Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 2/ मन्त्र 8
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः देवता - विष्णुर्देवता छन्दः - विराट् ब्राह्मी पङ्क्ति, स्वरः - पञ्चमः
    5

    अस्क॑न्नम॒द्य दे॒वेभ्य॒ऽआज्य॒ꣳ संभ्रि॑यास॒मङ्घ्रि॑णा विष्णो॒ मा त्वाव॑क्रमिषं॒ वसु॑मतीमग्ने ते छा॒यामुप॑स्थेषं॒ विष्णो॒ स्थान॑मसी॒तऽइन्द्रो॑ वी॒र्य्यमकृणोदू॒र्ध्वोऽध्व॒रऽआस्था॑त्॥८॥

    स्वर सहित पद पाठ

    अस्क॑न्नम्। अ॒द्य। दे॒वेभ्यः॑। आज्य॑म्। सम्। भ्रि॒या॒स॒म्। अङ्घ्रि॑णा। वि॒ष्णो॒ऽइति॑ विष्णो। मा। त्वा॒। अव॑। क्र॒मि॒ष॒म्। वसु॑मती॒मिति॒ वसु॑ऽमतीम्। अ॒ग्ने॒। ते॒। छा॒याम्। उप॑। स्थे॒ष॒म्। विष्णोः॑। स्थान॑म्। अ॒सि॒। इ॒तः। इन्द्रः॑। वी॒र्य्य᳖म्। अ॒कृ॒णो॒त्। ऊ॒र्ध्वः। अ॒ध्व॒रः। आ। अ॒स्था॒त् ॥८॥


    स्वर रहित मन्त्र

    अस्कन्नमद्य देवेभ्यऽआज्यँ सम्भ्रियासमङ्घ्रिणा विष्णो मा त्वावक्रमिषँवसुमतीमग्ने ते छायामुपस्थेषँ विष्णो स्थानमसीतऽइन्द्रो वीर्यमकृणोदूर्ध्वा ध्वर आस्थात् ॥


    स्वर रहित पद पाठ

    अस्कन्नम्। अद्य। देवेभ्यः। आज्यम्। सम्। भ्रियासम्। अङ्घ्रिणा। विष्णोऽइति विष्णो। मा। त्वा। अव। क्रमिषम्। वसुमतीमिति वसुऽमतीम्। अग्ने। ते। छायाम्। उप। स्थेषम्। विष्णोः। स्थानम्। असि। इतः। इन्द्रः। वीर्य्यम्। अकृणोत्। ऊर्ध्वः। अध्वरः। आ। अस्थात्॥८॥

    यजुर्वेद - अध्याय » 2; मन्त्र » 8
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (देवेभ्य:) उत्तम सुखांच्या प्राप्तीकरिता जे (अस्कन्नम्) स्वामी सुख देणारे आहेत अशा (आज्यम्) धृत आदी पदार्थांंना (अंध्रिणा) त्या पदार्थांना नेणार्‍या किंवा वर पाठविणार्‍या अग्नीशी (अघ) मी आज (संभियासम्) संयुक्त करतो (त्या पदार्थांना सज्ञाग्नीत टाकतो) (त्वा) त्या क्रियेचे (यज्ञात आहुती देण्याचे माझ्याकडून कधीही (मावक्रमिषम्) उल्लंघन होऊ नये. हे (अग्ने) परमेश्‍वरा, (वसुमतीम्) त्या पदार्थांचा मला दान देणार्‍या (ते) तुझ्या (छायाम्) आश्रयाचा मी नेहमी आधार घ्यावा, असे कर. तसेच हा (अग्ने) अग्नी (विष्णते:) यज्ञाचे जे (स्थानम्) स्थान (असि) आहे, त्या स्थानाचा व (वसुमतीम्) उत्तम पदार्थ देणार्‍या (छायाम्) यज्ञाच्या आश्रयाचा देखील मी (उपस्थेषम्) कधीही त्याग करू नये, नेहमी यज्ञाचे अनुष्ठान करावे. (ऊर्ध्व:) वर आकाशात (अघ्वर:) यज्ञात स्थापित अग्नी (आ) सर्व प्रकारे (अस्थात्) स्थिर होतो. (इंद्र) सूर्य आणि वायू त्यास धारण करून (वीर्य्यम्) कर्म करतात अथवा सामर्थ्य (अकृणोत्) प्रकट करतात. (त्या यज्ञाग्नीमुळे सूर्य आणि वायू आपल्या शक्तीने जगाचा उपकार- कर्म करतात.) ॥8॥

    भावार्थ - भावार्थ - परमेश्‍वर उपदेश करीत आहे की यज्ञामुळे जलाची आणि वायूची शुद्धी होते. त्या शुद्ध जल आणि वायूमुळे पुष्कळ अन्न-धान्याची उत्पत्ती होते. अशा यज्ञाच्या आयोजन-अनुष्ठानासाठी मनुष्यांनी भरपूर आवश्यक यज्ञ-सामग्रीचे संकलन केले पाहिजे. जाणवो की मी परमेश्‍वर सर्वत्र .व्यापक आहे. करिता माझ्या आज्ञेचे उल्लंघन कोणी कधीही करूं नये. या व्यतिरिक्त अगणित सुखांचे कारण जे माझे आश्रम आहे, त्या आश्रमात सदा राहावे. आश्रयात राहून मनुष्यांनी यज्ञाचे अनुष्ठान सदैव करावे, कारण की अग्नीत जे पदार्थ हवन केले जातात, त्यांस सूर्य आपल्या किरणांनी आकृष्ट करून वायूच्या साह्याने वर मेघमंडळात स्थापित करतो. पुन्हा सूर्य तेथून मेघाद्वारे जलरूपाने पृथ्वीवर सोडतो. आणि त्या वृष्टीमुळे भूमीवर महान सुखाचा प्रसार होतो. सर्व मनुष्यांनी असा हा महोपकारी यज्ञ करणे सदैव उचित आहे. ॥8॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top