Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 6/ मन्त्र 5
    ऋषिः - मेधातिथिर्ऋषिः देवता - विष्णुर्देवता छन्दः - आर्षी गायत्री स्वरः - षड्जः
    2

    तद्विष्णोः॑ पर॒मं प॒दꣳ सदा॑ पश्यन्ति सूरयः॑। दि॒वीव॒ चक्षु॒रात॑तम्॥५॥

    स्वर सहित पद पाठ

    तत्। विष्णोः॑। प॒र॒मम्। प॒दम्। सदा॑। प॒श्य॒न्ति॒। सू॒रयः॑। दि॒वी᳕वेति॑ दिविऽइ॑व। चक्षुः॑। आत॑त॒मित्यात॑तम् ॥५॥


    स्वर रहित मन्त्र

    तद्विष्णोः परमं पदँ सदा पश्यन्ति सूरयो दिवीव चक्षुराततम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    तत्। विष्णोः। परमम्। पदम्। सदा। पश्यन्ति। सूरयः। दिवीवेति दिविऽइव। चक्षुः। आततमित्याततम्॥५॥

    यजुर्वेद - अध्याय » 6; मन्त्र » 5
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    (सभाध्यक्ष सभासदजनांना सांगत आहेत) सज्जनहो, पूर्वी सांगितलेल्या ज्या सत्यकर्म, सत्यभाषणादी व्यवहाराने (सूरयः) प्रशंसनीय वेदवेत्ताजन (विष्रोः) संसाराची उत्पत्ती, पालन आणि संहार करणार्‍या परमेश्‍वराच्या (परमम्) अत्यन्त उत्तम (पदम) प्राप्तव्य पदाचे ध्यान करतात, (सत्य व्यवहाराद्वारे परमेश्‍वराच्या आज्ञेचे पालन करतात) त्याप्रमाणे आपणही करा. (कशाप्रकारे?) (दिवि) सूर्यप्रकाशामधे (आततम्) सर्व पदार्थांना (चक्षुः) नेत्र (इव) ज्याप्रमाणे स्पष्टपणे (पश्यन्ति) पाहतात त्याप्रमाणे हे सभासदहो, तुम्हीही (पश्यत) पहा. परमेश्‍वराचे ध्यान करा (त्यास सर्वव्यापी जाणून सत्य कर्म करावेत) ॥5॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात ‘पश्यत’ हा शब्द पूर्वीच्या मंत्रातून अनुवृत्ती म्हणून घेतला आहे. या मंत्रात पूर्णोपमा अलंकार आहे (म्हणजे उपमा या काव्यालंकाराचे चारही अंग समाविष्ट आहेत, 1 उपमेय 2 उपमान 3 साधारण गुण व 4 वाचक शब्द. उपमेय आहे सभासद, उपमान आहे सूर्य, प्रकाश आहे साधारण गुण व ‘इव’ आहे वाचक शब्द) निर्दुत अर्थात् धुतले गेले वा नष्ट झाले आहेत पाप ज्यांचे, असे विद्वान लोक ज्याप्रमाणे आपल्या विद्येच्या प्रकाशाने ईश्‍वराच्या गुणांना पाहू शकतात आणि धार्मिक सत्याचरण करतात, त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी देखील व्हायला पाहिजे व केले पाहिजे. ॥15॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top