Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 22/ मन्त्र 12
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - सविता देवता छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः
    5

    सु॒ष्टु॒तिꣳ सु॑मती॒वृधो॑ रा॒तिꣳ स॑वि॒तुरी॑महे। प्र दे॒वाय॑ मती॒विदे॑॥१२॥

    स्वर सहित पद पाठ

    सु॒ष्टु॒तिम्। सु॒स्तु॒तिमिति॑ सुऽस्तु॒तिम्। सु॒म॒ती॒वृधः॑। सु॒म॒ति॒वृध॒ इति॑ सुमति॒ऽवृधः॑। रा॒तिम्। स॒वि॒तुः। ई॒म॒हे॒। प्र। दे॒वाय॑। म॒ती॒विदे॑। म॒ति॒विद॒ इति॑ मति॒ऽविदे॑ ॥१२ ॥


    स्वर रहित मन्त्र

    सुष्टुतिँ सुमतीवृधो रातिँ सवितुरीमहे । प्र देवाय मतीविदे ॥


    स्वर रहित पद पाठ

    सुष्टुतिम्। सुस्तुतिमिति सुऽस्तुतिम्। सुमतीवृधः। सुमतिवृध इति सुमतिऽवृधः। रातिम्। सवितुः। ईमहे। प्र। देवाय। मतीविदे। मतिविद इति मतिऽविदे॥१२॥

    यजुर्वेद - अध्याय » 22; मन्त्र » 12
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मुनष्यांनो, ज्याप्रमाणे आम्ही (उपासनेद्वारे ईश्वराकडून सुबुद्धी मागितलेले उपासक) (सुमतीवृधः) श्रेष्ठ बुद्धी उत्पन्न करणाऱ्या वा सद्बुद्धीची वृद्धी करणाऱ्या त्या (सवितुः) सर्वोत्पादक परमेश्वराची (सष्टुतिम्‌) सुंदर स्तुती करून (मतीविदे) ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा असलेल्या (देवाय) विद्या आदी गुणांची कामना करणाऱ्या व्यक्तीसाठी (रातिम्‌) ज्ञान व बुद्धी देण्यासाठी (प्रेमहे) त्या परमेश्वराजवळ विनम्रभावे मागत आहोत (परमेश्वराकडून सद्बुद्धी व सद्गुण प्राप्त करून आमच्याप्रमाणे इतरांनाही ती मिळावी, अशी भावना करीत आहोत. हे मनुष्यानो, अशा या दान-प्रदान करण्याचे कार्य करण्यासाठी तुम्हीदेखील त्या परमेश्वराजवळ (सद्बुद्धी व सद्विचारांची) याचना मनोभावें करा (वा करीत जा) ॥12॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्या ज्या वेळी परमेश्वराची प्रार्थना करणे होईल, त्या त्या वेळी उपासकाने स्वतःसाठी तसेच इतरांसाठी समस्त शास्त्र-विज्ञानमय अशी उत्तम बुद्धीच मागावी. कारण की अशा सद्बुद्धीमुळेच जीव समस्त सुखांची साधनें प्राप्त करू शकतात ॥12॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top