Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 38/ मन्त्र 1
    ऋषिः - आथर्वण ऋषिः देवता - सविता देवता छन्दः - उष्णिक् स्वरः - ऋषभः
    2

    दे॒वस्य॑ त्वा सवि॒तुः प्र॑स॒वेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पू॒ष्णो हस्ता॑भ्याम्।आ द॒देऽदि॑त्यै॒ रास्ना॑ऽसि॥१॥

    स्वर सहित पद पाठ

    दे॒वस्य॑। त्वा॒। स॒वि॒तुः। प्र॒स॒व इति॑ प्रस॒वे। अ॒श्विनोः॑। बा॒हुभ्या॒मिति॑ बा॒हुऽभ्या॑म्। पू॒ष्णः। हस्ता॑भ्याम् ॥ आ। द॒दे॒। अदि॑त्यै। रास्ना॑। अ॒सि॒ ॥१ ॥


    स्वर रहित मन्त्र

    देवस्य त्वा सवितुः प्रसवे श्विनोर्बाहुभ्याम्पूष्णो हस्ताभ्याम् । आ ददेदित्यै रास्नासि ॥


    स्वर रहित पद पाठ

    देवस्य। त्वा। सवितुः। प्रसव इति प्रसवे। अश्विनोः। बाहुभ्यामिति बाहुऽभ्याम्। पूष्णः। हस्ताभ्याम्॥ आ। ददे। अदित्यै। रास्ना। असि॥१॥

    यजुर्वेद - अध्याय » 38; मन्त्र » 1
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (टीप - या मंत्राचा पूर्वार्ध भाग विवाह-संस्कारा च्यावेळी ‘मधुपर्स विधि’ प्रसंगी उच्चारला जातो. त्यामुळे हे स्त्री, हे संबोधन वधूला उद्देशून आहे, असे जाणावे.) हे स्त्री (वधू) तू (अदित्यै) अविनाशी नीतीविषयी (जी व्यवहारनीती गृहस्थाश्रमात सध्या वापरली जावी, अशा नीतिविषयी) (रास्नां) दानशीला (असि) (आवश्यक गृहाश्रम-कार्यासाठी अर्थव्यय करणारी आहेस), अशी माझी तुझ्यांकडून अपेक्षा आहे) म्हणून (सवितुः) समस्त जगाचे उत्पादक (देवस्य) इष्टदेव परमेश्‍वराने (प्रसव) उत्पन्न केलेल्या या जगात (अश्‍विनोः) सूर्य आणि चंद्र यांच्या (बाहुभ्याम्) शक्ती पराक्रमाप्रमाणे असलेल्या माझ्या या बाहूंद्वारे मी (तुझा वर) (त्वा) तुला (आ, ददे) ग्रहण करीत आहे. (पूष्णः) पोषकवायूप्रमाणे (हस्ताभ्याम्) हे माझे दोन हात (तुझे पोषण करण्यात व रक्षण करण्यात समर्थ आहेत) ॥1॥

    भावार्थ - भावार्थ - हे स्त्री, (वधू) ज्याप्रमाणे सूर्य भूमीचे प्राण शरीराचे आणि अध्यापक-उपदेशक सत्याचे ग्रहण करतात, तद्दत मी (वर) तुझा स्वीकार करीत आहे. तू सदा माझ्याकरिता सुखदायिनी हो ॥1॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top