Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 40/ मन्त्र 12
    ऋषिः - दीर्घतमा ऋषिः देवता - आत्मा देवता छन्दः - निचृदनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    2

    अ॒न्धन्तमः॒ प्र वि॑शन्ति॒ येऽवि॑द्यामु॒पास॑ते।ततो॒ भूय॑ऽइव॒ ते तमो॒ यऽउ॑ वि॒द्याया॑ र॒ताः॥१२॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒न्धम्। तमः॑। प्र। वि॒श॒न्ति॒। ये। अवि॑द्याम्। उ॒पास॑त॒ इत्यु॑प॒ऽआस॑ते ॥ ततः॑। भूय॑ऽइ॒वेति॒ भूयः॑ऽइव। ते। तमः॑। ये। ऊँ॒ऽइत्यूँ॑। वि॒द्याया॑म्। र॒ताः ॥१२ ॥


    स्वर रहित मन्त्र

    अन्धन्तमः प्रविशन्ति येविद्यामुपासते । ततो भूयऽइव ते तमो यऽउ विद्यायाँ रताः ॥


    स्वर रहित पद पाठ

    अन्धम्। तमः। प्र। विशन्ति। ये। अविद्याम्। उपासत इत्युपऽआसते॥ ततः। भूयऽइवेति भूयःऽइव। ते। तमः। ये। ऊँऽइत्यूँ। विद्यायाम्। रताः॥१२॥

    यजुर्वेद - अध्याय » 40; मन्त्र » 12
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (ये) जे मनुष्य (अविद्याम्) अविद्येची (उपासते) उपासना करतात म्हणजे अनित्य शरीरादीना नित्य मानतात, अशुद्धात शुद्ध भावना करतात दुःखात सुख मानतात आणि अवात्म्म्यात म्हणजे शरीरादीमधे आत्मतु ही ठेवतात, ते अविद्यावान आहेत. अर्थात् परमेश्‍वराची उपासना सोडून ज्यात ज्ञान आदीगुण नाहीत, अशा जड पदार्थांची उपासना करतात, ते अविद्यावान वा अज्ञानी आहेत. ते लोक (अन्धम्, तमः) दृष्टिरोधक अंधकारात म्हणजे अत्यधिक अज्ञानात (प्र, विशन्ति) सापडतात, तसेच (ये) जे मयुष्य (विद्यायाम्) शब्द, अर्थ आणि या दोन्हीचा सम्बंध यांचे अर्थात साहित्य वा ज्ञानाचे विशेष अध्ययन करतात, पण अवैदिक आचरणा (रतः) रमतात (आचरणभ्रष्ट असतात) (ते) ते लोक (उ) देखील (ततः) त्यांच्यापेक्षा म्हणजे अविद्यावान लोकांपेक्षा (भूय, इव) अधिक गाढ (तमः) अज्ञानरूप अंधकारात प्रविष्ट होतात. ॥12॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. जगात जे जे चेतन व ज्ञान युक्त पदार्थ आहेत, ते ज्ञाता म्हणजे जाणणारे आहेत आणि जे अविद्यारूप आहे, ते ज्ञातव्य आहे. जो चेतन ब्रह्म आणि जो विद्वानांचा आत्मा आहे, हे दोन उपासनीय वा सेवनीय आहे (ब्रह्माची उपासना व विद्वानांची सेवा केली पाहिजे) याहून जे जे भिन्न आहे, त्याची उपासना करू नये, पण त्या पदार्थांपासून उपयोग वा लाभ अवश्य घेतला पाहिजे. जे मनुष्य अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि ??? नाम क्लेशात गुरफटलेले असतात, हे परमेश्‍वराची उपासना न करता जड पदार्थांची (मूर्ती आदीची) पूजा, उपासना करतात. परिणामी महान दुःख सागरात बुडतात. तसेच जे शब्द, अर्थ, अन्वय अथवा संस्कृत भाषा शिकून घेतात, पण सत्यभाषण, पक्षपातरहित न्यायाचरण, आदी धर्माचे आचरण करीत नाहीत, उलट विद्येच्या गर्वात मदमन्त होऊन सत्य विदयेचा तिरस्कार करतात आणि अविद्येवर विश्‍वास ठेवतात, ते अत्यन्त तमोगुणरूप दुःखसागरात सांपडून सदा त्रस्त वा पिडित होतात. ॥12॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top