Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 40/ मन्त्र 13
    ऋषिः - दीर्घतमा ऋषिः देवता - आत्मा देवता छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    4

    अ॒न्यदे॒वाहुर्वि॒द्याया॑ऽअ॒न्यदा॑हु॒रवि॑द्यायाः। इति॑ शुश्रुम॒ धीरा॑णां॒ ये न॒स्तद्वि॑चचक्षि॒रे॥१३॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒न्यत्। ए॒व। आ॒हुः। वि॒द्यायाः॑। अ॒न्यत्। आ॒हुः॒। अवि॑द्यायाः ॥ इति॑। शु॒श्रु॒म॒। धीरा॑णाम्। ये। नः॒। तत्। वि॒च॒च॒क्षि॒रे इति॑ विऽचचक्षि॒रे ॥१३ ॥


    स्वर रहित मन्त्र

    अन्यदेवाहुर्विद्यायाऽअन्यदाहुरविद्यायाः । इति शुश्रुम धीराणाँ ये नस्तद्विचचक्षिरे ॥


    स्वर रहित पद पाठ

    अन्यत्। एव। आहुः। विद्यायाः। अन्यत्। आहुः। अविद्यायाः॥ इति। शुश्रुम। धीराणाम्। ये। नः। तत्। विचचक्षिरे इति विऽचचक्षिरे॥१३॥

    यजुर्वेद - अध्याय » 40; मन्त्र » 13
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यानो, जे विद्वज्जन मागे होते, त्यानी (नः) आम्हाला (आम्हा दुसर्‍या कक्षेतल्या विद्वानांना) (विचचक्षिरे) विस्ताराने सांगत होते की (विद्यायाः) पूर्वीच्या मंत्रात सांगितलेल्या विद्येचे (अन्यत्) दुसरे वा वेगळेच कार्य वा फळ आहे (आहुः) (असे त्यांनी आम्हांस सांगितले) (तसेच ते हे देखील सांगत होते की) (अविद्याया) मागील मंत्रात अविद्येचे जे स्वरूप सांगितले आहे त्या अविद्येचे फळ देखील (अन्यत्) वेगळेच आहे (विद्या आणि अविद्या दोन्हीचे फळ वा परिणाम वेगवेगळा आहे) त्या (धीराणाम्) आत्मज्ञानी विद्वानांकडून (तत्) त्या पूर्ववर्णित ज्ञान वा उपदेशाचे आम्ही (शुश्रुम) श्रवण करीत होतो. हे मनुष्यानो (सामान्यजनहो) ते ज्ञान तुम्हीही आमच्याकडून ऐका. ॥13॥

    भावार्थ - भावार्थ - अनादि चेतन सत्ता (ईश्‍वर) पासून जे ग्रहणीय आहे, जे लाभ प्राप्त होतात, ते अज्ञानयुक्त जड पदार्थापासून कदापि प्राप्त होणार नाहीत. तसेच जे प्रयोजन वा कार्य जड, अचेतन पदार्थापासून (जल, अग्नी, आदीपासून पूर्ण होतात, ते प्रयोजन चेतनाने सिद्ध होणार नाहीत, सर्व लोकांसाठी हेच हितकर आहे की त्यानी विद्वत्संग, योगाभ्यास, विज्ञान आणि धर्माचरण या सर्वांच्या साह्याने, या दोन्हीचा (जड व चेतन यांचा) नीट विवेक-विचार करून त्यापासून योग्य ते लाभ घ्यावेत. ॥13॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top