Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 36/ मन्त्र 3
    ऋषिः - विश्वामित्र ऋषिः देवता - सविता देवता छन्दः - दैवी बृहती, निचृद्गायत्री स्वरः - मध्यमः,षड्जः
    1

    भूर्भुवः॒ स्वः। तत्स॑वि॒तुर्वरे॑ण्यं॒ भर्गो॑ दे॒वस्य॑ धीमहि।धियो॒ यो नः॑ प्रचो॒दया॑त्॥३॥

    स्वर सहित पद पाठ

    भूः। भुवः॑। स्वः᳖। तत्। स॒वि॒तुः। वरे॑ण्यम्। भर्गः॑। दे॒वस्य॑। धी॒म॒हि॒ ॥ धियः॑। यः। नः॒। प्र॒चो॒दया॒दिति॑ प्रऽचो॒दया॑त् ॥३ ॥


    स्वर रहित मन्त्र

    भूर्भुवः स्वः । तत्सवितुर्वरेण्यम्भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयत् ॥


    स्वर रहित पद पाठ

    भूः। भुवः। स्वः। तत्। सवितुः। वरेण्यम्। भर्गः। देवस्य। धीमहि॥ धियः। यः। नः। प्रचोदयादिति प्रऽचोदयात्॥३॥

    यजुर्वेद - अध्याय » 36; मन्त्र » 3
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यानो, ज्याप्रमाणे आम्ही (उपासक) (भूः) कर्म विद्या, (भुवः) उपासना विद्या आणि (स्वः) ज्ञानविद्या या सर्व विद्यांचा संग्रह करीत (नः) आमच्या (यः) ज्या (धियः) धारणामय बुद्धी आहेत तिला वा विचारांना (प्रचोदयात्) प्रेरित करतो (तद्वत, तुम्हीही तुमच्या विचारांना प्रेरित उत्साहित करा) तसेच (देवस्य) त्या कमनीय इष्ट (सवितुः) समग्र ऐश्‍वर्यदाता परमेश्‍वराच्या (तत्) ज्याला इंद्रियाद्वारे ग्रहण करणे शक्य नाही, अशा अतींद्रिय परोक्ष (भर्गः) सर्वदुःखनाशक ते ज्याचे आम्ही (धीमहि) ध्यान करू वा करतो, त्याप्रमाणे, हे मनुष्यानो, तुम्ही बुद्धीद्वारे त्या परमेश्‍वराच्या तेजाचे ध्यान करा. ॥3॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. मनुष्य कर्म, उपासना आणि ज्ञानविषयक विद्या सम्यकप्रकारे अवगत करतात, आणि त्या समग्र ऐश्‍वर्यवान परमेश्‍वराशी आत्म्याला संयुक्त करतात, तसेच अधर्म, अनैश्‍वर्य आणि दुःखरूपमळांचा त्याग करून ऐश्‍वर्य व सुख संपादित करतात, त्यांना तो अंतर्यामी ईश्‍वर स्वयमेव धर्मानुष्ठान करण्याची व अधर्मत्यागाची प्रेरणा देतो. ॥3॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top