Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 22/ मन्त्र 6
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - अग्न्यादयो देवताः छन्दः - भुरिगतिजगती स्वरः - निषादः
    5

    अ॒ग्नये॒ स्वाहा॒ सोमा॑य॒ स्वाहा॒पां मोदा॑य॒ स्वाहा॑ सवि॒त्रे स्वाहा॑ वा॒यवे॒ स्वाहा॒ विष्ण॑वे॒ स्वाहेन्द्रा॑य॒ स्वाहा॒ बृह॒स्पत॑ये॒ स्वाहा॑ मि॒त्राय॒ स्वाहा॒ वरु॑णाय॒ स्वाहा॑॥६॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒ग्नये॑। स्वाहा॑। सोमा॑य। स्वाहा॑। अ॒पाम्। मोदा॑य। स्वाहा। स॒वि॒त्रे। स्वाहा॑। वा॒यवे॑। स्वाहा॑। वि॒ष्णवे॑। स्वाहा॑। इन्द्रा॑य। स्वाहा॑। बृह॒स्पत॑ये। स्वाहा॑। वरु॑णाय। स्वाहा॑ ॥६ ॥


    स्वर रहित मन्त्र

    अग्नये स्वाहा सोमाय स्वाहा अपाम्मोदाय स्वाहा सवित्रे स्वाहा वायवे स्वाहा विष्णवे स्वाहेन्द्राय स्वाहा बृहस्पतये स्वाहा मित्राय स्वाहा वरुणाय स्वाहा ॥


    स्वर रहित पद पाठ

    अग्नये। स्वाहा। सोमाय। स्वाहा। अपाम्। मोदाय। स्वाहा। सवित्रे। स्वाहा। वायवे। स्वाहा। विष्णवे। स्वाहा। इन्द्राय। स्वाहा। बृहस्पतये। स्वाहा। वरुणाय। स्वाहा॥६॥

    यजुर्वेद - अध्याय » 22; मन्त्र » 6
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - जर जगातील माणसें (अग्नेय) अग्नीसाठी वा (अग्नीविषयी) (स्वाहा) श्रेष्ठ क्रिया करतील (त्याविषयी प्रयोग, शोध उपयोग आदीसाठी यत्न करतील) अथवा (सोमाय) औषधींच्या शोधन, शुद्धीकरणादीविषयी (स्वाहा) उत्तम क्रिया करतील, तसेच जर ते (अपाम्‌) जलापासून मिळणाऱ्या (मोदाय) आनंदाचा (स्वाहा) उपयोग घेतील (तर त्यांना कोणतेही सुख का मिळणार नाहीं? अर्थात अवश्य मिळेल) तसेच जर माणसांनी (सवित्रे) सूर्यमंडलापासून मिळणाऱ्या (स्वाहा) उत्तम क्रिया केल्या, (विष्णवे) विद्युतरूप अग्नीविषयी (स्वाहा) उत्तम क्रिया केले (इन्द्राय) जीवासाठी (सर्व प्राण्यांसाठी) (स्वाहा) उत्तम कर्में केली (बृहस्पतये) थोरा-मोठ्यांचे (विद्वान, वयोवृद्धजनांचे) पालन-रक्षण करणाऱ्यासाठी (स्वाहा) चांगले आचरण केले, (मित्राय) आपापल्या ???? (स्वाहा) हितकर प्रिय कामें केली आणि सरते शेवटीं (वरूणाय) समाजातील श्रेष्ठजनांसाठी (स्वाहा) सेवा आदी उत्तम कर्में केली, तर त्यांना कोणतेही वा पाहिजे ते सुख या जगात का मिळणार नाहीं? अर्थात अवश्य मिळेल ॥6॥

    भावार्थ - भावार्थ - हे मनुष्यांनो, उत्तमप्रकारे तयार केलेले तूप आदी जे पदार्थ हवनात आहुत केले जातात, ते पदार्थ व त्या औषधी, जल, सूर्याची किरणें वा प्रकाश, वायू आणि विद्युत या सर्वांना शुद्ध करतात आणि होत्याची ऐश्वर्यवृद्धी करून, प्राण, अपान, प्रजा, आदीच्या रक्षणाचे तसेच श्रेष्ठजनांच्या सत्काराचे कारण ठरतात. कोणतेही द्रव्य स्वरूपाने नष्ट होत नाही फक्त अवस्थान्तराने ते द्रव्य सर्वत्र वेगळा परिणाम देतात. यामुळे त्या औषधी पदार्थ आपल्या मधुर पुष्टिकारक आणि रोगविनाशक गुण अग्नीमधे अर्पित करतात याकरिता औषधी वनस्पती आदी पदार्थांचे शुद्धिकरण करून सर्वांनी या जगाला नीरोग केले पाहिजे ॥6॥^मनुष्यांनी आणि रोगविनाशक गुण अग्नीमधे अर्पित करतात. या करिता औषधी वनस्पती आदी पदार्थांचे शुद्धीकरण करून सर्वांनी या जगाला नीरोग केले पाहिजे ॥6॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top