Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 10/ मन्त्र 29
    ऋषिः - शुनःशेप ऋषिः देवता - सवित्रादिमन्त्रोक्ता देवताः छन्दः - भूरिक ब्राह्मी त्रिष्टुप्, स्वरः - निषादः
    3

    अ॒ग्निः पृ॒थुर्धर्म॑ण॒स्पति॑र्जुषा॒णोऽअ॒ग्निः पृ॒थुर्धर्म॑ण॒स्पति॒राज्य॑स्य वेतु॒ स्वाहा॒। स्वाहा॑कृताः॒ सूर्य॑स्य र॒श्मिभि॑र्यतध्वꣳ सजा॒तानां॑ मध्य॒मेष्ठ्या॑य॥२९॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒ग्निः। पृ॒थुः। धर्म॑णः। पतिः॑। जु॒षा॒णः। अ॒ग्निः। पृ॒थुः। धर्म॑णः। पतिः॑। आज्य॑स्य। वे॒तु॒। स्वाहा॑। स्वाहा॑कृता॒ इति॒ स्वाहा॑ऽकृताः। सूर्य॑स्य। र॒श्मिभि॒रिति॑ र॒श्मिऽभिः॑। य॒त॒ध्व॒म्। स॒जा॒ताना॒मिति॑ सऽजा॒ताना॑म्। म॒ध्य॒मेष्ठ्या॑य। म॒ध्यमेस्थ्या॒येति॑ मध्य॒मेऽस्थ्या॑य ॥२९॥


    स्वर रहित मन्त्र

    अग्निः पृथुर्धर्मणस्पतिर्जुषाणोऽअग्निः पृथुर्धर्मणस्पतिराज्यस्य वेतु स्वाहा । स्वाहाकृताः सूर्यस्य रश्मिबिर्यतध्वँ सजातानाॐम्मध्यमेष्ठ्याय ॥


    स्वर रहित पद पाठ

    अग्निः। पृथुः। धर्मणः। पतिः। जुषाणः। अग्निः। पृथुः। धर्मणः। पतिः। आज्यस्य। वेतु। स्वाहा। स्वाहाकृता इति स्वाहाऽकृताः। सूर्यस्य। रश्मिभिरिति रश्मिऽभिः। यतध्वम्। सजातानामिति सऽजातानाम्। मध्यमेष्ठ्याय। मध्यमेस्थ्यायेति मध्यमेऽस्थ्याय॥२९॥

    यजुर्वेद - अध्याय » 10; मन्त्र » 29
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे राजा वा राजपत्नी, ज्याप्रमाणे एक (पृथु:) महापुरुषार्थयुक्त धर्माचा (पति:) रक्षक (जुषाण:) सेवा करीत (अग्नि:) विद्युतेप्रमाणे व्यापक होऊन (सर्वत्र जाऊन) (सजातानाम्) उत्पन्न पदार्थांसोबत (सहकारी जनांसोबत) कार्य करीत त्यांच्या (मध्यमेष्ठ्याय) मध्ये (स्वाहा) सत्य आचरण करीत (सर्वांना सुख देत असतो) तसेच ज्याप्रमाणे एक (याज्ञिक) (आज्यस्य) घृत आदी होमासाठी आवश्यक पदार्थ आणतो आणि (सूर्य्यस्थ) सूर्याच्या (रश्मिभि:) किरणांसह होम केलेल्या त्या आहुत पदार्थांना सर्वत्र प्रसारित करतो, त्याप्रमाणे आपण सर्व जण (राजा व राज्ञी) (धर्मण:) न्यायाचे (पति:) रक्षक होऊन (पृथु:) महान (जुषाण:) सेवा करणारे आणि (अग्नि:) अग्नीप्रमाणे तेजस्वी होऊन या राज्याला (वेतु) प्राप्त व्हा. तसेच हे (स्वाहाकृता:) खरे वागणार्‍या सभासदहो अथवा हे स्त्रीजनहो, तुम्हीही त्या राजा व राज्ञीप्रमाणे तसेच विद्युत, अग्नी व सूर्याप्रमाणे (यतध्वम्) (सर्वांच्या कल्याणासाठी) प्रयत्न करा. ॥29॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे राजा आणि प्रजाजन हो तसेच हे राज्ञी आणि स्त्री सभासद हो, तुम्ही सर्व जण सूर्य, विद्युत आणि अग्नीप्रमाणे व्यवहार करीत पक्षपात न करता सर्व लोकांविषयी न्याय करा (वा वादनिर्माण झाल्यास मध्यस्थ) होऊन न्यायनिवाडा करा) तसेच ज्याप्रमाणे अग्नी सूर्याच्या किरणांत आणि वायूमध्ये सुगंधद्रव्य स्थापित करतो (देतो) आणि वायु, जल यांच्या माध्यमातून औषधींचे शुद्धीकरण करून अग्नी सर्व प्राण्यांना सुखी करतो, तद्वत तुम्ही सर्वजण न्याययुक्त कर्म करणारे होऊन सर्व प्रजेला सुखी करा ॥29॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top