Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 10/ मन्त्र 22
    ऋषिः - देवावात ऋषिः देवता - अग्न्यादयो मन्त्रोक्ता देवताः छन्दः - विराट् आर्षी त्रिष्टुप्, स्वरः - धैवतः
    1

    मा त॑ऽइन्द्र ते व॒यं तु॑राषा॒डयु॑क्तासोऽअब्र॒ह्मता॒ विद॑साम। तिष्ठा॒ रथ॒मधि॒ यं व॑ज्रह॒स्ता र॒श्मीन् दे॑व यमसे॒ स्वश्वा॑न्॥२२॥

    स्वर सहित पद पाठ

    मा। ते॒। इ॒न्द्र॒। ते। व॒यम्। तु॒रा॒षा॒ट्। अयु॑क्तासः। अ॒ब्र॒ह्मता॑। वि। द॒सा॒म॒। तिष्ठ॑। रथ॑म्। अधि॑। यम्। व॒ज्र॒ह॒स्ते॒ति॑ वज्रऽहस्त। आ। र॒श्मीन्। दे॒व॒। य॒म॒से॒। स्वश्वा॒निति॑ सु॒ऽअश्वा॑न् ॥२२॥


    स्वर रहित मन्त्र

    मा तऽ इन्द्र ते वयन्तुराषाडयुक्तासोऽअब्रह्मता विदसाम । तिष्ठा रथमधि यँवज्रहस्ता रश्मीन्देव यमसे स्वश्वान् ॥


    स्वर रहित पद पाठ

    मा। ते। इन्द्र। ते। वयम्। तुराषाट्। अयुक्तासः। अब्रह्मता। वि। दसाम। तिष्ठ। रथम्। अधि। यम्। वज्रहस्तेति वज्रऽहस्त। आ। रश्मीन्। देव। यमसे। स्वश्वानिति सुऽअश्वान्॥२२॥

    यजुर्वेद - अध्याय » 10; मन्त्र » 22
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (प्रजाजन म्हणतात) हे (देव) प्रकाशमान (इन्द्र) सभापती राजा, (वज्रहस्त:) आपण हातांत वज्रासम शस्त्र धारण करणारे आहात. (वयम्) आम्ही राजपुरुष व प्रजापुरुष (ते) तुमच्याविषयी (उरयुक्तास:) कधीही अधर्म करणारे वा अहितकारी होऊ नये (अशी आमची सदैव भावना रहावी) (तसेच आमची प्रार्थना आहे की) (ते) तुमच्या मनात (अब्रह्नता) वेद आणि ईश्वर याविषयी जी निष्ठा आहे, ती (मा) कमी होऊ नये अथवा आमच्याकडून (विदसाम) ती निष्ठा कमी होण्याचे व्यवहार घडू नये. आपण (तुराषाट) शीघ्र व तीव्र आक्रमण करणार्‍या शत्रूंचा सामना करण्यात समर्थ आहात. (रश्मीन्) घोड्यांचा लगाम हातात धरून (स्वश्वान्) सुंदर घोड्यांना आपण (यमसे) वश करताना नियंत्रित करता. तसेच आपण ज्या (रथम्) स्थावर (अधितिष्ठ) बसतात त्या घोड्यांवर आणि रथावर आम्ही प्रजाजनांनी व राजपुरुषांनीदेखील बसावे (अथवा तशा घोड्याचे व वाहनाचे आम्ही स्वामी व्हावेत) ॥22॥

    भावार्थ - भावार्थ - राजपुरुष आणि प्रजापुरुष यांच्यासाठी उचित कर्म आहे की त्यांनी राजाशी कधीही अयोग्य व्यवहार करू नये. तसेच राजानेदेखील या लोकांशी अन्यायपूर्ण आचरण करू नये. वेदांची आणि ईश्वराच्या आज्ञेचे पालन करीत सर्व लोकांनी (राजा, राजकर्मचारी आणि प्रजाजन यांनी) एका वाहनावर वा एका अंथरूणावर (गादी, सतरंजीवर) बसावे आणि सर्वांचा एकमेकाशी (व्यवहार समानतेचा असावा. सर्वांनी कधीही आलस्य-प्रमाद ईश्वर आणि वेदांची निन्दा करू नये आणि नास्तिकता भावात अडकूं नये. ॥22॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top