Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 4/ मन्त्र 15
    ऋषिः - आङ्गिरस ऋषयः देवता - अग्निर्देवता छन्दः - ब्राह्मी बृहती, स्वरः - मध्यमः
    2

    पुन॒र्मनः॒ पुन॒रायु॑र्म॒ऽआग॒न् पुनः॑ प्रा॒णः पुन॑रा॒त्मा मऽआग॒न् पुन॒श्चक्षुः॒ पुनः॒ श्रोत्रं॑ म॒ऽआग॑न्। वै॒श्वा॒न॒रोऽद॑ब्धस्तनू॒पाऽअ॒ग्निर्नः॑ पातु दुरि॒ताद॑व॒द्यात्॥१५॥

    स्वर सहित पद पाठ

    पुनः॑। मनः॑। पुनः॑। आयुः॑। मे॒। आ। अ॒ग॒न्। पुन॒रिति॒ पुनः॑। प्रा॒णः। पुनः॑। आ॒त्मा। मे॒। आ। अ॒ग॒न्। पुन॒रिति॒ पुनः॑। चक्षुः॑। पुन॒रिति॒ पुनः॑। श्रोत्र॑म्। मे॒। आ। अ॒ग॒न्। वै॒श्वा॒न॒रः। अद॑ब्धः। त॒नू॒पा इति॑ तनू॒ऽपाः। अ॒ग्निः। नः॒ पा॒तु॒। दु॒रि॒तादिति॑ दुःइ॒तात्। अ॒व॒द्यात् ॥१५॥


    स्वर रहित मन्त्र

    पुनर्मनः पुनरायुर्म आगन्पुनः प्राणः पुनरात्मा म आगन्पुनश्चक्षुः पुनः श्रोत्रम्म आगन् । वैश्वानरो अदब्धस्तनूपा अग्निर्नः पातु दुरितादवद्यात् ॥


    स्वर रहित पद पाठ

    पुनः। मनः। पुनः। आयुः। मे। आ। अगन्। पुनरिति पुनः। प्राणः। पुनः। आत्मा। मे। आ। अगन्। पुनरिति पुनः। चक्षुः। पुनरिति पुनः। श्रोत्रम्। मे। आ। अगन्। वैश्वानरः। अदब्धः। तनूपा इति तनूऽपाः। अग्निः। नः पातु। दुरितादिति दुःइतात्। अवद्यात्॥१५॥

    यजुर्वेद - अध्याय » 4; मन्त्र » 15
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (या मंत्राचा संबंध भौतिक अग्नी व परमेश्‍वराशी आहे) अग्नीच्या संबंधाने वा परमेश्‍वराच्या कृपेने (मे) मला (मनः) ज्ञानसाधक मनाची तसेच (आयुः) जीवनाची व जन्माची (पुनः) वारंवार (आगम्) प्राप्ती होते (मला पुढील अनेक जन्मात पुन्हा वा अनेकवार मन आदी इंद्रिये मिळतात जीवन मिळते) (मे) मला (प्राण) शरीराचा आधार जो प्राण त्याची (पुनः) (आगन्) प्राप्ती होते (आत्मा) सर्वांत व्यापक असलेल्या अग्नी व भीतरील सर्व गोष्टीना जाणणार्‍या परमेश्‍वराची अनुभव (आगन्) प्राप्त होतो (मे) मला (चक्षुः) पाहण्यासाठी नेत्र (पुनः) पुन्हा (आगन्) मिळतात आणि (श्रोत्रम) शब्द ग्रहण करणारे कान (आगन्) पुनः प्राप्त होतात, तो (अदब्ध) ज्यात कदापी हिंसा करू नये असा (तनूपाः) शरीराचे रक्षण करणारा अग्नि आणि आत्म्याचे रक्षण करणारा परमात्मा (वैश्‍वानरः) शरीराने ग्रहण केला जाणारा व आत्म्याने ग्रहण केला जाणारा (असिः) अग्नी व परमात्मा (नः) आम्हाला (अवधात्) निंदनीय (दुरितात्) पापामुळे उत्पन्न दुःखापासून व दुष्कर्मापासून (पातु) दूर ठेवो व आमचे रक्षण करो.

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे (अग्नी या शब्दाचे व त्याच्या विशेषणांचे दोन अर्थ असल्यामुळे श्‍लेष आहे) जेव्हां प्राणी शयन किंवा मरण आदी अवस्थेत प्राप्त जागृत अवस्थेत येतात पुढील जन्मात जन्मजन्मांतरामधे जीवास कार्य करण्यासाठी पुन्हा साधन म्हणून मिळतात. ही मन आदि इंद्रिये जीवास अग्नीच्या संबंधामुळे वा परमेश्‍वराच्या व्यवस्थेप्रमाणे मिळतात आणि प्राणी कर्म करण्यात समर्थ होतात. याकरिता मनुष्यांनी हे करणे उचित आहे की जो जाठराग्नी सर्वांची रक्षा करतो आणि जो परमेश्‍वर पापात्मक कर्मापासून वाचवून धर्मामधे प्रवृत्त करतो आणि याप्रकारे वारंवार मानव जन्म देऊन दुष्टाचरण व दुःखापासून मुक्त करून या लोकात व परलोकात (मोक्षस्थितीत) सुखांची प्राप्ती करवितो, असा तो उपकारक अग्नी मनुष्यांसाठी उपयोगी आहे आणि असा तो परमात्मा मनुष्यांसाठी उपास्य व वंदनीय आहे. ॥15॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top