Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 11/ मन्त्र 35
    ऋषिः - देवश्रवदेववातावृषी देवता - होता देवता छन्दः - निचृत्त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    4

    सीद॑ होतः॒ स्वऽउ॑ लो॒के चि॑कि॒त्वान्त्सा॒दया॑ य॒ज्ञꣳ सु॑कृ॒तस्य॒ योनौ॑। दे॒वा॒वीर्दे॒वान् ह॒विषा॑ यजा॒स्यग्ने॑ बृ॒हद्यज॑माने॒ वयो॑ धाः॥३५॥

    स्वर सहित पद पाठ

    सीद॑। हो॒त॒रिति॑ होतः। स्वे। ऊँ॒ इत्यूँ॑। लो॒के। चि॒कि॒त्वान्। सा॒दय॑। य॒ज्ञम्। सु॒कृ॒तस्येति॑ सुऽकृ॒तस्य॑। योनौ॑। दे॒वा॒वीरिति॑ देवऽअ॒वीः। दे॒वान्। ह॒विषा॑। य॒जा॒सि॒। अग्ने॑। बृ॒हत्। यज॑माने। वयः॑। धाः॒ ॥३५ ॥


    स्वर रहित मन्त्र

    सीद होतः स्वऽउ लोके चिकित्वान्सादया यज्ञँ सुकृतस्य योनौ । देवावीर्देवान्हविषा यजास्यग्ने बृहद्यजमाने वयो धाः ॥


    स्वर रहित पद पाठ

    सीद। होतरिति होतः। स्वे। ऊँ इत्यूँ। लोके। चिकित्वान्। सादय। यज्ञम्। सुकृतस्येति सुऽकृतस्य। योनौ। देवावीरिति देवऽअवीः। देवान्। हविषा। यजासि। अग्ने। बृहत्। यजमाने। वयः। धाः॥३५॥

    यजुर्वेद - अध्याय » 11; मन्त्र » 35
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (अग्ने) तेजस्वी विद्वान, आपण (होत:) दान देणारे आणि (चिकित्वान्) विज्ञानविद् आहात. या (लोके) दर्शनीय अशा जगात (स्वे) सदा सुखात (सीद) स्थित रहा. (आपणास सदा सुख मिळो, अशी आमची प्रजाजनांची कामना आहे) आपण (सुकृतस्य) उत्तम कर्म करणार्‍या धर्मात्मा व्यक्तीसाठी (योनौ) त्याच्या कार्यासाठी (यज्ञम्) धर्मयुक्त राज्य आणि प्रजेसाठी योग्य सुखमय साधने वा व्यवहार (सादय) प्राप्त होतील, असे करा. तसेच (हविषा) दान आदान, देणे व घेणे या न्यायाप्रमाणे (देवान्) विद्वज्जनांनाचा वा दिव्य गुणांचा (यजासि) सत्कार व स्वीकार करा (त्यांचे दिव्य गुण घ्या आणि आपले (सगुण त्यांना द्या) तसेच (यजमानाने) राजा आदी श्रेष्ठ मनुष्यांना (वय:) दीर्घायू (धा:) धारण करण्यास समर्थ करा ॥35॥

    भावार्थ - भावार्थ - विद्वज्जनांसाठी उचित आहे की त्यांनी या संसारात दोन कर्में करावीत. प्रथम कर्म म्हणजे त्यांनी ब्रह्मचर्यपालन करून जितेंद्रिय होऊन आपले शरीर नीरोग व बलवान करावे आणि अशाप्रकारे पूर्ण आयुष्य जगावे. दुसरे कर्म म्हणजे क्रिया-नैपुण्य प्राप्त करून उत्तमप्रकारे आत्मिकबल सिद्ध करावे. यामुळे सर्व माणसेंदेखील शरीरात्मबलयुक्त होऊन सदा सर्वकाळी आनंदित राहतील. ॥35॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top