Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 11/ मन्त्र 24
    ऋषिः - गृत्समद ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - आर्षी पङ्क्तिः स्वरः - पञ्चमः
    3

    आ वि॒श्वतः॑ प्र॒त्यञ्चं॑ जिघर्म्यर॒क्षसा॒ मन॑सा॒ तज्जु॑षेत। मर्य्य॑श्री स्पृह॒यद्व॑र्णोऽअ॒ग्निर्नाभि॒मृशे॑ त॒न्वा जर्भु॑राणः॥२४॥

    स्वर सहित पद पाठ

    आ। वि॒श्वतः॑। प्र॒त्यञ्च॑म्। जि॒घ॒र्मि॒। अ॒र॒क्षसा॑। मन॑सा। तत्। जु॒षे॒त॒। मर्य्य॑श्रीरिति॒ मर्य्य॑ऽश्रीः। स्पृ॒ह॒यद्व॑र्ण॒ इति॑ स्पृह॒यत्ऽव॑र्णः। अ॒ग्निः। न। अ॒भि॒मृश॒ इत्य॑भि॒ऽमृशे॑। त॒न्वा᳕। जर्भु॑राणः ॥२४ ॥


    स्वर रहित मन्त्र

    आ विश्वतः प्रत्यञ्चज्जिघर्म्यरक्षसा मनसा तज्जुषेत । मर्यश्री स्पृहयद्वर्णाऽअग्निर्नाभिमृशे तन्वा जर्भुराणः ॥


    स्वर रहित पद पाठ

    आ। विश्वतः। प्रत्यञ्चम्। जिघर्मि। अरक्षसा। मनसा। तत्। जुषेत। मर्य्यश्रीरिति मर्य्यऽश्रीः। स्पृहयद्वर्ण इति स्पृहयत्ऽवर्णः। अग्निः। न। अभिमृश इत्यभिऽमृशे। तन्वा। जर्भुराणः॥२४॥

    यजुर्वेद - अध्याय » 11; मन्त्र » 24
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (ज्ञानी विद्वानाचे वचन) हे मनुष्या, (न) ज्याप्रमाणे (अग्नि:) विद्युत व प्राणवायु (विश्वत:) सर्व दिशांनी शरीरात व्यापक होऊन (अभिमृशे) धारण वा सहन करणार्‍या मनुष्यासाठी हितकर आहेत, आणि जसे (तन्वा) शरीराद्वारे (जर्भुराण:) हात, पाय आदी अंगाचे शीघ्र संचालन करणारा (प्राणवायु) (स्पृहयद्वर्ण:) इच्छुक सर्व जनांना प्रिय आहे (मय्यश्री:) मनुष्यांची शोभा आहे (प्राणांमुळेच शरीराची शोभा आहे) त्या प्राण वायूप्रमाणे वेगवान होऊन मी (प्रत्य--म्) शरीरातील वायूला निरंतर चालविणार्‍या गती देणार्‍या विद्युतेला (अरक्षसा) राक्षसांसारखी दृष्टवृत्ती नसणार्‍या अशा (शुद्ध) (मनसा) मनाने (आर्जिधर्मि) प्रकाशित करतो (सर्वांसाठी विद्युतेचे गुण व लाभ प्रकट करतो) त्याप्रमाणे (तत्) विजेच्या त्या तेज वा शक्तीचे (जुषेत) तुम्ही सेवन करा (मी विजेचे जे गुण सांगतो, त्याप्रमाणे तुम्ही त्या गुणांचे लाभ प्राप्त करा ॥24॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात उपमा आणि वाचकलुप्तोपमा हे दोन अलंकार आहेत (वास्तविक पाहता वाचकलुप्तोपमा हा स्वतंत्र अलंकार नसून उपमा अलंकाराचा एक भेद आहे) यात उपदेश केला आहे की हे मनुष्यांनो, तुम्ही लक्ष्मी (धनसंपदा) प्राप्त करून देणार्‍या अग्नी आदी पदार्थांचे ज्ञान प्राप्त करा आणि त्या (अग्नी, विद्युत आदी) शक्तीना विविध कार्यात प्रयुक्त करून धनवान व्हा. ॥24॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top