बुद्धीची साह्यता करते. त्यासाठी मनुमहाराजांनी वेदज्ञानाला पितर, देवता, माणसांचा चक्षू म्हटले आहे. या युगात ऋषी दयानंदानीच ते वेदज्ञान सर्व समाजाला परिचित करविले व या ज्ञानाला मनुष्यमात्रापर्यंत पोचविण्यासाठी वेदभाष्य केले. ते वेदभाष्य अकाली मृत्यूमुळे पूर्ण होऊ शकले नाही; परंतु ज्ञानाची, प्रकाशाची झलक आम्हाला यावरून प्राप्त होते. त्या ज्ञानाला समाजाच्या व्यक्तीपर्यंत पोचविण्याची जबाबदारी स्वामीजी महाराजांनी परोपकारिणी सभेला सोपविली. त्याच दायित्वाचा निर्वाह करत ऋग्वेद भाष्याचा हा भाग ज्याचे भाष्य स्वामी ब्रह्ममुनीजी महाराजांनी केले. ज्याचे प्रथम संस्करण समाप्त झालेले आहे. आता त्याचे नवीन संस्करण प्रकाशित करून वेद स्वाध्यायी लोकांच्या सेवेत समर्पित करताना प्रसन्नता होत आहे. जाणते लोक त्याचा स्वीकार करतील, ही अपेक्षा. $ पितृ देव मनुष्याणां वेदश्चक्षु: सनातनम् । $ अशक्यचाप्रमेयञ्च वेदशास्त्रमिति स्थिति : ॥
Acknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
Shri Virendra Agarwal
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal