Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 11/ मन्त्र 49
    ऋषिः - उत्कील ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    3

    वि पाज॑सा पृ॒थुना॒ शोशु॑चानो॒ बाध॑स्व द्वि॒षो र॒क्षसो॒ऽअमी॑वाः। सु॒शर्म॑णो बृह॒तः शर्म॑णि स्याम॒ग्नेर॒हꣳ सु॒हव॑स्य॒ प्रणी॑तौ॥४९॥

    स्वर सहित पद पाठ

    वि। पाज॑सा। पृ॒थुना॑। शोशु॑चानः। बाध॑स्व। द्वि॒षः। र॒क्षसः॑। अमी॑वाः। सु॒शर्म्म॑ण॒ इति॑ सु॒ऽशर्म॑णः। बृ॒ह॒तः। शर्म॑णि। स्या॒म्। अ॒ग्नेः। अ॒हम्। सु॒हव॒स्येति॑ सु॒ऽहव॑स्य। प्रणी॑तौ। प्रनी॑ता॒विति॒ प्रऽनी॑तौ ॥४९ ॥


    स्वर रहित मन्त्र

    वि पाजसा पृथुना शोशुचानो बाधस्व द्विषो रक्षसोऽअमीवाः । सुशर्मणो बृहतः शर्मणि स्यामग्नेरहँ सुहवस्य प्रणीतौ ॥


    स्वर रहित पद पाठ

    वि। पाजसा। पृथुना। शोशुचानः। बाधस्व। द्विषः। रक्षसः। अमीवाः। सुशर्म्मण इति सुऽशर्मणः। बृहतः। शर्मणि। स्याम्। अग्नेः। अहम्। सुहवस्येति सुऽहवस्य। प्रणीतौ। प्रनीताविति प्रऽनीतौ॥४९॥

    यजुर्वेद - अध्याय » 11; मन्त्र » 49
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (वधूचे वचन वराप्रत) हे पति, (हे वर) जर आपण (पृथुना) विशाल (अत्याधिक) आणि (वि) विविध प्रकारच्या (पाजसा) शक्ती (शारीरिक, मानसिक, आर्थिक आदी) प्राप्त करीत (शोशुचान:) सदा शुद्ध वर्तन ठेवाल आणि स्वत:ला (अमीवा:) रोगाप्रमाणे प्राण्यांना पीडा देणारी (रक्षस:) दृष्ट दुराचारिणी (द्विष:) शत्रुरुप स्त्रियांना (बाधस्व) ताडित कराल (स्वत:ला व्यभिचारापासून अलिप्त ठेवाल) तर मी (बृहत:) अत्यंत (सुशर्मण:) शोभायमान (सुहवस्य) सुंदर मनोहारी व्यवहार वा आचरण करणार्‍या आणि (अग्ने:) अग्नीप्रमाणे प्रकाशमान (कीर्तिमान) अशा आपला (शर्मणि) आपल्या सुखमय घरात (पत्नी म्हणून आपल्या गृहस्थजीवनात) (प्रणीतौ) उत्तम धर्ममय री तीचे पालन करीत मी आपली पत्नी (स्याम) होईन (आपण व्यभिचारापासून दूर रहाल, अशी प्रतिज्ञा आपण करा, म्हणजे मी पति म्हणून आपला स्वीकार करीन) ॥49॥

    भावार्थ - भावार्थ - स्त्री आणि पुरुष (वधु आणि वर) यांना उचित आहे की त्यांनी विवाहसमयी अशी प्रतिज्ञा करावी की आम्ही नेहमी व्यभिचारापासून दूर राहू.) व्यभिचारिणी स्त्री आणि लंपट पुरुषांचा संग सर्वथा सोडून देऊ. एवढेच नव्हे तर त्यांनी आपसातदेखील विषयासक्तीची अती त्यागावी, ऋतुगामी होत एकमेकावर प्रेम करीत पराक्रमी संतानाला जन्म द्यावा. (हे सांगण्याचे कारण असे की) स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी व्यभिचाराशिवाय अनिष्टकारक आयुचा नाश करणारे आणि निंदनीय असे इतर कोणतेही कर्म नाही. यामुळे पति-पत्नीने व्यभिचार-कर्म सोडून नेहमी धर्माचरण करीत पूर्ण आयुष्य भोगून सुखी असावे ॥49॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top