Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 6/ मन्त्र 4
    ऋषिः - मेधातिथिर्ऋषिः देवता - विष्णुर्देवता छन्दः - निचृत् आर्षी गायत्री, स्वरः - षड्जः
    2

    विष्णोः॒ कर्म्मा॑णि पश्यत॒ यतो॑ व्र॒तानि॑ पस्प॒शे। इन्द्र॑स्य॒ युज्यः॒ सखा॑॥४॥

    स्वर सहित पद पाठ

    विष्णोः॑ कर्म्मा॑णि। प॒श्य॒त॒। यतः॒। व्र॒तानि॑। प॒स्प॒शे। इन्द्र॑स्य। युज्यः॑। सखा॑ ॥४॥


    स्वर रहित मन्त्र

    विष्णोः कर्माणि पश्यत यतो व्रतानि पस्पशे । इन्द्रस्य युज्यः सखा ॥


    स्वर रहित पद पाठ

    विष्णोः कर्म्माणि। पश्यत। यतः। व्रतानि। पस्पशे। इन्द्रस्य। युज्यः। सखा॥४॥

    यजुर्वेद - अध्याय » 6; मन्त्र » 4
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - सभापती (राष्ट्राध्यक्ष) सभासदांना (सभेतील सदस्यांना) उद्देशून म्हणत आहेत-हे सभासदगण, (इन्द्रस्य) परमेश्‍वराचा एक (युज्यः) योग्य व सदाचारी (सखा) मित्र म्हणून (विष्णोः) त्या व्यापक ईश्‍वराच्या (कर्माणि) कर्मांना म्हणजे जगदुत्यत्ती जगपालन व जगसंहार या त्याच्या सत्वगुणांकडे पाहून मी सभाध्यक्ष (यतः) ज्या मान व बुद्धिमत्तेने (व्रतानि) सत्यभाषण, सत्याचरण आदी नियमांचे (पस्पशे) बंधनात आहे. (सत्यनियमांचे पालन करून त्या प्रमाणे राज्यव्यवस्था करीत आहे). आपण सर्व सभा सदस्यांनी देखील माझ्याप्रमाणे परमेश्‍वराच्या उत्तम गुणांकडे (पश्यत) लक्षपूर्वक पहावे. (राज्याने निश्‍चित केलेल्या कायद्यांचे पालन करावे) यामुळे आपण सर्वांनी राज्याच्या संचालनात सत्य व्यवहार करावेत. ॥4॥

    भावार्थ - भावार्थ - परमेश्‍वराविषयी प्रीतीभाव आणि जीवनात सत्याचरण यांशिवाय कोणी मनुष्य ईश्‍वराच्या गुण, कर्म आणि स्वभावाला जाणून घेण्यास पात्र होत नाही. तसेच त्या ज्ञानाशिवाय कोणीही राजा यथार्थ न्यायाने राजकर्म करण्यास समर्थ होऊ शकत नाही. तसेच सत्य धर्माच्या आचरणाशिवाय कोणीही राजा आपल्या राज्याचा विस्तार वा प्रगती करू शकत नाही. ॥4॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top