Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 11/ मन्त्र 69
    ऋषिः - आत्रेय ऋषिः देवता - अम्बा देवता छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    1

    दृꣳह॑स्व देवि पृथिवि स्व॒स्तय॑ऽआसु॒री मा॒या स्व॒धया॑ कृ॒तासि॑। जुष्टं॑ दे॒वेभ्य॑ऽइ॒दम॑स्तु ह॒व्यमरि॑ष्टा॒ त्वमुदि॑हि य॒ज्ञेऽअ॒स्मिन्॥६९॥

    स्वर सहित पद पाठ

    दृꣳह॑स्व। दे॒वि॒। पृ॒थि॒वि॒। स्व॒स्तये॑। आ॒सु॒री। मा॒या। स्व॒धया॑। कृ॒ता। अ॒सि॒। जुष्ट॑म्। दे॒वेभ्यः॑। इ॒दम्। अ॒स्तु॒। ह॒व्यम्। अरि॑ष्टा। त्वम्। उत्। इ॒हि॒। य॒ज्ञे। अ॒स्मिन् ॥६९ ॥


    स्वर रहित मन्त्र

    दृँहस्व देवि पृथिवि स्वस्तयऽआसुरी माया स्वधया कृतासि । जुष्टन्देवेभ्यऽइदमस्तु हव्यमरिष्टा त्वमुदिहि यज्ञे अस्मिन् ॥


    स्वर रहित पद पाठ

    दृꣳहस्व। देवि। पृथिवि। स्वस्तये। आसुरी। माया। स्वधया। कृता। असि। जुष्टम्। देवेभ्यः। इदम्। अस्तु। हव्यम्। अरिष्टा। त्वम्। उत्। इहि। यज्ञे। अस्मिन्॥६९॥

    यजुर्वेद - अध्याय » 11; मन्त्र » 69
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (पृथिवी) भूमीप्रमाणे विद्येमुळे विस्तार्ण यशवती (दुरदूरपर्यंत यश असलेल्या) हे (देवि) विद्यावती पत्नी, तू (स्वस्तये) घराच्या कल्याणासाठी (स्वधया) अन्न आणि जलाद्वारे (आसुरी) पुरुषांची जी प्राणपोषक बुद्धी असते, त्याला (कृता) सिद्ध वा प्राप्त केलेले आहे. (घराची उत्तम व्यवस्था करून मला अनुकूल केले आहेस) त्याच बुद्धीने तू मला (तुझ्या) पतीला) (दृंहस्व) आणखी प्रगती व उन्नती करण्यात साहाय्यकारी हो (अरिष्टा) हिंसारहित (अपमान व पीडा आदीने रहित) (अस्मिन्) या (यज्ञे) सोबत राहून करीत असलेल्या या गृहाश्रमरुप यज्ञात (अदिहि) अधिक प्रकाशित हो । (आदर्श गृहिणी म्हणून आणखी कीर्ती वाढव.) तू (जुष्टम्) हा जो (हन्यम्) देण्या-घेण्यास योग्य पदार्थ आहे, तो (देवेभ्य:) विद्वज्जनांसाठी वा सद्गुणांच्या वृद्धीसाठी (अस्तु) असावा. (तुझ्या हातून विद्वान व अतिथींची सेवा घडावी) ॥69॥

    भावार्थ - भावार्थ - जी पत्नी आपल्या घरात राहून पतीशी योग्य आचरण करते, तिने सद्बुद्धीसाठी आणि सुखासाठी नेहमी जागरूक राहून झटावे. अन्न तसेच भोज्य खाण्यापिण्याचे सर्व पदार्थ स्वादिष्ट असे तयार करावेत वा करवून घ्यावेत. तसेच (घरातील) कोणाशीही वैरभाव न ठेवून कोणाला दु:ख मुळीच देऊ नये. ॥61॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top