यजुर्वेद - अध्याय 9/ मन्त्र 4
ऋषिः - बृहस्पतिर्ऋषिः
देवता - राजधर्मराजादयो देवताः
छन्दः - भूरिक कृति,
स्वरः - निषादः
9
ग्रहा॑ऽऊर्जाहुतयो॒ व्यन्तो॒ विप्रा॑य म॒तिम्। तेषां॒ विशि॑प्रियाणां वो॒ऽहमिष॒मूर्ज॒ꣳ सम॑ग्रभमुपया॒मगृ॑हीतो॒ऽसीन्द्रा॑य त्वा॒ जुष्टं॑ गृह्णाम्ये॒ष ते॒ योनि॒रिन्द्रा॑य त्वा॒ जुष्ट॑तमम्। स॒म्पृचौ॑ स्थः॒ सं मा॑ भ॒द्रेण॑ पृङ्क्तं वि॒पृचौ॑ स्थो॒ वि मा॑ पा॒प्मना॑ पृङ्क्तम्॥४॥
स्वर सहित पद पाठग्रहाः॑। ऊ॒र्जा॒हु॒त॒य॒ इत्यू॑र्जाऽआहुतयः। व्यन्तः॑। विप्रा॑य। म॒तिम्। तेषा॑म्। विशि॑प्रियाणा॒मिति॒ विऽशि॑प्रियाणाम्। वः॒। अ॒हम्। इष॑म्। ऊर्ज॑म्। सम्। अ॒ग्र॒भ॒म्। उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। इन्द्रा॑य। त्वा॒। जुष्ट॑म्। गृ॒ह्णा॒मि॒। ए॒षः। ते॒। योनिः॑। इन्द्रा॑य। त्वा॒। जुष्ट॑तम॒मिति॒ जुष्ट॑ऽतमम्। स॒म्पृचा॒विति॑ स॒म्ऽपृचौ॑। स्थः॒। सम्। मा॒। भ॒द्रेण॑। पृ॒ङ्क्त॒म्। वि॒पृचा॒विति॑ वि॒ऽपृचौ॑। स्थः॒। वि। मा॒। पा॒प्मना॑। पृ॒ङ्क्त॒म् ॥४॥
स्वर रहित मन्त्र
ग्रहा ऽऊर्जाहुतयो व्यन्तो विप्राय मतिम् । तेषाँविशिप्रियाणाँवो हमिषमूर्जँ समग्रभमुपयामगृहीतो सीन्द्राय त्वा जुष्टङ्गृह्णाम्येष ते योनिरिन्द्राय त्वा जुष्टतमम् । सम्पृचौ स्थः सम्मा भद्रेण पृङ्क्तँविपृचौ स्थो वि मा पाप्मना पृङ्क्तम् ॥
स्वर रहित पद पाठ
ग्रहाः। ऊर्जाहुतय इत्यूर्जाऽआहुतयः। व्यन्तः। विप्राय। मतिम्। तेषाम्। विशिप्रियाणामिति विऽशिप्रियाणाम्। वः। अहम्। इषम्। ऊर्जम्। सम्। अग्रभम्। उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। इन्द्राय। त्वा। जुष्टम्। गृह्णामि। एषः। ते। योनिः। इन्द्राय। त्वा। जुष्टतममिति जुष्टऽतमम्। सम्पृचाविति सम्ऽपृचौ। स्थः। सम्। मा। भद्रेण। पृङ्क्तम्। विपृचाविति विऽपृचौ। स्थः। वि। मा। पाप्मना। पृङ्क्तम्॥४॥
विषय - मनुष्यांनी चांगल्याप्रकारे परीक्षा करूनच आप्त विद्वानांची (ते आप्त आणि विश्वसनीय आहेत, याचा निश्चय करूनच) संगती करावी, पुढील मंत्रात हा विषय कथि आहे -
शब्दार्थ -
शब्दार्थ - (राजपुरुषाप्रती एका गुणीविद्वावान गृहस्थाचे वचन) हे राजपुरुष, (अहम्) मी, एक गृहस्थ (विप्राय) बुद्धिमान पुरुषाच्या सुखासाठी अधिक (मतिम्) बुद्धी वा ज्ञान देतो, त्याप्रमाणे तू देखील त्यांना ज्ञान देत जा. तसेच (व्यन्त:) सर्व विद्यासंपन्न (ऊर्जाहुतय:) शक्ती आणि आयुष्य वाढविण्यासाठी दान देणारे व (ग्रहा:) ग्रहण करणारे जे (गृहस्थजन आहेत, (तेषाम्) त्यांच्या (विशिप्रियाणाम्) अनेक प्रकारच्या धर्ममय कार्यांत त्याचा मुख आणि नासिका असणार्या (ज्ञानेंद्रियांनी विशेष ज्ञान व उपयोग घेणार्या) लोकांच्या (मतिम्) बुद्धी व मताचे मी