Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 11/ मन्त्र 1
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - सविता देवता छन्दः - विराडार्ष्यनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    9

    यु॒ञ्जा॒नः प्र॑थ॒मं मन॑स्त॒त्त्वाय॑ सवि॒ता धियः॑। अ॒ग्नेर्ज्योति॑र्नि॒चाय्य॑ पृथि॒व्याऽअध्याभ॑रत्॥१॥

    स्वर सहित पद पाठ

    यु॒ञ्जा॒नः। प्र॒थ॒मम्। मनः॑। त॒त्त्वाय॑। स॒वि॒ता। धियः॑। अ॒ग्नेः। ज्योतिः॑। नि॒चाय्येति॑ नि॒चाऽय्य॑। पृ॒थि॒व्याः। अधि॑। आ। अ॒भ॒र॒त् ॥१ ॥


    स्वर रहित मन्त्र

    युञ्जानः प्रथमम्मनस्तत्वाय सविता धियः । अग्नेर्ज्यातिर्निचाय्य पृथिव्या अध्याभरत् ॥


    स्वर रहित पद पाठ

    युञ्जानः। प्रथमम्। मनः। तत्त्वाय। सविता। धियः। अग्नेः। ज्योतिः। निचाय्येति निचाऽय्य। पृथिव्याः। अधि। आ। अभरत्॥१॥

    यजुर्वेद - अध्याय » 11; मन्त्र » 1
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - जो कोणी मनुष्य (सविता) ऐश्वर्याची प्राप्ती करू इच्छितो, त्याने (तत्त्वाय) परमेश्वर आणि इतर पदार्थांचे ज्ञान मिळविण्यासाठी (प्रथमच सर्वप्रथम (मन:) आपल्या मनाच्या म्हणजे विचारस्वरूप अंतकरणार्‍या वृत्तींना (युंजान:) योगाभ्यास व भूगर्भ विद्येशी संयुक्त करावे (मन गुंतवावे) तसेच त्याने (अग्ने:) पृथ्वीवर वा भूमी आदीने सजणार्‍या विजेच्या (ज्योति:) प्रकाशाला (वा शक्तीला) (निच्चाय्य) निश्चयपूर्वक (पृथिव्या:) भूमीच्या (अधि) वर (आभरत्) चांगल्या रीतीने धारण करावे (विजेचा योग्य तो वापर करावा) असे करणाराच योगी आणि भूगर्भविद्याविशारद होऊ शकतो. ॥1॥

    भावार्थ - भावार्थ - जो माणूस योगाभ्यास करू इच्छितो आणि भूगर्भविद्येचे ज्ञान मिळवू इच्छितो, त्याने योगाच्या यम आदी आठ अंगांचे ज्ञान प्राप्त करावे आणि योग्य क्रिया-कौशल्याद्वारे हृदय शुद्ध करून शुद्ध तत्त्वांचे ज्ञान मिळवावे. नंतर बुद्धी प्राप्त करून या सर्वांचे गुण, कर्म आणि स्वभाव जाणून त्यांपासून लाभ घ्यावा. तसेच जे प्रकाशमान सूर्य आदी पदार्थ आहेत, त्यांचा प्रकाश ईश्वर आहे, त्यामुळे त्याला जाणून आपल्या आत्म्यात त्याविषयी निश्चय करावा (ईश्वराचे स्वरूप कसे आहे, तो निराकार आहे, हे योगभ्यासाने जाणावे) आणे स्वत:च्या आणि इतरांच्याही सर्व प्रयोजन पूर्ण करावेत. ॥1॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top