Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 11/ मन्त्र 77
    ऋषिः - नाभानेदिष्ठ ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - भुरिगनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    3

    याः सेना॑ऽअ॒भीत्व॑रीराव्या॒धिनी॒रुग॑णाऽउ॒त। ये स्ते॒ना ये च॒ तस्क॑रा॒स्ताँस्ते॑ऽअ॒ग्नेऽपि॑दधाम्या॒स्ये॥७७॥

    स्वर सहित पद पाठ

    याः। सेनाः॑। अ॒भीत्व॑री॒रित्य॑भि॒ऽइत्व॑रीः। आ॒व्या॒धिनी॒रित्या॑ऽव्या॒धिनीः॑। उग॑णाः। उ॒त। ये। स्ते॒नाः। ये। च॒। तस्क॑राः। तान्। ते॒। अ॒ग्ने॒। अपि॑। द॒धा॒मि॒। आ॒स्ये᳖ ॥७७ ॥


    स्वर रहित मन्त्र

    याः सेनाऽअभीत्वरीराव्याधिनीरुगणाऽउत । ये स्तेना ये च तस्करास्ताँस्तेऽअग्नेपिदधाम्यास्ये ॥


    स्वर रहित पद पाठ

    याः। सेनाः। अभीत्वरीरित्यभिऽइत्वरीः। आव्याधिनीरित्याऽव्याधिनीः। उगणाः। उत। ये। स्तेनाः। ये। च। तस्कराः। तान्। ते। अग्ने। अपि। दधामि। आस्ये॥७७॥

    यजुर्वेद - अध्याय » 11; मन्त्र » 77
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे सेना आणि सभेचे स्वामिन् (हे सेनाध्यक्ष व सभाध्यक्ष) ज्याप्रमाणे (या:) ज्या) (अभीत्वरी:) समोर येऊन युद्ध करणारी आणि (आव्याधिनी:) अतिरोगवती तसेच पीडा-ताडना देणारी आणि (उगणा:) शस्त्रें उभारून आमच्या विरोधात उभी ठाकलेली (सेना:) शस्त्रुसेना आहे, त्या सेनेला (उत) आणखी (ये) जे (स्तेना:) सुरंग लावून वा भिंतीला भोक पाडून लोकांचे पदार्थ चोरणारे (च) आणखी (जे) तस्करा:) धूत आदी कपट करून दुसर्‍यांचे पदार्थ बळकावतात (तान्) अशा त्या (सेना, चोर-लुटारु व जुगारी लोकांना मी (अग्ने) व अग्नीच्या (आस्थे) ज्वाळेत (आदिदधामि) टाकतो, (वा त्यांना चटके देणे, पोळवणे यासारख्या शिक्षा देऊन दंडित करतो) त्याप्रमाणे हे सेनाध्यक्ष व सभाध्यक्ष, आपणही त्या कुकर्मी लोकांना दंडित करीत जा. (राजपुरुष, राजाधिकारी, आदी दुष्टांना दंडित करतात, तसे राजाने त्यांना अनुमती द्यावी) ॥77॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. धर्मात्मा राजपुरुषांनी आपल्याला अनुकूल असणार्‍या सैनिकांचा व प्रजाजनांचा निरंतर सत्कार करावा (त्यांनी राज्यासाठी वा युद्धप्रसंगी उल्लेखनीय कर्तृत्व केल्यास त्यांना पुरस्कारादीद्वारे सम्मानित करावे) आणि सेनेत वा प्रजेत जे लोक राज्यविरोधी असतील, चोर, लुटारू, असत्यभाषी, मिथ्यावार आणि व्यभिचारी लोक असतील, त्यांना अग्नी (दाह बोळविणे आदी द्वारा) चटका देणे आदी) भयानक प्रकारचे दंड देऊन त्यांना ताडित करून त्वरित काबूत आणावे ॥77॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top