Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 9/ मन्त्र 35
    ऋषिः - वरुण ऋषिः देवता - विश्वेदेवा देवताः छन्दः - विराट् उत्कृति स्वरः - षड्जः
    4

    ए॒ष ते॑ निर्ऋते भा॒गस्तं जु॑षस्व॒ स्वाहा॒ऽग्निने॑त्रेभ्यो दे॒वेभ्यः॑ पुरः॒सद्भ्यः॒ स्वाहा॑ य॒मने॑त्रेभ्यो दे॒वेभ्यो॑ दक्षिणा॒सद्भ्यः॒ स्वाहा॑ वि॒श्वदे॑वनेत्रेभ्यो दे॒वेभ्यः॑ पश्चा॒त्सद्भ्यः॒ स्वाहा॑ मि॒त्रावरु॑णनेत्रेभ्यो वा म॒रुन्ने॑त्रेभ्यो वा दे॒वेभ्य॑ऽउत्तरा॒सद्भ्यः॒ स्वाहा॒ सोम॑नेत्रेभ्यो दे॒वेभ्य॑ऽउपरि॒सद्भ्यो॒ दुव॑स्वद्भ्यः॒ स्वाहा॑॥३५॥

    स्वर सहित पद पाठ

    ए॒षः। ते॑ नि॒र्ऋ॒त इति॑ निःऽऋते। भा॒गः। तम्। जु॒ष॒स्व॒। स्वाहा॑। अ॒ग्निने॑त्रेभ्य॒ इत्य॒ग्निऽने॑त्रेभ्यः। दे॒वेभ्यः॑। पु॒रः॒सद्भ्य॒ इति॑ पुरःसत्ऽभ्यः॑। स्वाहा॑। य॒मने॑त्रेभ्य॒ इति॑ य॒मऽने॑त्रेभ्यः। दे॒वेभ्यः॑। द॒क्षि॒णा॒सद्भ्य॒ इति॑ दक्षिणा॒सत्ऽभ्यः॑। स्वाहा॑। वि॒श्वदे॑वनेत्रेभ्य॒ इति॑ वि॒श्वदे॑वऽनेत्रेभ्यः। दे॒वेभ्यः॑। प॒श्चात्सद्भ्य॒ इति॑ पश्चा॒त्सत्ऽभ्यः॑। स्वाहा॑। मि॒त्रावरु॑णनेत्रेभ्य॒ इति॑ मि॒त्रावरु॑णऽनेत्रेभ्यः। वा॒। म॒रुन्ने॑त्रेभ्य॒ इति॑ म॒रुत्ऽने॑त्रेभ्यः। वा॒। दे॒वेभ्यः॑। उ॒त्त॒रा॒सद्भ्य॒ इत्यु॑त्तरा॒सत्ऽभ्यः॑। स्वाहा॑। सोम॑नेत्रेभ्य॒ इति॑ सोम॑ऽनेत्रेभ्यः। दे॒वेभ्यः॑। उ॒प॒रि॒सद्भ्य॒ इत्यु॑परि॒सत्ऽभ्यः॑। दुव॑स्वद्भ्य॒ इति॑ दुव॑स्वत्ऽभ्यः। स्वाहा॑ ॥३५॥


    स्वर रहित मन्त्र

    एष ते निरृते भागस्तञ्जुषस्व स्वाहाग्निनेत्रेभ्यो देवेभ्यः पुरःसद्भ्यः स्वाहा यमनेत्रेभ्यो देवेभ्यो दक्षिणासद्भ्यः स्वाहा विश्वदेवनेत्रेभ्यो देवेभ्यो पश्चात्सद्भ्यः स्वाहा मित्रावरुणनेत्रेभ्यो वा मरुन्नेत्रेभ्यो वा देवेभ्य उत्तरासद्भ्यः स्वाहा सोमनेत्रेभ्यो देवेभ्य ऽउपरिसद्भ्यो दुवस्वद्भ्यः स्वाहा ॥


    स्वर रहित पद पाठ

    एषः। ते निर्ऋत इति निःऽऋते। भागः। तम्। जुषस्व। स्वाहा। अग्निनेत्रेभ्य इत्यग्निऽनेत्रेभ्यः। देवेभ्यः। पुरःसद्भ्य इति पुरःसत्ऽभ्यः। स्वाहा। यमनेत्रेभ्य इति यमऽनेत्रेभ्यः। देवेभ्यः। दक्षिणासद्भ्य इति दक्षिणासत्ऽभ्यः। स्वाहा। विश्वदेवनेत्रेभ्य इति विश्वदेवऽनेत्रेभ्यः। देवेभ्यः। पश्चात्सद्भ्य इति पश्चात्सत्ऽभ्यः। स्वाहा। मित्रावरुणनेत्रेभ्य इति मित्रावरुणऽनेत्रेभ्यः। वा। मरुन्नेत्रेभ्य इति मरुत्ऽनेत्रेभ्यः। वा। देवेभ्यः। उत्तरासद्भ्य इत्युत्तरासत्ऽभ्यः। स्वाहा। सोमनेत्रेभ्य इति सोमऽनेत्रेभ्यः। देवेभ्यः। उपरिसद्भ्य इत्युपरिसत्ऽभ्यः। दुवस्वद्भ्य इति दुवस्वत्ऽभ्यः। स्वाहा॥३५॥

