Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 40/ मन्त्र 14
    ऋषिः - दीर्घतमा ऋषिः देवता - आत्मा देवता छन्दः - स्वराडुष्णिक् स्वरः - ऋषभः
    4

    वि॒द्यां चावि॑द्यां च॒ यस्तद्वेदो॒भय॑ꣳ स॒ह।अवि॑द्यया मृ॒त्युं ती॒र्त्वा वि॒द्यया॒मृत॑मश्नुते॥१४॥

    स्वर सहित पद पाठ

    वि॒द्याम्। च॒। अवि॑द्याम्। च॒। यः। तत्। वेद॑। उ॒भय॑म्। स॒ह ॥ अवि॑द्यया। मृ॒त्युम्। ती॒र्त्वा। वि॒द्यया॑। अ॒मृत॑म्। अ॒श्नु॒ते॒ ॥१४ ॥


    स्वर रहित मन्त्र

    विद्याञ्चाविद्याञ्च यस्तद्वेदोभयँ सह । अविद्यया मृत्युन्तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते ॥


    स्वर रहित पद पाठ

    विद्याम्। च। अविद्याम्। च। यः। तत्। वेद। उभयम्। सह॥ अविद्यया। मृत्युम्। तीर्त्वा। विद्यया। अमृतम्। अश्नुते॥१४॥

    यजुर्वेद - अध्याय » 40; मन्त्र » 14
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (यः) जो विद्वान (विद्याम्) पूर्व मंत्रात वर्णित विद्या (च) आणि विद्यासंबंधी साधनें, उपसाधनें कोणती, हे जाणतो तसेच (अविद्याम्) पूर्ववर्णित अविद्या (च) अविद्येच्या साधन-समूह काय हे जाणतो तसेच (उभयम्) त्या दोन्हीतील (तत्) ज्ञातव्य मर्म काय हे (सह) योग्य रीतीने (वेद) जाणतो, तो (अविद्यया) शरीर आदी. उत्तेतन पदार्थांद्वारे केलेल्या पुरुषार्थाद्वारे (मृत्युम्) मृत्यूचे भय नाम दुःखाला (तीर्त्वा) उल्लंघून जातो आणि (विद्यया) आत्मा आणि शुद्ध अंतःकरण यांत धर्माच्या संयोगाने उत्पन्न यथार्थ ज्ञान व विद्या, याने (अमृतम्) स्वतःच्या नित्य स्वरूपाला वा नित्यस्वरूप परमात्म्याला (अश्‍नुते) प्राप्त करतो. ॥14॥

    भावार्थ - भावार्थ - जे मनुष्य विद्येचे अविद्येचे स्वरूप ओळखून हे जाणतात की या दोन्ही जड चेतन पदार्थांचे साधक मात्र आहेत, ते लोक शरीर आदी अचेतन पदार्थांचा आणि चेतन आत्म्याचा उपयोग धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांच्या सिद्धीसाठी करतात. ते लोक लौकिक दुःख दूर सारून परमार्थ-सुख प्राप्त करतात. जर अचेतन प्रकृती आदी कारण आणि शरीर आदी कार्यें असणार नाहीत, तर परमेश्‍वर सृष्टीची उत्पत्ती कशी करणार आणि जी कर्म, उपासना व ज्ञानप्राप्ती कशी करू शकणार (त्यामुळे चेतन व अचेतन दोन्हीची आवश्यकता यावरून हे सिद्ध होते की केवळ अचेतन (प्रकृती) अथवा केवळ चेतन (ब्रह्म) कार्यसिद्धी होत नाही (दोन्हीची आवश्यकता आहे) तसेच केवळ कर्माने अथवा केवळ ज्ञानाने धर्म पदार्थाची प्राप्ती करण्यात कोणी समर्थ होऊ शकत नाही (कर्म व ज्ञान या दोन्हीची आवश्यकता हेतुसिद्धी करिता आहे) ॥14॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top