Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 35/ मन्त्र 4
    ऋषिः - आदित्या देवा वा ऋषयः देवता - वायुसवितारौ देवते छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    5

    अ॒श्व॒त्थे वो॑ नि॒षद॑नं प॒र्णे वो॑ वस॒तिष्कृ॒ता।गो॒भाज॒ऽइत्किला॑सथ॒ यत्स॒नव॑थ॒ पू॑रुषम्॥४॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒श्व॒त्थे। वः॒। नि॒षद॑नम्। नि॒सद॑न॒मिति॑ नि॒ऽसद॑नम्। प॒र्णे। वः॒। व॒स॒तिः। कृ॒ता ॥ गो॒भाज॒ इति॑ गो॒ऽभाजः॑। इ॒त्। किल॑। अ॒स॒थ॒। यत्। स॒नव॑थ। पूरु॑षम्। पुरु॑ष॒मिति॒ पुरु॑षम् ॥४ ॥


    स्वर रहित मन्त्र

    अश्वत्थे वो निषदनम्पर्णे वो वसतिष्कृता । गोभाजऽइत्किलासथ यत्सनवथ पूरुषम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    अश्वत्थे। वः। निषदनम्। निसदनमिति निऽसदनम्। पर्णे। वः। वसतिः। कृता॥ गोभाज इति गोऽभाजः। इत्। किल। असथ। यत्। सनवथ। पूरुषम्। पुरुषमिति पुरुषम्॥४॥

    यजुर्वेद - अध्याय » 35; मन्त्र » 4
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे जीवात्मानो, (लक्षात असू द्या की) जगदीश्‍वराने (अश्‍वत्थे) उद्या राहणार वा नाही, अशा अनित्य जगात (वः) तुमची (निषदनम्) स्थिती (पर्णे) वृक्षाच्या पानाप्रमाणे चंचल असलेल्या या जीवनात (वः) तुमचे (वसतिः) निवासस्थान (कृता) केले आहे (ज्याप्रमाणे वृक्षावरील पानाची दशा की ते कधी गळून पडेल, याचा नेम नाही, तद्वत हे शरीर नश्‍वर वा क्षणिक आहे. पिंपळाच्या वृक्षाप्रमाणे या जगातील पदार्थ ही चंचल, अस्थिर व नाशवान आहेत) त्यामुळे तुम्ही (यत्) ज्या वा त्या (पूरुषम्) सर्वत्र परिपूर्ण पुरुष परमेश्‍वराचाच (सनवथ) आधार घ्या आणि त्याच्यासह (गोभाजः) पृथ्वी, वाणी, इंद्रियें अथवा किरणांचे सेवन करणारे (इत्) होऊनच तुम्ही यत्न करीत धर्मात स्थिरपणे (असथ) राहणारे व्हा. ॥4॥

    भावार्थ - भावार्थ - त्याने मनुष्य या अनित्य जगात अनित्य शरीर आणि अनित्य पदार्थ प्राप्त करतो, पण त्याने या क्षणभंगुर जीवनात धर्माचरण करीत नित्य अशा परमेश्‍वराची उपासना अवश्य करावी. अशाप्रकारे मनुष्यांना आत्मा आणि परमात्म्याच्या संयोगामुळे उत्पन्न होणारा आनंद अनुभवता येईल. ॥4॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top