Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 2/ मन्त्र 10
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः देवता - इन्द्रो देवता छन्दः - भूरिक् ब्राह्मी पङ्क्ति, स्वरः - पञ्चमः
    6

    मयी॒दमिन्द्र॑ऽइन्द्रि॒यं द॑धात्व॒स्मान् रायो॑ म॒घवा॑नः सचन्ताम्। अ॒स्माक॑ꣳ सन्त्वा॒शिषः॑ स॒त्या नः॑ सन्त्वा॒शिष॒ऽउप॑हूता पृथि॒वी मा॒तोप॒ मां पृ॑थि॒वी मा॒ता ह्व॑यताम॒ग्निराग्नी॑ध्रा॒त् स्वाहा॑॥१०॥

    स्वर सहित पद पाठ

    मयि॑। इ॒दम्। इन्द्रः॑। इ॒न्द्रि॒यम्। द॒धा॒तु। अ॒स्मान्। रायः॑। म॒घवा॒न॒ इति॑ म॒घऽवा॑नः। स॒च॒न्ता॒म्। अ॒स्माक॑म्। स॒न्तु॒। आ॒शिष॒ इत्या॒ऽशिषः॑। स॒त्याः। नः॒। स॒न्तु॒। आ॒शिष॒ इत्या॒ऽशिषः॑। उप॑हू॒तेत्युप॑ऽहूता। पृ॒थि॒वी। मा॒ता। उप॑। माम्। पृ॒थि॒वी। मा॒ता। ह्व॒य॒ता॒म्। अ॒ग्निः। आग्नी॑ध्रात्। स्वाहा॑ ॥१०॥


    स्वर रहित मन्त्र

    मयीदमिन्द्रऽइन्द्रियन्दधात्वस्मान्रायो मघवानः सचन्ताम् । अस्माकँ सन्त्वाशिषः सत्या नः सन्त्वाशिषः उपहूता पृथिवी मातोप माम्पृथिवी माता ह्वयतामग्निराग्नीध्रात्स्वाहा ॥


    स्वर रहित पद पाठ

    मयि। इदम्। इन्द्रः। इन्द्रियम्। दधातु। अस्मान्। रायः। मघवान इति मघऽवानः। सचन्ताम्। अस्माकम्। सन्तु। आशिष इत्याऽशिषः। सत्याः। नः। सन्तु। आशिष इत्याऽशिषः। उपहूतेत्युपऽहूता। पृथिवी। माता। उप। माम्। पृथिवी। माता। ह्वयताम्। अग्निः। आग्नीध्रात्। स्वाहा॥१०॥

    यजुर्वेद - अध्याय » 2; मन्त्र » 10
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (इन्द्रः) परमेश्‍वर (मयि) माझ्यावर (इदम्) या प्रत्यक्ष (इंद्रियम्) ऐश्‍वराच्या प्राप्तीसीठी नित्य कृपा करो. परमेश्‍वराने आपल्या ज्ञानाने (वेदवाणीद्वारे) जे पाहिले अथवा जे ज्ञान प्रकट केले आहे, व ते मान सर्व सुखांची इच्छा करणार्‍या विद्वानांना दिले आहे आणि त्या ज्ञानाचे, इन्द्र म्हणजे विद्वज्जन मोठ्या प्रितीने सेवन करतात, परमेश्‍वर ते ज्ञानधन तसेच (राय:) विद्या, स्वर्ण आदी द्रव्य व चक्रवर्ती राज्य आदी घन नित्य (दधातु) विद्वजुनांना देवो. परमेश्‍वराच्या कृपेने आणि स्वपुरूषार्थाने (मघवान:) आम्ही पुष्कळ धन राज्य आदी पदार्थांसह पूर्ण ऐश्‍वर्ययुक्त व्हावेत असे होते वरील सर्व धन (न:) आम्हा धर्मात्माजनांना (वचन्ताम्) प्राप्त व्हावेत. (अस्माकम्) आम्हा परोपकारी धर्मात्माजनांच्या (आशिष:) कामना (सत्या:) सत्य व पूर्ण (सन्तु) व्हाव्यात. तसेच (न:) आमच्या (आशिष:) ज्या न्यायपूर्ण इच्छा व त्यानुसार क्रिया आहेत, त्यादेखील (सत्या:) पूर्ण (सन्तु) व्हाव्यात. त्याचप्रमाणे (भावा) धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांच्याद्वारे प्राप्त होणारी जी विद्या आहे, ती तसेच (पृथिनी) अत्यंत सुखदायिनी भूमी (उपहूता) की ज्यावर राज्य संपादित करून मनुष्य सुखाची कामना करतात, ती भुमी (मां) सुखाची इच्छा करणार्‍या मला (उपहृयताम्) उत्तम प्रकारे सांगत आहे. तसेच मी करत असलेल्या या यज्ञात प्रयुक्त होणारा (अग्नी:) हा भौतिक अग्नी (आग्नीध्रात्) इंधनादीद्वारे प्रज्वलित होऊन सर्व वांछित सुख देणारा होवो (न:) आमच्यासाठी सुख घेऊन देणारा होवो. होमात अग्नीचा योग्य व चांगल्या रीतीने प्रयोग केल्यानंतर अग्नी इच्छित फळांची प्राप्ती करून देणारा होतो. (स्वाहा) वेदवाणी सर्व माणसांना वरील कर्म करण्यास सांगत आहे. ॥10॥

    भावार्थ - भावार्थ - जी माणसे पुरूषार्थी आणि परोपकारी असून ईश्‍वराचे उपासक आहेत त्यांनाचे श्रेष्ठ ज्ञान, उत्तम धन आणि सत्य कामनांची प्राप्ती होत असते, इतरांना नव्हे. पृथिनी या शब्दाते सर्वांना प्रिय व माननीय असलेले भूमी आणि विद्या असे अर्थ प्रकट केले आहेत, ती भूमी आणि विद्या असे अर्थ प्रकट केले आहेत, ती भूमी आणि विद्या या दोन्ही वस्तू सर्व मनुष्यांचा उपकार करणार्‍या आहेत. ईश्‍वराने या वेदमंत्राद्वारे हाच उपदेश सांगितला आहे. तसेच नवव्या मंत्रात अग्नी आदी पदार्थांपासून इच्छित सुखांच्या प्राप्ती विषयी जे सांगितले आहे, तोच उपदेश या दहाव्या मंत्रातही प्रकट केला आहे. ॥10॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top