Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 40/ मन्त्र 11
    ऋषिः - दीर्घतमा ऋषिः देवता - आत्मा देवता छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    7

    सम्भू॑तिं च विना॒शं च॒ यस्तद्वेदो॒भय॑ꣳ स॒ह।वि॒ना॒शेन॑ मृ॒त्युं ती॒र्त्वा सम्भू॑त्या॒मृत॑मश्नुते॥११॥

    स्वर सहित पद पाठ

    सम्भू॑ति॒मिति॒ सम्ऽभू॑तिम्। च॒। वि॒ना॒शमिति॑ विऽना॒शम्। च॒। यः। तत्। वेद॑। उ॒भय॑म्। स॒ह ॥ वि॒ना॒शेनेति॑ विना॒शेन॑। मृ॒त्युम्। ती॒र्त्वा। सम्भू॒त्येति॒ सम्ऽभू॑त्या। अ॒मृत॑म्। अ॒श्नु॒ते॒ ॥११ ॥


    स्वर रहित मन्त्र

    सम्भूतिञ्च विनाशञ्च यस्तद्वेदोभयँ सह । विनाशेन मृत्युन्तीर्त्वा सम्भूत्यामृतमश्नुते ॥


    स्वर रहित पद पाठ

    सम्भूतिमिति सम्ऽभूतिम्। च। विनाशमिति विऽनाशम्। च। यः। तत्। वेद। उभयम्। सह॥ विनाशेनेति विनाशेन। मृत्युम्। तीर्त्वा। सम्भूत्येति सम्ऽभूत्या। अमृतम्। अश्नुते॥११॥

    यजुर्वेद - अध्याय » 40; मन्त्र » 11
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यानो, (यः) जो विद्वान (सम्भूतिम्) ज्यात सर्व पदार्थ उत्पन्न होतात, त्या कार्यरूप सृष्टीच्या (च) गुण, कर्म आणि स्वभावाला तसेच (विनाशम्) ज्यात सर्व पदार्थ नष्ट होतात, त्या कारणरूप जगाला (च) आणि त्याच्या गुण, कर्म, स्वभावा (सह) सह जगाला (वेद) जाणतो म्हणजे कारण प्रकृती व कार्य जगत या (उभयम्) दोन्हाला जाणतो. (दोन्हीचे गुण, कर्म, स्वभाव ओळखतो) तो विद्वान (विनाशेन) हे नित्य आहे’ असे जाणलेल्या कारणाने (प्रकृती व आत्मा नित्य व अविनाशी आहेत, हे जाणून) (मृत्युम्) शरीर त्यागाच्या वेळी होणार्‍या दुःखाला (तीर्त्वा) पार करून जातो (मृत्युसमयी त्याला दुःख होत नाही) आणि तो विद्वान (सम्भूत्या) शरीर, इंद्रियें आणि अंतःकरणरूप कार्य धर्मात करणार्‍या सृष्टीसह (अमृतम्) मोक्षसुख (अश्‍नुते) प्राप्त करतो. ॥11॥

    भावार्थ - भावार्थ - हे मनुष्यानो, कार्यकारणरूप पदार्थ निरर्थक वा व्यर्थ नाहीत. कार्याचे व कारणाचे (उत्पन्न पदार्थ व प्रकृतीचे) गुण, कर्म, स्वभाव जाणून, धर्म आदी मोक्षाच्या साधनांशी त्या कार्यकारणाचा संयोग करता येतो. अशाप्रकारे आपल्या शरीरादीचे कार्य आणि कारण प्रकृतीचे नित्यत्व ओळखल्यास मृत्यूचे भय राहत नाही आणि माणूस मोक्षसिद्धीसाठी यत्न करतो. अशाप्रकारे कार्यकारण सत्वरूप ओळखून महत्त्वाचे अन्य लाभ प्राप्त केले पाहिजे. मात्र कार्यकारणाचा निषेध तिथे करावा, जिथे परमेश्‍वराची उपासना सोडून माणूस अन्य विषयी रममाण असेल. ॥11॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top