Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 6/ मन्त्र 27
    ऋषिः - मेधातिथिर्ऋषिः देवता - आपो देवताः छन्दः - निचृत् आर्षी त्रिष्टुप्, स्वरः - धैवतः
    5

    देवी॑रापोऽअपां नपा॒द्यो व॑ऽऊ॒र्मिर्ह॑वि॒ष्यऽइन्द्रि॒यावा॑न् म॒दिन्त॑मः। तं दे॒वेभ्यो॑ देव॒त्रा द॑त्त शुक्र॒पेभ्यो॒ येषां॑ भा॒ग स्थ॒ स्वाहा॑॥२७॥

    स्वर सहित पद पाठ

    देवीः॑। आ॒पः। अ॒पा॒म्। नपा॒त्। यः। वः॒। ऊ॒र्म्मिः। ह॒वि॒ष्यः॒। इ॒न्द्रि॒यावा॑न्। इ॒न्द्रि॒यवा॒निती॑न्द्रिय॒ऽवा॑न्। म॒दिन्त॑म॒ इति॑ म॒दिन्ऽत॑मः। तम्। दे॒वेभ्यः॑। दे॒व॒त्रेति॑ देव॒ऽत्रा। द॒त्त॒। शु॒क्र॒पेभ्य इति॑ शुक्र॒ऽपेभ्यः॑। येषा॑म्। भा॒गः। स्थ। स्वाहा॑ ॥२७॥


    स्वर रहित मन्त्र

    देवीरापो अपान्नपाद्यो व ऊर्मिर्विष्य इन्द्रियावान्मदिन्तमः । तन्देवेभ्यो देवत्रा दत्त शुक्रपेभ्यो येषाम्भाग स्थ स्वाहा ॥


    स्वर रहित पद पाठ

    देवीः। आपः। अपाम्। नपात्। यः। वः। ऊर्म्मिः। हविष्यः। इन्द्रियावान्। इन्द्रियवानितीन्द्रियऽवान्। मदिन्तम इति मदिन्ऽतमः। तम्। देवेभ्यः। देवत्रेति देवऽत्रा। दत्त। शुक्रपेभ्य इति शुक्रऽपेभ्यः। येषाम्। भागः। स्थ। स्वाहा॥२७॥

    यजुर्वेद - अध्याय » 6; मन्त्र » 27
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे प्रजाजनहो, तुम्ही (आपः) दिव्यगुणवान आणि (देवीः) शुभकर्म करणार्‍याविषयी प्रख्यात आहात, तुम्ही राजसेवी वा राजभक्त व्हा. (शासनात भाग घेणार्‍या प्रजाजनांचे आचरण उत्तमगुण, कर्मांनीयुक्त व राज्याविषयी प्रामाणिक असावे, हा आशय आहे) (शक्रपेभ्यः) देह आणि आत्मा यांच्या शक्तीचे जे रक्षक वा जाणकार आहेत अशा (देवेभ्यः) दिव्यगुणवान विद्वज्जनां तर्फे तुम्हास दिली जाणारी (यषाम्) जो देय भाग आहे, त्यास तुम्ही ग्रहण करा. (वः) तुम्हां प्रजाजनांचा (यः) जो (अपांनपात्) जलाप्रमाणे नाशरहित आणि स्वाभाविक (ऊर्मिः) उत्साह आहे की जे जलतरंगाप्रमाणे उन्नत आणि रक्षण करणारा आहे आणि (इन्द्रियावान्) ज्या कर्मात शरीरातील सर्व इंद्रियें आनंद अनुभवतात आणि जो (मन्दितमः) आनन्ददायक आहे, असा जो (हविषाः) भोग्य पदार्थांपासून निष्पन्न (भागः) आहे, (तम्) त्या भागाचे तुम्ही सर्व प्रजाजन (स्वाहा) आदरसहित ग्रहण करा. ज्याप्रमाणे राजा तथा सभासदजन तुम्हाला (देवत्रा) भोग्यपदार्थांतील आवश्यक भाग स्वेच्छेने देतात, त्याप्रमाणे तुम्ही (प्रजाजन) देखील त्या विद्वान सभासदांना त्यांचा आवश्यक व देयभाग (दत्त) द्यावा. ॥27॥

    भावार्थ - भावार्थ - प्रजेसाठी हे उचित कर्म आहे की त्यांनी आपसात चर्चा व संमती करून कोणा उत्कृष्टगुणयुक्त सभाध्यक्षाला राजा मानावे आणि त्यास राज्यपालन आणि न्यायदानाचे अधिकार द्यावेत. (राष्ट्राचा राष्ट्रपती हा सूज्ञ, गुणवान प्रजाजनांतून निवडलेला असावा) ॥27॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top