Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 10/ मन्त्र 18
    ऋषिः - देवावात ऋषिः देवता - यजमानो देवता छन्दः - स्वराट ब्राह्मी त्रिष्टुप्, स्वरः - धैवतः
    1

    इ॒मं दे॑वाऽअसप॒त्नꣳ सु॑वध्वं मह॒ते क्ष॒त्रा॑य मह॒ते ज्यैष्ठ्या॑य मह॒ते जान॑राज्या॒येन्द्र॑स्येन्द्रि॒याय॑। इ॒मम॒मुष्य॑ पु॒त्रम॒मुष्यै॑ पु॒त्रम॒स्यै वि॒शऽए॒ष वो॑ऽमी॒ राजा॒ सोमो॒ऽस्माकं॑ ब्राह्म॒णाना॒ राजा॑॥१८॥

    स्वर सहित पद पाठ

    इ॒मम्। दे॒वाः॒। अ॒स॒प॒त्नम्। सु॒व॒ध्व॒म्। म॒ह॒ते। क्ष॒त्राय॑। म॒ह॒ते। ज्यैष्ठ्या॑य। म॒ह॒ते। जान॑राज्या॒येति॒ जान॑ऽराज्याय। इन्द्र॑स्य। इ॒न्द्रि॒याय॑। इ॒मम्। अ॒मुष्य॑। पु॒त्रम्। अ॒मुष्यै॑। पु॒त्रम्। अ॒स्यै। वि॒शे। ए॒षः। वः॒। अ॒मी॒ऽइत्य॑मी। राजा॑। सोमः॑। अ॒स्माक॑म्। ब्रा॒ह्म॒णाना॑म्। राजा॑ ॥१८॥


    स्वर रहित मन्त्र

    इमन्देवाऽअसुपत्नँ सुवध्वम्महते क्षत्राय महते ज्यैष्ठ्याय महते जानराज्यायेन्द्रस्येन्दियाय। इमममुष्य पुत्रममुष्यै पुत्रमस्यै विश एष वोमी राजा सोमोस्माकम्ब्राह्मणानाँ राजा ॥


    स्वर रहित पद पाठ

    इमम्। देवाः। असपत्नम्। सुवध्वम्। महते। क्षत्राय। महते। ज्यैष्ठ्याय। महते। जानराज्यायेति जानऽराज्याय। इन्द्रस्य। इन्द्रियाय। इमम्। अमुष्य। पुत्रम्। अमुष्यै। पुत्रम्। अस्यै। विशे। एषः। वः। अमीऽइत्यमी। राजा। सोमः। अस्माकम्। ब्राह्मणानाम्। राजा॥१८॥

    यजुर्वेद - अध्याय » 10; मन्त्र » 18
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (देवा:) वेदशास्त्रांचे ज्ञाता सेनापति जनहो, (एष:) हा उपदेश देणारा जो महोपदशेक वा सरसेनापती आहे, तो (व:) तुम्हा सर्वांचा (सैन्याधिकार्‍यांचा) आणि (अस्माकम्) आमचा (प्रजाजनांचा अधिष्ठाता असून) ईश्वर आणि वेदांची सेवा करणार्‍या (आस्तिक आणि वेदज्ञ) ब्राह्मणांचा (राजा) अधिष्ठता आहे आणि वेद आणि ईश्वरोपासनांमुळे कीर्तिमान आहे. (अमी) हे जे धर्मात्मा राजपुरुष आहेत, त्यांना (सोम:) शुभगुणवान हा (राजा) सर्वत्र विद्या, धर्म आणि सद्शिक्षा देणारा आहे (आपण सर्व सेनापती आणि आपला हा राजा, या सर्वांनी असे यत्न करावेत की ज्यायोगे) (इमम्) या (अमुष्य) श्रेष्ठ गुणवान राजपूताचा (पुत्रम्) पुत्र आणि (अमुष्यै) या सुद्गुणी कीर्तीमती राजकन्येचा (पुत्रम्) पुत्र पवित्र तसेच गुण, कर्म आणि स्वभावाने आई-वडीलांचे रक्षण करणारा आणि (अदयै) विद्या-ज्ञान देण्यास योग्य व्हावा. तसेच तो पुत्र (विशे) प्रजाजनांसाठी (महते) सत्कार वा स्तुती करण्याच्या योग्यतेचा आणि (षत्राय) क्षत्रिय कुळांसाठी (महते) महान व्हावा. (ज्यैष्ठाय) विद्या आणि धर्मविषयात श्रेष्ठ व्यक्तींचा निर्माण करणारा व्हावा. (महते) विशाल (चक्रवर्ती) (जानराज्याय) राज्यामधील मांडलिक राजांवर बलवान शासन करणारा व्हावा आणि (इन्द्रस्य) सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने समृद्ध अशा धनाठ्य मनुष्यांचे (इन्द्रियाय) धन अधिक वाढविणारा (राष्ट्राची धनसंपदा वाढविणारा व वैश्यादिकांना प्रोत्साहन देणारा) व्हावा. (तसेच या राजपूत्राचा व राजकन्येचा पुत्र) असा (सुवध्वम्) उत्पन्न व्हावा (वा तुम्ही सर्व सेनापती असे यत्न करावी ज्यायोगे तो (असपत्नम्) ज्याचा कोणीही शत्रू नाही, असा व्हावा. ॥18॥

    भावार्थ - भावार्थ - जर राष्ट्रातील उपदेशक आणि राजपुरूष सर्व प्रजाजनांच्या उन्नतीसाठी कामना व यत्न करतील, तर सर्व प्रजाजनदेखील राजा आणि राजपुरुषांच्या उन्नतीसाठी कामना व यत्न का करणार नाहीत? (अर्थात अवश्य करणार, कारणे ते स्वाभाविक आहे) त्याचप्रमाणे जर राजपुरुष आणि प्रजाजन वेदांच्या आणि ईश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन करून स्वेच्छेप्रमाणे (आपल्या लहरीप्रमाणे) सर्व कामे करू लागतील, तर त्यांची उन्नती कशी होईल? (राष्ट्राच्या विकासाची सर्वथा हानी होईल) ॥18॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top