यजुर्वेद - अध्याय 24/ मन्त्र 1
ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः
देवता - प्रजापतिर्देवता
छन्दः - भुरिक् संकृतिः
स्वरः - गान्धारः
1
अश्व॑स्तूप॒रो गो॑मृ॒गस्ते प्रा॑जाप॒त्याः कृ॒ष्णग्री॑वऽआग्ने॒यो र॒राटे॑ पु॒रस्ता॑त् सारस्व॒ती मे॒ष्यधस्ता॒द्धन्वो॑राश्वि॒नाव॒धोरा॑मौ बा॒ह्वोः सौ॑मापौ॒ष्णः श्या॒मो नाभ्या॑ सौर्यया॒मौ श्वे॒तश्च॑ कृ॒ष्णश्च॑ पा॒र्श्वयो॑स्त्वा॒ष्ट्रौ लो॑म॒शस॑क्थौ स॒क्थ्योर्वा॑य॒व्यः श्वे॒तः पुच्छ॒ऽइन्द्रा॑य स्वप॒स्याय वे॒हद्वै॑ष्ण॒वो वा॑म॒नः॥१॥
स्वर सहित पद पाठअश्वः॑। तू॒प॒रः। गो॒मृ॒ग इति॑ गोऽमृ॒गः। ते। प्रा॒जा॒प॒त्या इति॑ प्राजाऽप॒त्याः। कृ॒ष्णग्री॑व॒ इति॑ कृ॒ष्णऽग्री॑वः। आ॒ग्ने॒यः। र॒राटे॑। पु॒रस्ता॑त्। सा॒र॒स्व॒ती। मे॒षी। अ॒धस्ता॑त्। हन्वोः॑। आ॒श्वि॒नौ। अ॒धोरा॑मा॒वित्य॒धःऽरा॑मौ। बा॒ह्वोः। सौ॒मा॒पौ॒ष्णः। श्या॒मः। नाभ्या॑म्। सौ॒र्य॒या॒मौ। श्वे॒तः। च॒। कृ॒ष्णः। च॒। पा॒र्श्वयोः॑। त्वा॒ष्ट्रौ। लो॒म॒शस॑क्था॒विति॑ लोम॒शऽस॑क्थौ। स॒क्थ्योः। वा॒य॒व्यः᳖। श्वे॒तः। पुच्छे॑। इन्द्रा॑य। स्व॒प॒स्या᳖येति॑ सुऽअप॒स्या᳖य। वे॒हत्। वै॒ष्ण॒वः। वा॒म॒नः ॥१ ॥
स्वर रहित मन्त्र
अश्वस्तूपरो गोमृगस्ते प्राजापत्याः कृष्णग्रीवऽआग्नेयो रराटे पुरस्तात्सारस्वती मेष्यधस्ताद्धन्वोराश्विनावधोरामौ बाह्वोः सौमपौष्णः श्यामो नाभ्याँ सौर्ययामौ श्वेतश्च कृष्णश्च पार्श्वयोस्त्वाष्ट्रौ लोमशसक्थौ सक्थ्योर्वायव्यः श्वेतः पुच्छ इन्द्राय स्वपस्याय वेहद्वैष्णवो वामनः ॥
स्वर रहित पद पाठ
अश्वः। तूपरः। गोमृग इति गोऽमृगः। ते। प्राजापत्या इति प्राजाऽपत्याः। कृष्णग्रीव इति कृष्णऽग्रीवः। आग्नेयः। रराटे। पुरस्तात्। सारस्वती। मेषी। अधस्तात्। हन्वोः। आश्विनौ। अधोरामावित्यधःऽरामौ। बाह्वोः। सौमापौष्णः। श्यामः। नाभ्याम्। सौर्ययामौ। श्वेतः। च। कृष्णः। च। पार्श्वयोः। त्वाष्ट्रौ। लोमशसक्थाविति लोमशऽसक्थौ। सक्थ्योः। वायव्यः। श्वेतः। पुच्छे। इन्द्राय। स्वपस्याययेति सुऽअपस्याय। वेहत्। वैष्णवः। वामनः॥१॥
विषय - आता चोविसाव्या अध्यायाचा आरंभ होत आहे. या मंत्रात, मनुष्यांनी पशूंपासून कशाप्रकारे व कोणते लाभ घ्यावेत, हा विषय मांडलेला आहे. -
शब्दार्थ -
शब्दार्थ - हे मनुष्यांनो (तुम्ही या मंत्रात वर्णन केलेल्या पशुचे पालन करा तसेच पशूच्या अंगी जे जे गुण आहेत, त्यांपासून लाभ घ्या) (अश्वः) शीघ्रगामी वेगवान घोड्यापासून (लवकर प्रवास करणे) तसेच (तूपरः) हिंसक वाघ, सिंह हत्ती आदी पशूंपासून (अनावश्यक पशूंचा नाश व प्राणी संख्या समतोल राखणे) हे गुण घ्या. (प्राजापत्याः) प्रजापालक सूर्यापासून म्हणजे सूर्यलोकाच्या गुणांपासून (ते) जे प्राणी गुण वा जीवन घेतात त्या (कृष्णग्रीवः) काळ्या रंगाची मान असलेला पशुपासून गुण घ्या. (आग्नेयः) अग्नी देवता असलेल्या आणि (पुरस्तात्) सर्वप्रथम (रराटे) ललाटावर (चिद्व असलेली) (मेषी) मेंढी आणि (सरस्वती) सरस्वती देवते असणार्या पशूच्यरा (अधस्तात्) शरीराच्या खालच्या भागासाठी (पोटावर) (हन्वोः) हनुवटीच्या उजव्या-डाव्या भागासाठी आणि (बाह्वोः) भुजा वा पायांसाठी (ऐश्वर्ययूक्त पुरूषाशी संपर्क करा आणि त्या त्या पशूचा त्या त्या लाभासाठी उपयोग करा) (अधोरामौ) खाली म्हणजे भूमीवर रमण करणार्या (आश्विनौ) अश्वि देवता असणार्या पशूंच्या तसेच (सौमपौष्णः) सोम व पूषा देवता असणार्या पशूंच्या (श्यामः) काल्या रंगासाठी तसेच त्या पशूच्या (नाभ्याम्) नाभी वा उदरासठी (इन्द्राशी संपर्स करा व पशूपासून लाभ घ्या) (पार्श्वयोः) ज्या पशूच्या डाव्या भागावर व उजव्या भागावर (श्वेतः) पांढरा (च) आणि (कृष्णः) काळा रंग आहे, (च) तसेच (सौर्ययामौ) सूर्य यमाशी संबधीत पशूंसाठी अथवा (सक्थ्योः) पायाच्या संधीत (घोटा व गुडघा आदी संधिस्थानासाठी) तसेच (लोमसशक्थौ) ज्या संधीस्थानावर पुष्कळ रोम वा केस आहेत अशा स्थानासाठी (इन्द्राशी संपर्क करा आणि त्या पशूं पासून उपयोग घ्या) (त्वाष्ट्रौ) त्वष्टा देवता असणार्या पशूंच्या (पुच्छे) शेपटीसाठी आणि (श्वेतः) त्याच्या पांढर्या रंगासाठी याशिवाय (वायव्यः) वायू ज्यांच्या देवता, त्या पशूंसाठी (यत्न व पालन करा.) (वेहत्) कामोद्दीपित झाल्याशिवायच जी गौ गर्भवती झाली (वळूशी असमयीं संबंध आल्यामुळे ज्या गायीचा गर्भ कधी ठरत नाही ) अशा गायीसाठी अथवा (वैष्णवः) विष्णु ज्यांचा देवता, अशा (वामनः) बुटके शरीर असलेल्या पशूसाठी, हे मनुष्यानो, तुम्ही (स्वपस्याय) ज्याचे कर्म सुंदर आहेत, अशा (इन्द्राय) ऐश्वर्यवान पुरूषाशी संपर्क करा (वरील लक्षण व चिन्ह असलेले पशू पशुपालक राजा आदी द्या तसेच तुम्ही सर्व त्या पशूंनासून लाभ घ्या तात्पर्य असा की पशूच्या प्रत्येक अंगासाठी आनंद सुख वा लाभ देणार्या प्रत्येक अवयवासाठी त्या त्या पशूचे पालन करा. ॥1॥
भावार्थ - भावार्थ - जी माणसें अश्व आदी पशूंपासून आपली इच्छित कामें पूर्ण करून घेतात, त्याद्वारे ऐश्वर्यवान होऊन धर्मानुकूल कार्य करतात, ते उत्तम भाग्यशाली ठरतात. या मंत्रात सर्वत्र जेथे जेथे देवता शब्दाचा उपयोग केला आहे, तेथे त्या देवतेतील गुणांचा संबंध त्या त्या पशूंशी आहे, असे जाणावे. (उदाहरणार्थ - सरस्वती वाणीचा संबंध ओरडणार्या शेळी, गाय आदी पशूंशी, अश्वि देवतेचा संबंध उत्तम स्वास्थ्यासाठी, त्वष्टा देवतेचा संबंध विश्व निर्माता परमेश्वराशी आहे) ॥1॥
इस भाष्य को एडिट करेंAcknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
N/A
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal