Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 2/ मन्त्र 32
    ऋषिः - वामदेव ऋषिः देवता - पितरो देवताः छन्दः - ब्राह्मी बृहती,स्वराट् बृहती, स्वरः - मध्यमः
    2

    नमो॑ वः पितरो॒ रसा॑य॒ नमो॑ वः पितरः॒ शोषा॑य॒ नमो॑ वः पितरो जी॒वाय॒ नमो॑ वः पितरः स्व॒धायै॒ नमो॑ वः पितरो घो॒राय॒ नमो॑ वः पितरो म॒न्यवे॒ नमो॑ वः पितरः॒ पित॑रो॒ नमो॑ वो गृ॒हान्नः॑ पितरो दत्त स॒तो वः॑ पितरो देष्मै॒तद्वः॑ पितरो॒ वासः॑॥३२॥

    स्वर सहित पद पाठ

    नमः॑। वः॒। पि॒त॒रः॒। रसा॑य। नमः॑। वः॒। पि॒त॒रः॒। शोषा॑यः नमः॑। वः॒। पि॒त॒रः॒। जी॒वाय॑। नमः॑। वः॒। पि॒त॒रः॒। स्व॒धायै॑। नमः॑। वः॒। पि॒त॒रः॒। घो॒राय॑। नमः॑। वः॒। पि॒त॒रः॒। म॒न्यवे॑। नमः॑। वः॒। पि॒त॒रः॒। पि॒त॒रः॑। नमः॑। वः॒। गृ॒हान्। नः॒। पि॒त॒रः॒। द॒त्त॒। स॒तः। वः॒। पि॒त॒रः॒। दे॒ष्म॒। ए॒तत्। वः॒। पि॒त॒रः॒। वासः॑ ॥३२॥


    स्वर रहित मन्त्र

    नमो वः पितरो रसाय नमो वः पितरः शोषाय नमो वः पितरो जीवाय नमो वः पितरः स्वधायै नमो वः पितरो घोरय नमो वः पितरो मन्यवे नमो वः पितरः पितरो नमो वो गृहान्नः पितरो दत्त सतो वः पितरो देष्मैतद्वः पितरो वासऽआधत्त ॥


    स्वर रहित पद पाठ

    नमः। वः। पितरः। रसाय। नमः। वः। पितरः। शोषायः नमः। वः। पितरः। जीवाय। नमः। वः। पितरः। स्वधायै। नमः। वः। पितरः। घोराय। नमः। वः। पितरः। मन्यवे। नमः। वः। पितरः। पितरः। नमः। वः। गृहान्। नः। पितरः। दत्त। सतः। वः। पितरः। देष्म। एतत्। वः। पितरः। वासः॥३२॥

    यजुर्वेद - अध्याय » 2; मन्त्र » 32
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (पितर:) विद्यारूप आनंदाच्या प्राप्तीसाठी (व:) तुम्हांस आमचा (नम:) नमस्कार असो. (पितर:) दु:खाचा विनाश करणारे आणि आमचे रक्षण करणारे विद्वज्जनहो, (व:) तुम्हाला आमचा नमस्कार असो. (पितर:) धर्ममय जीविकेचे उपाय सांगणारे हे विद्वज्जन, (जीवाय) प्राण धारण करण्यासाठी (जगण्यासाठी) आवश्यक ही जीवीका उपलब्ध करून देण्यासाठी (व:) तुम्हाला आम्ही (नम:) सुशील वृत्तीने अभिवादन करतो. (पितर:) विद्या, अन्न आदीच्या उपभोगासाठी मार्गदर्शन करणारे हे विद्वजन, (स्वधायै) अत्र, भूमी, राज्य आणि न्यायाच्या प्राप्तीसाठी आम्ही (व:) तुम्हाला (नम:) नमन करतो. (पितर:) पापाचे व संकटाचे निवारक हे विद्वज्जन (घोराय) दु:खसमूहापासून मुक्ती मिळण्यासाठी (व:) तुम्हाला आमचे (नम:) नमन, यासाठी की आमच्यातील क्रोधभाव जळून जावो. (पितर:) श्रेष्ठ जनांचे पालक रक्षक हे विद्वज्जन, (मन्दवे) दुष्टाचरण करणार्‍या दुष्ट जीवांवर क्रोध करण्यासाठी (व:) तुमचा सत्कार करून आम्ही तुम्हाला (नम:) नमस्कार करावे (पितर:) हे मानी विद्वज्जन, (व:) तुमच्यापासून विदय ग्रहण करण्यासाठी आम्ही तुम्हाला (नम:) नमन करतो विज्ञान प्राप्त करण्यासाठी आमची मनीषा तुम्हांस कळो. (पित्पर:) प्रेमसहित रक्षण-आश्रम देणारे हे विद्वज्जन, (व:) तुमचा सत्कार करण्यासाठी आमची (नम:) सत्कार-भावना तुम्हांस कळो. आपण (न:) आमच्या (गृहान्) घरी सदा या आणि येऊन राहा. हे (पितर:) विद्यादान करणारे विद्वान करणारे विद्वज्जन, (न:) आम्हांस नित्य ज्ञान, विद्या व उपदेश (दत्त) देव राहा. हे माता, पिता आदी वंदनीय विद्वज्जन, आम्ही (व:) तुमच्यासाठी जे जे (सत:) पदार्थ दावन्य आहेत, आम्ही त्या पदार्थांचे तुम्हांस दान करीत राहू. (पितर:) सेवा करण्यास पात्र अशा हे पितरगण, आम्ही तुमच्या सेवे सादर करीत असलेल्या (वास:) वस्त्रादी पदार्थांना तुम्ही स्वीकार करा. ॥32॥

    भावार्थ - भावार्थ- या मंत्रात (नम:) हा शब्द अनेकवेळा आला आहे. त्याचा बहुल प्रयोग विद्वानात असलेले अनेक शुभ गुण व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या विषयी सम्मान प्रकट करण्यासाठी केला आहे. ज्याप्रमाणे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमन्त आणि शिशिर हे सहा ऋतू कुमंण रस, शोष, प्राण, अन्न, काठिन्य आणि क्रोध उत्पन्न करणारे आहेत, तसेच पितरगण देखील अनेक विद्यांचा उपदेश करून मनुष्यांना नित्य विविध देतात. याकरिता मनुष्यांनी वर वर्णित सद्गुणांनी युक्त अशा विद्वज्जनांना सेवनीय व भाग्य पदार्थ देऊन संतुष्ट करावे आणि त्यांच्याकडून अनेक विद्यांचे ज्ञान मिळवीत जावे. ॥32॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top