Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 10/ मन्त्र 6
    ऋषिः - वरुण ऋषिः देवता - आपो देवताः छन्दः - स्वराट ब्राह्मी बृहती, स्वरः - मध्यमः
    6

    प॒वित्रे॑ स्थो वैष्ण॒व्यौ सविर्तुवः॑ प्रस॒वऽउत्पु॑ना॒म्यच्छि॑द्रेण प॒वित्रे॑ण॒ सूर्य॑स्य र॒श्मिभिः॑। अनि॑भृष्टमसि वा॒चो बन्धु॑स्तपो॒जाः सोम॑स्य दा॒त्रम॑सि॒ स्वाहा॑ राज॒स्वः॥६॥

    स्वर सहित पद पाठ

    प॒वित्रे॒ऽइति॑ प॒वित्रे॑। स्थः॒। वै॒ष्ण॒व्यौ᳖। स॒वि॒तुः। वः॒। प्र॒स॒व इति॑ प्रऽस॒वे। उत्। पु॒ना॒मि॒। अच्छि॑द्रेण। प॒वित्रे॑ण। सूर्य॑स्य। र॒श्मिभि॒रिति॑ र॒श्मिऽभिः॑। अनि॑भृष्ट॒मित्यनि॑ऽभृष्टम्। अ॒सि॒। वा॒चः। बन्धुः॑। त॒पो॒जा इति॑ तपः॒ऽजाः। सोम॑स्य। दा॒त्रम्। अ॒सि॒। स्वाहा॑। रा॒ज॒स्व᳖ इति॑ राज॒ऽस्वः᳖ ॥६॥


    स्वर रहित मन्त्र

    पवित्रे स्थो वैष्णव्यौ सवितुर्वः प्रसव ऽउत्पुनाम्यच्छिद्रेण पवित्रेण सूर्यस्य रश्मिभिः । अनिभृष्टमसि वाचो बन्धुस्तपोजाः सोमस्य दात्रमसि स्वाहा राजस्वः ॥


    स्वर रहित पद पाठ

    पवित्रेऽइति पवित्रे। स्थः। वैष्णव्यौ। सवितुः। वः। प्रसव इति प्रऽसवे। उत्। पुनामि। अच्छिद्रेण। पवित्रेण। सूर्यस्य। रश्मिभिरिति रश्मिऽभिः। अनिभृष्टमित्यनिऽभृष्टम्। असि। वाचः। बन्धुः। तपोजा इति तपःऽजाः। सोमस्य। दात्रम्। असि। स्वाहा। राजस्व इति राजऽस्वः॥६॥

    यजुर्वेद - अध्याय » 10; मन्त्र » 6
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (सभापतीला उद्देशून विद्वान आचार्याचे वचन) हे सभापती राजपुरुष ज्याप्रमाणे आपण (वाच:) वेदवाणीचे (अनिभृष्टम्) भ्रष्टतारहित आचरण करणारे (वेदोक्त पद्धतीने कर्म व आचरण करणारे) (बन्धु:) आमचे बंधु (सहायक) आहात, तसेच (सोमस्य) सोम आदी गुणकारक औषधींद्वारे (दात्रम्) रोगांचा नायनाट करणारे आत्रण (तपोजा:) ब्रह्मचर्य आदी तपांनी युक्त असे प्रसिद्ध (असि) आहात. त्याप्रमाणेच आपल्या आज्ञेने आणि (सवितु:) सर्वजगदुत्पादक परमेश्वराने (प्रसवे) उत्पन्न केलेल्या या जगात (वैष्णन्यौ) सर्व विद्या, उत्तम शिक्षा, शुभ गुणकर्म व स्वभाव, यांमधे, रममाण असणारे ब्रह्मचारी आणि (पवित्रे) शुद्ध आचरण असणार्‍या ब्रह्मचारिणी कुमारिका असे दोघे आहेत. हे अध्यापन करणार्‍या आचार्या महोदय, परीक्षा घेणार्‍या महोदया आणि हे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीनों, मी (आचार्य) (सवितु:) ईश्वराने (प्रसवे) उत्पन्न केलेल्या या जगात (सूर्य्यस्थ) सूर्याच्या (रश्मिभि:) किरणांप्रमाणे (अच्छिद्रेण) छिद्र वा दोषरहित आणि (पवित्रेण) विद्या, व सुशिक्षा, धर्मज्ञान, जितेंद्रियत्व आणि ब्रह्मचर्य आदीद्वारा तुम्हाला पवित्र करून (व:) तुम्हा (विद्यार्थिनी व आचार्याला) (उत्पुनाभि) आणखी चांगल्याप्रकारे पवित्र करीत आहे. तुम्ही (स्वाहा) सत्याचरणाद्वारे (राजस्व:) वीर राजांना जन्म देणार्‍या व्हा. ॥6॥^(संस्कृत भावार्थामध्ये स्वामीजीनीं स्पष्ट म्हटले आहे की ज्याप्रमाणे कुमारांच्या अध्यापनासाठी सज्जन पुरुष नेमले जातात, तद्वत कन्यांना शिक्षण देण्यासाठी पवित्र विद्या परीक्षा कारिका स्त्रिया नेमाव्यात - अनुवादक)

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे राजा आदी राजपुरुषहो, तुम्ही या जगात (आपल्या राज्यात) कन्यांना शिकविण्यसाठी शुद्धाचरणयुक्त विद्यावती आणि नीट परीक्षा अभ्यास करून ज्ञान देणार्‍या शिक्षिका नियुक्त करा की ज्यामुळे या कन्या विद्या-ज्ञान प्राप्त करून युवती होऊन त्यांना प्रिय असलेल्या पुरुषासह स्वयंवर विवाह करून शूरवीर पुत्रांना जन्म देतील ॥6॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top