Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 30/ मन्त्र 3
    ऋषिः - नारायण ऋषिः देवता - सविता देवता छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः
    3

    विश्वा॑नि देव सवितर्दुरि॒तानि॒ परा॑ सुव। यद्भ॒द्रं तन्न॒ऽआ सु॑व॥३॥

    स्वर सहित पद पाठ

    विश्वा॑नि। दे॒व॒। स॒वि॒तः॒। दु॒रि॒तानीति॑ दुःऽइ॒तानि॑। परा॑। सु॒व॒। यत्। भ॒द्रम्। तत्। नः॒। आ। सु॒व॒ ॥३ ॥


    स्वर रहित मन्त्र

    विश्वानि देव सवितर्दुरितानि परा सुव । यद्भद्रन्तन्नऽआ सुव ॥


    स्वर रहित पद पाठ

    विश्वानि। देव। सवितः। दुरितानीति दुःऽइतानि। परा। सुव। यत्। भद्रम्। तत्। नः। आ। सुव॥३॥

    यजुर्वेद - अध्याय » 30; मन्त्र » 3
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (देव) उत्तम गुण, कर्म स्वभाव युक्त (सवितः) (उपासकांना) उत्तम गुण, कर्म स्वभाव धारण करण्याची प्रेरणा देणारे हे परमेश्‍वर, आपण आमच्या (विश्‍वानि) समस्त (दुरितानि) दुराचरण अथवा दुःख यांना (परा, सुन) दूर करा आणि (यत्) जे (भद्रम्) कल्याणकारी धर्मयुक्त आचरण आहे, (तत्) ते (नः) आमच्यासाठी (आ, सुव) प्राप्त करून द्या (आम्ही सदा धर्ममय कल्याणकारी मार्गावर चालावे, अशी आम्हांस बुद्धी वा प्रेरणा द्या) ॥3॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे उपासकांद्वारा प्रार्थित परमेश्‍वर आपल्या भक्तांना दुराचरणापासून निवृत्त करतो आणि सदाचरणाकडे प्रवृत्त करतो. तसे राजानेदेखील प्रजाजनांना अधर्मापासून निवारित करावे आणि धर्मात प्रवृत्त करावे. तसेच राजाने स्वतः देखील दुराचारापासून दूर व धर्माचे अनुसरण केले पाहिजे. ॥3॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top