Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 4/ मन्त्र 22
    ऋषिः - वत्स ऋषिः देवता - वाग्विद्युतौ देवते छन्दः - ब्राह्मी पङ्क्ति, स्वरः - पञ्चमः
    2

    अदि॑त्यास्त्वा मू॒र्द्धन्नाजि॑घर्मि देव॒यज॑ने पृथि॒व्याऽइडा॑यास्प॒दम॑सि घृ॒तव॒त् स्वाहा॑। अ॒स्मे र॑मस्वा॒स्मे ते॒ बन्धु॒स्त्वे रायो॒ मे रायो॒ मा व॒यꣳ रा॒यस्पोषे॑ण॒ वियौ॑ष्म॒ तातो॒ रायः॑॥२२॥

    स्वर सहित पद पाठ

    अदि॑त्याः। त्वा॒। मू॒र्द्धन्। आ। जि॒घर्मि॒। दे॒व॒यज॑न॒ इति॑ देव॒ऽयज॑ने। पृ॒थि॒व्याः। इडा॑याः। प॒दम्। अ॒सि॒। घृ॒तव॒दि॑ति घृ॒तऽव॑त्। स्वाहा॑। अ॒स्मे॑ऽइत्य॒स्मे। र॒म॒स्व॒। अ॒स्मेऽइत्य॒स्मे। ते॒। बन्धुः॑। त्वेऽइति॒ त्वे। रायः॑। मेऽइति॒ मे। रायः॑। मा। व॒यम्। रा॒यः। पोषे॑ण। वि। यौ॒ष्म॒। तोतः॑। रायः॑ ॥२२॥


    स्वर रहित मन्त्र

    अदित्यास्त्वा मूर्धन्ना जिघर्मि देवयजने पृथिव्या इडायास्पदमसि घृतवत्स्वाहा । अस्मे रमस्वास्मे ते बन्धुस्त्वे रायो मे रायो मा वयँ रायस्पोषेण वि यौष्म तोतो रायः ॥


    स्वर रहित पद पाठ

    अदित्याः। त्वा। मूर्द्धन्। आ। जिघर्मि। देवयजन इति देवऽयजने। पृथिव्याः। इडायाः। पदम्। असि। घृतवदिति घृतऽवत्। स्वाहा। अस्मेऽइत्यस्मे। रमस्व। अस्मेऽइत्यस्मे। ते। बन्धुः। त्वेऽइति त्वे। रायः। मेऽइति मे। रायः। मा। वयम्। रायः। पोषेण। वि। यौष्म। तोतः। रायः॥२२॥

    यजुर्वेद - अध्याय » 4; मन्त्र » 22
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ -हे बुद्धिमान मनुष्यांनो, (देवयजने) विद्वज्जनाद्वारे केल्या जाणार्‍या या यज्ञात वा दानक्रियेत (आदित्याः) अंतरिक्षात (पृथिव्याः) व या पृथ्वीवर (इडायाः) वाणी वा वेदवाणीचे जे महत्त्वपूर्ण पद आहे, (स्वाहा) तसेच जसे यज्ञक्रियेमधे वेदवाणी (मूर्वन्) सर्वांच्या मूर्धस्थानी असे, आणि (घृतवत्) पुष्टिकारक घृताप्रमाणे राणीचे श्रेष्ठ महत्त्वाचे स्थान असते, त्या वेदवाणीचे उच्चारण करीत मी या यज्ञामधे अग्नीला (जिघर्मि) प्रदीप्त करतो. माझ्याप्रमाणे (त्वा) तुम्ही दखील त्या अग्नीला प्रदीप्त करा (हे हितैषी माणसांनो आपले कल्याणासाठी तुम्ही देखील माझ्याप्रमाणे वेदोच्चारण यव यजन करीत जा) (अस्मे) यजनामुळे आम्हांमधे जी विभूती वा ऐश्‍वर्य व्याप्त झाले आहे, तुम्ही लोकांमधे देखील (रमस्य) त्याचा प्रसार व्हावा (तुम्ही त्यापासून लाभान्वीत व्हा) (रमस्व) ज्याप्रमाणे मी यज्ञाद्वारे सर्वासाठी ऐश्‍वर्य वाढवीत आहे त्याप्रमाणे तुम्हीही वाढवा अशा प्रकारे एक समान कृत्यामुळे (यजनामुळे) जो (अस्मे) आमचा (बन्धु) भाऊ आहे, तो (ते) तुझा भाऊ होईल. (रायः) यज्ञाद्वारे वृद्धिगत विभूती विद्या (त्वे) जी तुझ्यात आहे, ती (मे) माझ्यासाठी होईल (तोतः) ज्ञातव्य व अप्तव्य असे जे (रायः) विद्याधन माझ्यात आहे, ते तुला मिळो किंवा मिळेल, आणि (रायः) तुझी व माझी समृद्धी सर्वांच्या सुखासाठी आहे, असे मानून व ठरवून तुम्ही, आम्ही व सर्वजण (रायस्पोषेण) धनाची पुष्टी वा सुबत्ता प्राप्त करू व त्या ऐश्‍वयर्यमय अवस्थेपासून (मा वियौष्म) आम्ही सर्वजण कधीही वंचित वा वियुक्त होऊ नये. (यज्ञाने विद्वानानी याज्ञिकांनी विद्या, समृद्धी प्राप्त करावी, ती सर्वांना द्यावी, सर्वांनी त्यांच्या प्रमाणेच ज्ञान व ऐश्‍वर्याचा प्रसार करावा व अशा दान परंपरेद्वारे सर्वजण सदा सुखी राहावेत, हा आशय आहे) ॥22॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे (उपमा आहे, पण तिचा वाचक शब्द ‘जसे, ज्याप्रमाणे- यथे, तथा, लुप्त आहेत) मनुष्यांनी सत्यविद्या आणि धर्माने संस्कारित अशा वाणीच्या प्रयोग करावा तसेच विविध प्रयोग, कृती आदीद्वारे विद्युत आदी विद्यांचे ज्ञान सर्वांना द्यावे. स्वतः त्याचे लाभ ग्रहण करावेत व इतरांना द्यावेत. या कार्यात सुख मिळो वा दुःख, त्याची चिंता न करता आपले सर्व ऐश्‍वर्य परोपकारकार्यात व्यय करावे. तसेच कोणाही माणसाने असा व्यवहार वा कार्य कदापी करूं नये की ज्यामुळे कोणाच्या विद्या वा धन आदी ऐश्‍वर्याची हानी होईल (सर्वानी सर्वांचे भले करावे.) ॥22॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top