Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 22/ मन्त्र 9
    ऋषिः - विश्वामित्र ऋषिः देवता - सविता देवता छन्दः - निचृद्गायत्री स्वरः - षड्जः
    1

    तत्स॑वि॒तुर्वरे॑ण्यं॒ भर्गो॑ दे॒वस्य॑ धीमहि। धियो॒ यो नः॑ प्रचो॒दया॑त्॥९॥

    स्वर सहित पद पाठ

    तत्। स॒वि॒तुः। वरे॑ण्यम्। भर्गः॑। दे॒वस्य॑। धी॒म॒हि॒। धियः॑। यः। नः॒। प्र॒चो॒दया॒दिति॑ प्रऽचो॒दया॑त्॥९ ॥


    स्वर रहित मन्त्र

    तत्सवितुर्वरेण्यम्भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयत् ॥


    स्वर रहित पद पाठ

    तत्। सवितुः। वरेण्यम्। भर्गः। देवस्य। धीमहि। धियः। यः। नः। प्रचोदयादिति प्रऽचोदयात्॥९॥

    यजुर्वेद - अध्याय » 22; मन्त्र » 9
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (सवितुः) सर्व जगाची उत्पत्ती करणाऱ्या (देवस्य) स्वतःच्या सामर्थ्याने स्वप्रकाशमान सर्वांद्वारे वांछनीय, आणि सर्वसुख देणाऱ्या अशा परमेश्वराच्या ज्या (वरेण्यम्‌) स्वीकरणीय वा धारणीय अत्युत्तम (भर्गः) समस्त दोषांचे दहन करणाऱ्या तेजोमय शुद्धस्वरूपाचे (धीमहि) (आम्ही विद्वज्जन, योगी अथवा उपासक) धारण करतो (त्या तेजोमय रूपाद्वारे स्वतः तेजोमय होण्यास यत्न करतो) (तत्‌) त्या तेजाला तुम्ही सर्व (सामान्य वा जिज्ञासूजन) यांनी धारण करावे. (यः) तो परमेश्वर (नः) आम्हा सर्वांच्या (धियः) बुद्धीला (विचारांना व मतीला) (प्रचोदयात्‌) प्रेरित करो अथति) आमच्या बुद्धीला व विचारांना चांगल्या-चांगल्या कामांत पवृत्त करो. तो अंतर्यामी परमेश्वरच सर्वाद्वारे उपासनीय असा आहे ॥9॥

    भावार्थ - भावार्थ - सर्व लोकांसाठी आवश्यक आहे की त्यांनी सच्चिदानंदस्वरूप, नित्य, शुद्धबुद्धी, मुक्तस्वभाव, सर्वान्तर्यामी परमात्म्याचीच उपासना करावी अशा परमात्म्याला सोडून त्याच्याठिकाणी इतर कोणत्याही पदार्थाची (मूर्त अथवा व्यक्तीची) स्थापना, उपासना कदापि करूं नये. हे कां? कारण की आमच्या उपासनेमुळे परमात्मा आमच्या बुद्धीला (विचारांना व मतांना) कदापि अधर्माचरण-मार्गावर जाऊ देणार नाही, बुद्धीला धर्माचरणाकडे प्रवृत्त करील. अशा प्रकारे त्याच्या उपासनेमुळे शुद्ध झालेले आम्ही त्या परमेश्वराला प्राप्त करून इहलोकातील व परलोकातील (परजन्मातील) सुखें उपभोगू शकू ॥9॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top