Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 10/ मन्त्र 34
    ऋषिः - शुनःशेप ऋषिः देवता - अश्विनौ देवते छन्दः - भूरिक पङ्क्ति, स्वरः - गान्धारः
    1

    पु॒त्रमि॑व पि॒तरा॑व॒श्विनो॒भेन्द्रा॒वथुः॒ काव्यै॑र्द॒ꣳसना॑भिः। यत्सु॒रामं॒ व्यपि॑बः॒ शची॑भिः॒ सर॑स्वती त्वा मघवन्नभिष्णक्॥३४॥

    स्वर सहित पद पाठ

    पु॒त्रमि॒वेति॑ पु॒त्रम्ऽइ॑व। पि॒तरौ॑। अ॒श्विना॑। उ॒भा। इन्द्र॑। आ॒वथुः॑। काव्यैः॑। द॒ꣳसना॑भिः। यत्। सु॒राम॑म्। वि। अपि॑बः। शची॑भिः। सर॑स्वती। त्वा॒ म॒घ॒व॒न्निति॑ मघऽवन्। अ॒भि॒ष्ण॒क् ॥३४॥


    स्वर रहित मन्त्र

    पुत्रमिव पितरावश्विनोभेन्द्रावथुः काव्यैर्दँसनाभिः । यत्सुरामँव्यपिबः शचीभिः सरस्वती त्वा मघवन्नभिष्णक् ॥


    स्वर रहित पद पाठ

    पुत्रमिवेति पुत्रम्ऽइव। पितरौ। अश्विना। उभा। इन्द्र। आवथुः। काव्यैः। दꣳसनाभिः। यत्। सुरामम्। वि। अपिबः। शचीभिः। सरस्वती। त्वा मघवन्निति मघऽवन्। अभिष्णक्॥३४॥

    यजुर्वेद - अध्याय » 10; मन्त्र » 34
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (मधवन्) प्रभूत धनाने संपन्न आणि सत्कार करण्यास योग्य (इन्द्राय) सर्व सभांचे (धर्मसभा, राजसभा, विद्वत्सभा आदींचे) स्वामी हे राजा, (यत्) आपण जे (शचीभि:) आपल्या बुद्धिकौशल्याने प्राप्त अशा (सुरामम्) विश्रान्तिदायक रसाचे (व्यापिब:) प्राशन करता वा पितां (सरस्वती) विद्येमुळे सुशिक्षित झालेली आपल्या वाणीप्रमाणे असलेली आपली पत्नी आपला (अभिष्णक्) सत्कार करते. (अश्विना) राजाद्वारा आदेश दिल्यामुळे (उभा) तुम्ही दोघे म्हणजे सेनापती व न्यायाधीश (काव्यै) परमविद्वान धर्माला लोकांद्वारे केलेल्या (दंसनाभि:) कर्मांनी ज्याप्रमाणे (पितरौ) माता-पिता (पुत्रम्) आपल्या संतानाची रक्षा करतात, त्याप्रमाणे तुम्ही सर्वजणांनी राजा, राणी, सेनापती व न्यायाधीश या सर्वांनी) राजाचे (आवधु:) रक्षण करावे. ॥34॥

    भावार्थ - भावार्थ : सर्व सद्गुणांनी युक्त, राजधर्माचे पालन करणारा, धर्मात्मा अध्यापक असलेल्याने तोच पूर्ण युवावस्था प्राप्त केलेल्या पुरुषाने आपल्या हृदयास प्रिय असणार्‍या, आपल्यासाठी योग्य, सत् लक्षणांनी संपन्न, रुप, लावण्य आदी गुणांनी शोभायमान, अशा विदुषी स्त्रीशी विवाह करावा. ती अशी असावी की सदा आपल्या पतीला अनुकुल राहील. तसेच तिचा पती देखील तिच्या पसंतीचा व समविचारी असावा. राजाने आपल्या मंत्री, सेवक आणि पत्नी यांसह प्रजेशी सत्पुरुषांनी सांगितलेल्या रीतीप्रमाणे वागावे. राजाने प्रजेशी सत्पुरुषांनी सांगितलेल्या रीतीप्रमाणे वागावे. राजाने प्रजेशी पितासमान आचरण करावे आणि प्रजा-संतांनी देखील त्याच्याशी पुत्राप्रमाणे वागावे. अशाप्रकारे दोघांनी आपसात प्रेम वाढवीत सदैव आनंदित असावे. ॥34॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top