Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 6/ मन्त्र 2
    ऋषिः - शाकल्य ऋषिः देवता - सविता देवता छन्दः - निचृत् गायत्री,स्वराट् पङ्क्ति, स्वरः - षड्जः, धैवतः
    2

    अ॒ग्रे॒णीर॑सि स्वावे॒शऽउ॑न्नेतॄ॒णामे॒तस्य॑ वित्ता॒दधि॑ त्वा स्थास्यति दे॒वस्त्वा॑ सवि॒ता मध्वा॑नक्तु सुपिप्प॒लाभ्य॒स्त्वौष॑धीभ्यः। द्यामग्रे॑णास्पृक्ष॒ऽआन्तरि॑क्षं॒ मध्ये॑नाप्राः पृथि॒वीमुप॑रेणादृꣳहीः॥२॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒ग्रे॒णीः। अ॒ग्रे॒नीरित्य॑ग्रे॒ऽनीः। अ॒सि॒। स्वा॒वे॒श इति॑ सुऽआवे॒शः। उ॒न्ने॒तॄ॒णामित्यु॑त्ऽनेतॄ॒णाम्। ए॒तन्य॑। वि॒त्ता॒त्। अधि॑। त्वा॒। स्था॒स्य॒ति॒। दे॒वः। त्वा॒। स॒वि॒ता। मध्वा॑। अ॒न॒क्तु॒। सु॒पि॒प्प॒लाभ्य॒ इति॑ सुऽपिप्प॒लाभ्यः॑। त्वा॒। ओष॑धीभ्यः। द्याम्। अग्रे॑ण। अ॒स्पृ॒क्षः॒। आ। अ॒न्तरि॑क्षम्। मध्ये॑न। अ॒प्राः॒। पृ॒थि॒वीम्। उ॑परेण। अ॒दृ॒ꣳहीः॒ ॥२॥


    स्वर रहित मन्त्र

    अग्रेणीरसि स्वावेशऽउन्नेतऋृणामेतस्य वित्तादधि त्वा स्थास्यति देवस्त्वा सविता मध्वनक्तु सुपिप्पलाभ्यस्त्वौषधीभ्यः । द्यामग्रेणास्पृक्ष आन्तरिक्षम्मध्येनाप्राः पृथिवीमुपरेणादृँहीः ॥


    स्वर रहित पद पाठ

    अग्रेणीः। अग्रेनीरित्यग्रेऽनीः। असि। स्वावेश इति सुऽआवेशः। उन्नेतॄणामित्युत्ऽनेतॄणाम्। एतन्य। वित्तात्। अधि। त्वा। स्थास्यति। देवः। त्वा। सविता। मध्वा। अनक्तु। सुपिप्पलाभ्य इति सुऽपिप्पलाभ्यः। त्वा। ओषधीभ्यः। द्याम्। अग्रेण। अस्पृक्षः। आ। अन्तरिक्षम्। मध्येन। अप्राः। पृथिवीम्। उपरेण। अदृꣳहीः॥२॥

    यजुर्वेद - अध्याय » 6; मन्त्र » 2
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे सभाध्यक्ष, जसा एक आचार्य अध्यापक अथवा आपल्या शिष्यांना वा एक पिता आपल्या पुत्राला पठन-पाठन आरंभ होण्यापूर्वीच चांगले संस्कार व शिक्षण देऊन त्यांना सुशील, जितेंद्रिय आणि धर्माभिमुख करतो, तद्वत आम्हा (प्रजाजनांसाठी) आपण (असि) आहात. (उन्नेतृणाम्) जसे उत्कर्षाप्रत जाणारे एक राज्य असते, तसे आपण आम्हांस (स्वावेशाः) सद्गुणांकडे नेणारे व्हा आणि (एतस्य)या राज्याचे पालन करणारे होऊन या राज्याला प्रगतीकडे नेणारे आहांत, असे (वित्तात्) जाणा. हे राजन् (राष्ट्रध्यक्ष) (त्वा) आपणाला आपले सभासदजन लोकसभा, राज्यसभा आदीचे सदस्य) (सुपिप्पलाभ्यः) उत्कृष्ट फळ व प्रभाव असलेल्या (औषधीभ्यः) औषधींद्वारे (मध्वा) मधुर गुणांनीयुक्त अशा रसांद्वारे (अनक्तु) सिंचित करोत. (सभासदांनी राजा वा राष्ट्राध्यक्षाला मधुर वाणीने संबोधित करावे) त्या सभासदांप्रमाणे प्रजाजनांनी देखील सिंचित करावे (आपणास प्रिय व मदुर मानावे) आपण (अग्रेण) प्रथम हे करा की (घाम्) विद्या आणि राजनीतीचा प्रकाश (अस्पृक्षः) सर्वत्र प्रसृत करा (स्वतः तसे विद्यावान व राजनीतीनिपुण व्हा) नंतर (मद्यमेन) प्रथम अवस्थेनंतर आपल्या यशाला दुसर्‍या मध्यम स्थितीस आणा (अन्तरिक्षम्) धर्ममार्गाला (आप्राः) पूर्ण करा आणि नंतर (उपरेण) आपल्या उत्तम शासन नियमादीद्वारे (पृथिवीम्) समस्त पृथ्वीचे राज्य प्राप्त करून (अहम्घीः) दृढतेने वाढतच राहा. (देवः) समस्त राजांचा राजा (सविता) सर्वांना प्रेरणा देणारा असा जो अंतर्यामी परमेश्‍वर आहे, तो (त्वा) आपणाला राज्यपद देऊन आपणांवर (स्थास्यति) अधिष्ठाता म्हणून राहील. (उत्तम राज्य केल्यामुळे परमेश्‍वराची प्रेरणा व कृपा आपणांस प्राप्त होईल) ॥2॥

    भावार्थ - भावार्थ - प्रजाजनांनी मान्य वा स्वीकार्य न केल्यास असा राजा राज्य करण्यासाठी पात्र ठरत नाही. (प्रजेस प्रिय व निर्वाचित राजा (राष्ट्राध्यक्ष) राज्यकारभार करण्यास पात्र ठरतो) त्याच प्रमाणे राजा व राजसभा ज्या व्यक्तीस आदरणीय मानत नाही, अशी अमान्य व्यक्ती मंत्री होऊ शकत नाही. कोणी वीर पुरुष की ज्याच्या पराक्रमाची कीर्ती उत्तरोत्तर वाढत नाही, असा सैन्यधिकारी सेनाध्यक्ष होण्यास पात्र नाही. तसे न्यायाने निर्णय न देणारा व यथोचित दंड न देणारा न्यायाधीश होऊ शकत नाही आणि अशी अपात्र कोणीही व्यक्ती राज्याच्या (देशाच्या) मंत्रिमंडलात समाविष्ट होण्यास पात्र होत नाही. ॥2॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top