Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 4/ मन्त्र 19
    ऋषिः - वत्स ऋषिः देवता - वाग्विद्युतौ देवते छन्दः - निचृत् ब्राह्मी पङ्क्ति, स्वरः - पञ्चमः
    2

    चिद॑सि म॒नासि॒ धीर॑सि॒ दक्षि॑णासि क्ष॒त्रिया॑सि य॒ज्ञिया॒स्यदि॑तिरस्युभयतःशी॒र्ष्णी। सा नः॒ सुप्रा॑ची॒ सुप्र॑तीच्येधि मि॒त्रस्त्वा॑ प॒दि ब॑ध्नीतां पू॒षाऽध्व॑नस्पा॒त्विन्द्रा॒याध्य॑क्षाय॥१९॥

    स्वर सहित पद पाठ

    चित्। अ॒सि॒। म॒ना। अ॒सि॒। धीः। अ॒सि॒। दक्षि॑णा। अ॒सि॒। क्ष॒त्रिया॑। अ॒सि॒। य॒ज्ञिया॑। अ॒सि॒। अदि॑तिः। अ॒सि॒। उ॒भ॒य॒तः॒शी॒र्ष्णीत्यु॑भयतःऽशी॒र्ष्णी। सा। नः॒ सुप्रा॒चीति॒ सुऽप्रा॑ची। सुप्र॑ती॒चीति॒ सुऽप्र॑तीची। ए॒धि॒। मि॒त्रः॒। त्वा॒। प॒दि। ब॒ध्नी॒ता॒म्। पू॒षा। अध्व॑नः। पा॒तु॒। इन्द्रा॑य। अध्य॑क्षा॒येत्यधि॑ऽअक्षाय ॥१९॥


    स्वर रहित मन्त्र

    चिदसि मनासि धीरसि दक्षिणासि क्षत्रियासि यज्ञियास्यदितिरस्युभयतःशीर्ष्णी । सा नः सुप्राची सुप्रतीच्येधि मित्रस्त्वा पदि बध्नीताम्पूषाध्वनस्पात्विन्द्रायाधक्षाय ॥


    स्वर रहित पद पाठ

    चित्। असि। मना। असि। धीः। असि। दक्षिणा। असि। क्षत्रिया। असि। यज्ञिया। असि। अदितिः। असि। उभयतःशीर्ष्णीत्युभयतःऽशीर्ष्णी। सा। नः सुप्राचीति सुऽप्राची। सुप्रतीचीति सुऽप्रतीची। एधि। मित्रः। त्वा। पदि। बध्नीताम्। पूषा। अध्वनः। पातु। इन्द्राय। अध्यक्षायेत्यधिऽअक्षाय॥१९॥

    यजुर्वेद - अध्याय » 4; मन्त्र » 19
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे जगदीश्‍वर, (सत्यसवसः) आपण सत्य आणि ऐश्‍वर्यमुक्त आहात (ते) आपण (प्रसवे) उत्पन्न केलेल्या या संसारामधे (सत्यसवस ते आणि प्रसवे, हे तीन शब्द या मंत्रात नाहीत, पण अर्थ आणि संदर्भाच्या स्पष्टीकरणासाठी क्र. 18 या पूर्वी आलेल्या मंत्रातून अनुवृत्ती म्हणून आले आहेत) (चित्) अविनाशी वाणी व / विद्युत या दोन वस्तू आहेत, त्यापैकी वाणी विद्यादान करणारी व /विद्युत कर्म व व्यवहार करण्याचे साधन (असि) आहे (यापूढे अनुक्रमें वाचावे) (मन्वः) वाणी ज्ञानदायिनी आहे / विद्युत साधन (असि) आहे (घीः) वाणी प्रज्ञा देणारी / विद्युत कर्म करण्यास सहाय्य करणारी (असि) आहे (दक्षिणा) वाणी विज्ञान प्राप्त करण्याचे साधन /विद्युत विजय मिळवून देणारी (असि) आहे (क्षत्रिय) वाणी उत्तम राज्या समान श्रेष्ठ / विद्युत पुत्राप्रमाणे म्हणजे आज्ञेप्रमाणे काम करणारी (असि) आहे. (यज्ञिया) वाणी यज्ञाचा आदेश देणारी विद्युत अग्नी यज्ञ करण्यात साधन (असि) आहे. (उभयतःशीर्ष्णी) दोन्ही मस्तकाप्रमाणे उत्तमगुणयुक्त आहेत (अदितीः) वाणी किंवा वेदवाणी अविनाशी आहे आणि विद्युतशक्ती आहे. ती वाणी व विद्युत (नः) आम्हां लोकांसाठी (सुप्राची) पूर्वकाळी सुख देणारी होती ती (सुप्रतीची) पश्‍चिम म्हणजे पुढील काळातही तशीच सुखदायिनी (एधि) होऊन वृद्धीस प्राप्त होवो (किंवा पूर्व दिशा, पश्‍चिम दिशा म्हणजे सर्व दिशांमधे सर्वत्र सुखे देणारी असो) (मित्रः) जो कोणी सर्वांचा मित्र होऊन मनुष्यतेच्या उत्कर्षासाठी त्या वाणीचा आणि विद्युतेचा (पदि) उत्तम व सर्व हितकारी कार्यामधे उपयोगात आणत असेल वा आणील, त्याने तो प्रयोग व उपयोग (अध्यक्षाय) सर्व व्यवहारांवर निरीक्षण करण्यासाठी व (इन्द्राय) परमेश्‍वरसाठी परमेश्‍वराच्या उपासनेसाठी किंवा (राष्ट्राच्या) अध्यक्षासाठी व चांगल्या कामासाठी (वध्नीताम्) उपयोग करावा. (वाणीचा) सदुपयोग करावा व विद्युतेपासून लाभ घ्यावेत) हे जगदीश्‍वर, आपण (अध्वनः) लौकिक व्यवहार पूर्ण करण्याच्या आणि परमार्थप्राप्तीच्या मार्गात (नः) आमचे निरंतर (पातु) रक्षण करा ॥19॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे. पूर्वीच्या मंत्रापासून (क्र. 18) (ते) (सत्यसवसः) (प्रसवे) या तीन शब्दांची अनुवृत्ती होत आहे. माणसाची बाह्य उच्चारीत वाणी व भीतर मनातील चिंतनपरक वाणी ही माणसांसाठी हितकारणी आहे, तद्वत विद्युतही (पदार्थांच्या आत विद्यमान व बाह्यरूपाने प्रकाशमान) मनुष्यांच्या भूत, भविष्यत् व वर्तमान या सर्वकाळांत सुख देत असते, हे सर्वांनी नीट समजून घ्यावे. त्याच बरोबर जो कोणी प्रेमाने परमेश्‍वराच्या आज्ञेचे पालन करतो व सभाध्यक्ष (राष्ट्राध्यक्ष) च्या आदेशांचे सर्व कामात पालन करतो आणि आपली शक्ती सत्य भाषण तसेच उत्तम कला, विद्या आदीच्या ग्रहणासाठी वापरले, तोच सर्वांचे रक्षण करण्यास समर्थ होतो. ॥19॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top