    यजुर्वेद - अध्याय » 9; मन्त्र » 35
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (निऋते) सदैव सत्याचरणयुक्त राजा, (ते) आपला (एष:) हा जो (भाग:) सेवनीय वा ग्रहणीय भाग आहे (प्रजा, विद्वान आदी लोकांकडून आपणाला मिळणारा जो अधिकार, दान, कर आदी आहे) तो भाग (अग्निनेत्रेभ्य:) अग्नीप्रमाणे प्रकाशमान आणि नीतिमान अशा (देवेभ्य:) विद्वानांपासून (स्वाहा) सत्यभाषणाच्या रुपाने प्राप्त व्हावा (आपण सदैव सत्यभाषी असा) (पुर:सद्भ्य:) जे लोक सभेत वा राज्यात सर्वप्रथम वंदनीय आहेत, अशा (देवेभ्य:) विद्वान न्यायाधीशांपासून (स्वाहा) धर्म (आणि न्याययुक्त निर्णय) कार्य करण्याचा भाग ग्रहण करा (न्यायोचित कर्म करा) (यमनेत्रेभ्य:) वायूप्रमाणे सर्वत्र गमन करणारे (दक्षिणासद्भ्य:) सर्वत्र विचरण करणारे असे दक्षिण दिशेत जे (देवेभ्य:) विद्वान आहेत, त्यांच्याकडून (स्वाहा) दान देण्याचे गुण ग्रहण करा. (विश्वदेवनेत्रेभ्य:) विद्वान असून नीतिशास्त्राचे ज्ञाता (पश्चात्सद्भ्य:) पश्चिम दिशेत नेमलेले जे राजकर्मचारी आहेत, त्या (देवेभ्य:) दिव्य सुख देणार्‍या विद्वानांपासून (स्वाहा) उत्साह वाढविणारी वाणी शिका. (प्रजेशी उत्साहवर्धक वाणी बोला) (मित्रावरूण नेत्रेभ्य:) प्राण आणि अपान शक्तीप्रमाणे अथवा (मरून्नेत्रेभ्य:) यज्ञकर्ता ऋत्विक्प्रमाणे (वा) अथवा सत्पुरुषाप्रमाणे न्याय करणारे (उत्तरासद्भ्य:) उत्तर दिशेत स्थित न्यायाधीश आणि (देवेभ्य:) जे विद्वान आहेत, त्यांच्याकडून दूतकर्माचे चतुर कार्य शिका. (सोमनेत्रेभ्य:) चंद्राप्रमाणे सर्वांकरिता ऐश्वर्य आणि आनंद देणार्‍या (उपरिसद्भ्य:) विद्या, विनय, धर्म आणि परमेश्वराची सेवा करणार्‍या (देवेभ्य:) विद्वानांकडून (स्वाहा) आप्त पुरुषांनी वापरण्यास योग्य अशी वाणी वा भाषा (हे राजा) तुम्ही प्राप्त करा आणि सदा धर्माचे (जुषस्व) सेवन करा वा पालन करा. (राष्ट्राच्या राजा वा सभाध्यक्षाने राज्यप्रबंधासाठी सर्वांकडून योग्य ते ज्ञान, क्रिया, व्यवहार, भाषा आदी सद्गुणांचे ग्रहण करावे. त्यांच्या साहाय्य, मत, विचारावीने राज्याचे शासन चालवावे) ॥35॥

    भावार्थ - भावार्थ - हे राजा, वा सभाध्यक्ष, आपण सर्वत: उत्तम विद्वज्जनांचा संग करा. त्यांच्याकडून उत्तम नीती व कार्यपद्धतीचे शिक्षण मिळवा आणि सभेचे अध्यक्ष व्हा, सैन्याचे रक्षक. सेनाध्यक्ष व्हा. अशाप्रकारे उत्तमजनांच्या/श्रेष्ठ संगतीमुळे प्राप्त सनातन वेदोक्त राजतीती, धर्मनीती द्वारा प्रजेचे पालन करा. जे राजा याप्रकारे करतात, तेच या लोकात व परलोकात (देशात व विदेशात) सुखी होतात. जर आपण या कार्यपद्धती व धर्मनीतीच्या विरूद्ध वागाल, तर आपणाला कदापि सुख प्राप्त होणार नाही. कोणीही राजा व माणूस मूर्खांच्या संग-साहाय्याने सुख प्राप्त करू शकत नाही. तसेच विद्वानांच्या (अनुभव, सच्चरित्र व नीतिमान उत्तमजनांच्या मतानुसार वागणारा मनुष्य कधीही असफल वा दु:खी होत नाही. यामुळे राजाने सदा सर्वदा विद्या आणि धर्माचा अवलंब करीत विश्वसनीय विद्वानांच्या साहाय्याने राज्याचे रक्षण-पालन करावे. ज्या राजाच्या सभेत पूर्णविद्यायुक्त धार्मिक मनुष्य सभासद असतात आणि राज्यात असे राजकर्मचारी असतात (तोच पुरुष चक्रवर्ती राज्य करण्यास पात्र ठरतो.) ज्या राजाच्या राज्यात सभासदगण आणि राजपुरुष मिथ्यावादी, व्यभिचारी अजितेंद्रिय, कटुभाषी, अन्यायी, चोर व दरोडेखोर नसतात आणि जिथे स्वत: राजा वरील दुर्गुणांपासून दूर असतो, तोच पुरुष चक्रवर्ती राजा होण्यास योग्य असतो. (वा चक्रवर्ती राज्य चालवू शकतो) यापेक्षा विरूद्ध आचरण असणारा मनुष्य कदापि चक्रवर्ती राजा होऊ शकत नाही. ॥35॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top