Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 10/ मन्त्र 23
    ऋषिः - वामदेव ऋषिः देवता - सूर्य्यो देवता छन्दः - जगती, स्वरः - निषादः
    4

    अ॒ग्नये॑ गृ॒हप॑तये॒ स्वाहा॒ सोमा॑य॒ वन॒स्पत॑ये॒ स्वाहा म॒रुता॒मोज॑से॒ स्वाहेन्द्र॑स्येन्द्रि॒याय॒ स्वाहा॑। पृथि॑वि मात॒र्मा मा॑ हिꣳसी॒र्मोऽअ॒हं त्वाम्॥२३॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒ग्नये॑। गृहप॑तय॒ इति॑ गृहऽप॑तये। स्वाहा॑। सोमा॑य। वन॒स्पत॑ये। स्वाहा॑। म॒रुता॑म्। ओज॑से। स्वाहा॑। इन्द्र॑स्य। इ॒न्द्रि॒याय॑। स्वाहा॑। पृथि॑वि। मा॒तः॒। मा। मा॒। हि॒ꣳसीः॒। मोऽइति॒ मो। अ॒हम्। त्वाम् ॥२३॥


    स्वर रहित मन्त्र

    अग्नये गृहपतये स्वाहा सोमाय वनस्पतये स्वाहा मरुतामोजसे स्वाहेन्द्रस्येन्द्रियाय स्वाहा । पृथिवि मातर्मा मा हिँसीर्मो अहन्त्वाम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    अग्नये। गृहपतय इति गृहऽपतये। स्वाहा। सोमाय। वनस्पतये। स्वाहा। मरुताम्। ओजसे। स्वाहा। इन्द्रस्य। इन्द्रियाय। स्वाहा। पृथिवि। मातः। मा। मा। हिꣳसीः। मोऽइति मो। अहम्। त्वाम्॥२३॥

    यजुर्वेद - अध्याय » 10; मन्त्र » 23
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे प्रजाजन हो, आम्ही राजा आणि राजपुरुष ज्याप्रमाणे (गृह्यतये) गृहाश्रमाच्या स्वामीकरिता आणि (अग्नये) धार्मिक व विज्ञानयुक्त मनुष्याकरिता (स्वाहा) सत्यनीतीचा प्रयोग करतो (खरेपणाने वागतो) तसेच आम्ही (सोमाय) सोमलता आदी औषधीकरिता व (वनस्पतये) वनांचे रक्षण करणार्‍या पिंपळ आदी वृक्षाकरिता (स्वाहा) वैद्यकशास्त्राने शोधलेल्या पद्धतीप्रमाणे प्रयोग करतो (त्या वनस्पतीपासून लाभ घेतो,) त्याप्रमाणे हे प्रजाजनहो, तुम्हीही लाभ घ्या. (मकताम्) ज्याप्रमाणे आम्ही प्राणांकरिता वा ऋत्विज लोकांकरिता आणि (ओजसे) बलप्राप्तीकरिता (स्वाहा) योगाभ्यासाचा व शान्तिदायक वाणीचा उपयोग करतो आणि (इन्द्रस्य) जीवात्म्याच्या (इन्द्रियाथ) मन इंद्रियाकरिता (स्वाहा) हितकारी ज्ञानाचा उपदेश करतो आणि तसे वागतोही, त्याप्रमाणे तुम्ही लोकदेखील करीत जा. हे (पृथिवी) भूमीप्रमाणे शुभ-लक्षणांनी मुक्त (माता) वंदनीया माता, तू (मा) मला (तुझ्यापुत्राला) (मा) (हिंसी) वाईट शिक्षण व संस्कार देऊन दु:ख देऊ नकोस. तसेच (अहम्) मी देखील (त्वा) तुला (मो) दु:खी करू नये ॥23॥

    भावार्थ - भावार्थ - राजा आणि राजपुरुषांनी प्रजेच्या हिताकरिता तसेच प्रजेने राजा आणि राजपुरुषांच्या हिताकरिता, एकमेकास सुखी करण्याकरिता व एकमेकाच्या उन्नतीकरिता झटले पाहिजे. प्रत्येक मातेस उचित आहे की तिने आपल्या संततीला वाईट शिकवण देऊन, वा अविद्यारुप मुर्खत्व देऊन त्याची बुद्धि विकृत करू नये. तसेच मातेच्या संतानांचेही कर्तव्य आहे की त्यानी कदापि स्वत:च्या आईचा द्वेष करू नये. ॥23॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top