Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 2/ मन्त्र 14
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः देवता - अग्निः सर्वस्य छन्दः - अनुष्टुप्,भूरिक् आर्ची गायत्री स्वरः - गान्धारः
    5

    ए॒षा ते॑ऽअग्ने स॒मित्तया॒ वर्ध॑स्व॒ चा च प्यायस्व। व॒र्धि॒षी॒महि॑ च व॒यमा च॑ प्यासिषीमहि। अग्ने॑ वाजजि॒द् वाजं॑ त्वा संसृ॒वासं॑ वाज॒जित॒ꣳ सम्मा॑र्ज्मि॥१४॥

    स्वर सहित पद पाठ

    ए॒षा। ते॒। अ॒ग्ने॒। स॒मिदिति॑ स॒म्ऽइत्। तया॑। वर्ध॑स्व। च॒। आ॒। च॒। प्या॒य॒स्व॒। व॒र्धि॒षी॒महि॑। च॒। व॒यम्। आ। च॒। प्या॒सि॒षी॒म॒हि॒। अग्ने॑। वा॒ज॒जि॒दिति॑ वाजऽजित्। वाज॑म्। त्वा॒। स॒सृ॒वास॒मिति॑ स॒सृ॒वास॑म्। वा॒ज॒जित॒मिति॑ वाज॒ऽजित॑म्। सम्। मा॒र्ज्मि॒ ॥१४॥


    स्वर रहित मन्त्र

    एषा तेऽअग्ने समित्तया वर्धस्व चा च प्यायस्व । वर्धिषीमहि च वयमा च प्यासिषीमहि । अग्ने वाजजिद्वाजन्त्वा ससृवाँसँ वाजजितँ सम्मार्ज्मि ॥


    स्वर रहित पद पाठ

    एषा। ते। अग्ने। समिदिति सम्ऽइत्। तया। वर्धस्व। च। आ। च। प्यायस्व। वर्धिषीमहि। च। वयम्। आ। च। प्यासिषीमहि। अग्ने। वाजजिदिति वाजऽजित्। वाजम्। त्वा। ससृवासमिति ससृवासम्। वाजजितमिति वाजऽजितम्। सम्। मार्ज्मि॥१४॥

    यजुर्वेद - अध्याय » 2; मन्त्र » 14
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (अग्ने) हे परमेश्‍वरा, (ते) तुझी जी (एषा) ही (समित्) चांगल्याप्रकारे पदार्थांच्या गुणांना प्रकट करणारी वेदविद्या आहे, (तया) त्या विद्येद्वारे, वेदमंत्राद्वारे आम्ही तुझी स्तुती करतो, त्यास अनुकुल होऊन तू नित्य आमच्या (वर्धस्त) ज्ञानामध्ये वृद्धी करीत राहा म्हणजे तुझे ध्यान हृदयी वाढत राहो. तसेच त्या वेदविद्येद्वारे आमची ही उन्नती होत राहो. हे भगवन्, तुझ्या गुणांचे महत्त्व आम्ही जाणतो. त्या तू किती गुणसागर आहेस, हे जाणतो. (च) आमच्या हृदयात त्या गुणांचा प्रकाश दे आणि (प्यायस्व) आमच्या आत्म्यांत तुझे ध्यान दृढ राहू दे व आमची सर्व दृष्ट्या सतत वृद्धी होऊ दे. हे भगवन्, (अग्ने) तू विज्ञानरूप, विजयदायक (वाजम्) ज्ञान स्वरूप व (ससृवांसम्) सर्वांवर विजय मिळवणारा आहेस. (त्वा) आम्ही तुझी (वर्धिषीमहि स्तुती करून वृद्धिंगत होत राहू, असे कर. (च) तुझी कृपा असावी की जेणे करून आम्ही सर्वांना शीघ्र जिंकणारे व ज्ञानी होऊ म्हणजे सर्वांची मनें ओळखणारे होऊ. तसेच असे व्हावे की आम्ही तुझी अधिकाधिक स्तुती करीत राहू आणि तू ही आम्हास सर्व उत्तमांत्तम गुणांनी आणि सुखांनी (आप्यायस्व) समृद्ध करीत जा. तुझ्या आश्रयात राहून तुझ्या आज्ञेचे पालन केल्याने (संमार्ज्मि) आम्ही चांगल्या प्रकारे शुद्ध होतो. हा या मंत्राचा पहिला अर्थ आहे ॥1॥ हा भौतिक अग्नी (एषे) हा जो (अग्ने) भौतिक अग्नी आहे (ते) त्याला (समित्) चांगल्या प्रकारे प्रदीप्त करणारे काष्ठ-समूह आहे,(तया) त्याने हा अग्नी (वर्धस्व) वाढतो आणि (आप्यायस्व) परिपूर्ण होतो. आम्ही त्या अग्नीला (वाजम्) शक्ती आणि वेग प्राप्त करण्यसाठी व (संसृवांसम्) शिल्पविद्येद्वारे त्याच्या गुणांना ग्रहण करण्यासाठी तसेच (वाजनितम् युद्ध जिंकणाच्या साधनांसाठी (वर्धिणीमहि) वाढवतो (च) आणि (आप्मासिवीमहि) कला आदीसाठी अग्नीचा उपयोग करतो. ज्यामुळे शिल्पविद्येने (विज्ञानाने) निर्मित विमान आदी यानांच्या सहाय्याने तसेच शिल्पविद्येने अविष्कृत गुणांद्वारे हा अग्नी आम्हास युद्धात शीघ्र विजय मिळवून सहाय्यभूत व्हावा यासाठी (त्वा) त्या अग्नीचा आम्ही (संभार्ज्यि) उत्तम प्रकारे प्रयोग करतो. ॥14॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे. या मंत्रात एका अर्थासाठी दोन क्रियापद वापरले आहेत (‘वर्चस्व’ आणि ‘आप्यायस्व’) अधिक आदरभाव दर्शविण्यासाठी या दोन क्रियापदांचा उपयोग केला आहे. जे लोक परमेश्‍वराच्या आज्ञेचे पालन करून आणि कर्मकुशल होऊन स्वत:ची उन्नती साधतात, तेच आपल्या विद्येद्वारे सर्वांना आनंदित करतात आणि शत्रूंना जिंकून शुद्ध राहून सदा सुखी राहतात. आळसी लोकांना असे सुख कधीही प्राप्त होत नाही. या मंत्रात ‘च’ या अन्ययाचा चार वेळा प्रयोग केला आहे, त्यावरून असे जाणावे की ईश्‍वराची आज्ञा सूक्ष्म आणि स्थूल या भेदामुळे अनेक प्रकारची आहे. तसेच क्रिया-काण्ड मधे करणीय असे कार्य देखील अनेक प्रकारचे आहेत या करिता चार वेळा ‘चकार’ चा प्रयोग केला आहे. तेराव्या मंत्रात ज्या वेद विद्येचे वर्णन केले आहे, सुखार्थी मनुष्याने त्याप्रमाणे यज्ञाचे आनुष्ठान आणि तडनुकूल पुरूषार्थ व कर्माचरण अवश्य केले पाहिजे, हे या मंत्रात प्रतिपादित केले आहे. ॥14॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top