ग्रहण केले आहे. (तसेच (इषम्) अन्न आदी वस्तूंचे व (अर्जम्) त्यांच्या पराक्रमाचे (समग्रभम्) ग्रहण केले आहे. (अनुभवी लोकांकडून त्यांच्या ज्ञानाचा, अन्न-धान्याचा आणि त्यांच्या शक्तीचा लाभ वा साहाय्य मी घेतले आहे) त्याप्रमाणे तुम्हीही घेत जा. (आता हे संबोधन विद्वानाला आहे) विद्वान मनुष्य, तुम्ही जसे (उपयामगृहीत:) राज्याने दिलेल्या (आणि गृहाश्रमासाठी आवश्यक असलेल्या साहित्य सामग्रीने संपन्न (असि) आहात, त्याप्रमाणे मी ही संपन्न व्हावे. ज्याप्रमाणे मी (इन्द्राय) उत्तम ऐश्वर्यासाठी (जष्टम्) सदा आनंदित राहणार्या (त्वा) तुम्हाला (गृह्णामि) ग्रहण करतो, तसेच तुम्ही देखील माझे ग्रहण करा (ऐश्वर्यप्राप्तीच्या इच्छेने मी तुमच्याजवळ येत आहे, तुम्ही साहाय्यकारी व्हा) (ते) तुमचे (एष:) हे (योनि:) घर आहे.
भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे (म्हणजे ‘जसे’ ‘ज्याप्रमाणे’ हे समानतावाचक शब्द प्रत्यक्ष मंत्रात नाहीत, पण योग्य अर्थ घेण्याकरिता हे शब्द आवश्यक आहेत) जे गृहस्थजन राजाच्या आणि प्रजेच्या संततीस बुद्धिमान होण्यासाठी प्रयत्न व विद्येविषयी रुची निर्माण करतात, त्यांनी ज्ञान देत दुराचरणापासून दूर ठेवतात, त्यांना कल्याणकारी कर्म करण्यास प्रवृत्त करतात आणि कुसंगतीपासून वाचवून सत्संगाकडे वळवितात, ते विद्वान, गुणी गृहस्थजनच इहलोकीं व परलोकीं सुख प्राप्त करतात. जे अशा सत्कृत्यांपासून दूर आहेत, त्या गृहस्थांना हे सुख लाभत नाही. ॥4॥
टिप्पणी -
(टीप :- यापुढे मूळ हिंदी भाष्यात असे शब्द आहेत - (इन्द्राय) ॥‘पशुओं को नष्ट करने के लिये’॥ हा अर्थ महर्षी दयानंदाच्या तत्त्वाशी विसंगत व विरूद्ध वाटतो. इथे ‘नष्ट’ या शब्दाऐवजी ‘पुष्ट’ शब्द असल्यास योग्य अर्थ निघतो. बहुतेक ही मु्द्रणकलेतील चूक असावी. अथवा मुद्रित शब्द बरोबर आहेत, असे मानल्यास अर्थ होईल ‘ग्राम, नगर वा वनात जे उपद्रवकारी आणि विनाशक वन्य पुश आहेत, त्यांना नष्ट करण्यासाठी मी (गृहस्थाने) राजपुरुषाचे ग्रहण केले आहे, त्याचे साहाय्य घेतले आहे) (जुष्टतम्) अतीव प्रसन्न असणारे तुम्ही दोघे (राजपुरुष आणि विद्वान) योग्य व उपयुक्त कार्यात (संपृचौ) संयुक्तपणे कार्य करीत (स्थ:) आहात, (भद्रेण) तुम्ही या सेवनीय सुखकारी ऐश्वर्याने (मा) मला (गृहस्थाला) (संपृड्कम्) सुंयक्त करा-(ऐश्वर्य द्या) ज्याप्रमाणे तुम्ही दोघे (पाप्मना) अधर्मी पुरुषापासून (विपृचौ) पृथक वा दूर (स्थ:) आहात, त्याप्रमाणे (मा) मला देखील (विपृंत्त्कम्) दूर ठेवा ॥4॥
Acknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
Shri Virendra Agarwal
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal