यजुर्वेद - अध्याय 6/ मन्त्र 9
ऋषिः - दीर्घतमा ऋषिः
देवता - सविता आश्विनौ पूषा च देवताः
छन्दः - प्राजापत्या बृहती,निचृत् अति जगती
स्वरः - धैवतः
3
दे॒वस्य॑ त्वा सवि॒तुः प्र॑स॒वेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पू॒ष्णो हस्ता॑भ्याम्। अ॒ग्नीषोमा॑भ्यां॒ जुष्टं॒ नियु॑नज्मि। अ॒द्भयस्त्वौष॑धी॒भ्योऽनु॑ त्वा मा॒ता म॑न्यता॒मनु॑ पि॒तानु॒ भ्राता॒ सग॒र्भ्योऽनु॒ सखा॒ सयू॑थ्यः। अ॒ग्नीषोमा॑भ्यां त्वा॒ जुष्टं॒ प्रोक्षा॑मि॥९॥
स्वर सहित पद पाठदे॒वस्य॑ त्वा॒। स॒वि॒तुः। प्र॒स॒व इति॑ प्रऽस॒वे। अ॒श्विनोः॑। बा॒हुभ्या॒मिति॑ बा॒हुऽभ्याम्। पू॒ष्णः। हस्ता॑भ्याम्। अ॒ग्नीषोमा॑भ्याम्। जुष्ट॑म्। नि। यु॒न॒ज्मि॒। अ॒द्भ्य इत्य॒द्ऽभ्यः। त्वा॒। ओष॑धीभ्यः। अनु॑। त्वा॒। मा॒ता। म॒न्य॒ता॒म्। अनु॑। पि॒ता। अनु॑। भ्राता॑। सगर्भ्य॒ इति॑ सऽगर्भ्यः। अनु॑। सखा॑। सयू॑थ्य इति॑ सऽयू॑थ्यः। अ॒ग्नीषोमा॑भ्याम्। त्वा॒। जुष्ट॑म्। प्र। उ॒क्षा॒मि॒ ॥९॥
स्वर रहित मन्त्र
देवस्य त्वा सवितुः प्रसवेश्विनोर्बाहुभ्याम्पूष्णो हस्ताभ्याम् । अग्नीषोमाभ्याञ्जुष्टन्नि युनज्मि । अद्भ्यस्त्वौषधीभ्योऽनु त्वा माता मन्यतामनु पितानु भ्राता सगर्भ्यानु सखा सयूथ्यः । अग्नीषोमाभ्यान्त्वा जुष्टंम्प्रोक्षामि ॥
स्वर रहित पद पाठ
देवस्य त्वा। सवितुः। प्रसव इति प्रऽसवे। अश्विनोः। बाहुभ्यामिति बाहुऽभ्याम्। पूष्णः। हस्ताभ्याम्। अग्नीषोमाभ्याम्। जुष्टम्। नि। युनज्मि। अद्भय इत्यद्ऽभ्यः। त्वा। ओषधीभ्यः। अनु। त्वा। माता। मन्यताम्। अनु। पिता। अनु। भ्राता। सगर्भ्य इति सऽगर्भ्यः। अनु। सखा। सयूथ्य इति सऽयूथ्यः। अग्नीषोमाभ्याम्। त्वा। जुष्टम्। प्र। उक्षामि॥९॥
विषय - गुरूने शिष्यास काय उपदेश करावा, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -
शब्दार्थ -
शब्दार्थ - (गुरुकुलामधे प्रवेश देताना अथवा उपनयन-संस्कारप्रसंगी आचार्य शिष्यास उद्देशून म्हणत आहे) - हे शिष्या, (सवितुः) समस्त ऐश्वर्यवान व (देवस्य) वेदविद्येचा दाता परमेश्वर याने (प्रसवे) उत्पन्न केलेल्या या जगात मी (अश्विनोः) सूर्य आणि चंद्राच्या (बाहुभ्याम्) गुणांनी तसेच (पूष्णः) पृत्वीच्या (हस्ताभ्याम्) हाथीप्रमाणे असलेल्या धारणशक्ती व आकर्षणशक्ती या दोन शक्तींनी (त्वाम्) (आददे) स्वीकार करीत आहे (वेदविद्या शिकवण्यासाठी सूर्य, चंद्र व पृथ्वी यांच्या परस्परातील आकर्षण व धारण गुणांप्रमाणे तुला स्वतःजवळ गुरुकुलात घेत आहे) तसेच (अग्नीषोमाभ्याम्) अग्नीच्या तेज व सोमाच्या शांतीरूप गुणांचा (जुष्टम्) प्रेमाने सेवन करीत (त्वा) तुला ब्रह्मचर्य-धर्म पालनासाठी अनुकूल असलेल्या जल आणि इतर औषधीं (अदभ्यः) जलाशी व (ओषधीभ्यः) गोधूम (गहू) आदी भोज्य पदार्थांशी (नियुनज्मि) सहयुक्त करीत आहे. (बह्मचर्य-धारण आणि विद्याध्ययन यांसाठी हितकारक, आरोग्यकारक अन्न, औषधी व जल यांचय सेवनाचा आदेश देत आहे) तू वेदविद्या शिकण्यासाठी माझ्याजवळ (गुरुकुलात) राहावे, यांसाठी तुझ्या (माता) जननी ने (अनु) (मन्यताम्) अनुमती द्यावी. तुझ्या (पिता) जनकाने अनुमोदन द्यावे. (समर्थ्यः) सहोदर (भ्राता) भाऊ याने (अनु) अनुमोदन द्यावे. (सखा) मित्राने (अनु) अनुमोदन द्यावे तसेच तुझ्या (सयूथ्यः) संगी-साथी, सहवासीजनांनी देखील (अनु) अनुमोदन करावे. (या सर्वांनी उपनयन व वेदारम्भ संस्कारासाठी तुला सहर्ष माझ्याकडे पाठवावे) यानंतर मी (अग्नीषोमाभ्याम्) अग्नीच्या तेज गुणांचे आणि सोम च्या शांती गुरांचे (जुष्टम्) प्रीतीपूर्वक सेवन करविण्यासाठी मी आचार्य (त्वा) तुला (प्र) (उक्षामि) त्या गुणांशी संयुक्त करीत आहे आणि ब्रह्मचर्यांचे नियम पालन करण्यासाठी तुला नियुक्त करीत आहे. ॥9॥
भावार्थ - भावार्थ - या संसारात माता, पिता, बन्धुवर्ग आणि मित्रवर्गाचे कर्त्तव्य आहे की आपल्या पुत्र, बंधु, मित्रादींना उत्तम शिक्षण देण्यासाठी ब्रह्मचर्य धारण करवावे (त्यांना गुरुकुलात पाठवावे) की ज्यामुळे ते गुणवान बनतील. ॥9॥
इस भाष्य को एडिट करेंAcknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
Shri Virendra Agarwal
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal