यजुर्वेद - अध्याय 5/ मन्त्र 3
भव॑तं नः॒ सम॑नसौ॒ सचे॑तसावरे॒पसौ॑। मा य॒ज्ञꣳ हि॑ꣳसिष्टं॒ मा य॒ज्ञप॑तिं जातवेदसौ शि॒वौ भ॑वतम॒द्य नः॑॥३॥
स्वर सहित पद पाठभव॑तम्। नः॒। सम॑नसा॒विति॒ सऽम॑नसौ। सचे॑तसा॒विति॒ सऽचे॑तसौ। अ॒रे॒पसौ॑। मा। य॒ज्ञम्। हि॒सि॒ष्ट॒म्। मा। य॒ज्ञप॑ति॒मिति॑ य॒ज्ञऽप॑तिम्। जा॒त॒वे॒द॒सा॒विति॑ जातऽवेदसौ। शि॒वौ। भ॒व॒त॒म्। अ॒द्य। नः॒ ॥३॥
स्वर रहित मन्त्र
भवतन्नः समनसौ सचेतसावरेपसौ । मा यज्ञँ हिँसिष्टंम्मा यज्ञपतिञ्जातवेदसौ शिवौ भवतमद्य नः ॥
स्वर रहित पद पाठ
भवतम्। नः। समनसाविति सऽमनसौ। सचेतसाविति सऽचेतसौ। अरेपसौ। मा। यज्ञम्। हिसिष्टम्। मा। यज्ञपतिमिति यज्ञऽपतिम्। जातवेदसाविति जातऽवेदसौ। शिवौ। भवतम्। अद्य। नः॥३॥
विषय - यजमान आणि याजक विद्वान कसे असावेत, हे पुढील मंत्रात सांगितले आहे -
शब्दार्थ -
शब्दार्थ - (अरेपसौ) सामान्य मनुष्यांसारखी भाषा बोलणे वा तसे उच्चारण करणे हे ज्यांना शक्य नाही. (म्हणजे जे शुद्ध सुसंस्कृत भाषा वापरतात) असे विद्यार्थी आणि अध्यापक, हे दोघे जण (समनसौ) समान मन व विचाराचे असावेत (सचेतसौ) समान ज्ञानदान व ग्रहणशक्तीचे असावेत. (जातवेदसौ) वेद आणि उपविद्यांना वाचणारे आणि शिकविणारे विद्वान असावेत. ते अध्यापक व शिष्य (नः) आम्हा जनांना उपदेश करणारे (भवतम्) असावेत तसेच (यज्ञम्) अध्ययन व अध्यापनरूप यज्ञाला आणि (यज्ञपतिम्) विद्याप्रद यज्ञाचे पालन करणार्या यजमानाला (माहिंसिष्टम्) त्रासदायक वा पीडाकारक असूं नयेत. (वेद आदी शास्त्राचे अध्यापक व ग्रहीता विद्यार्थी एकमन असावेत आणि ते याज्ञिकास व यजमानास प्रतिकूल असूं नयेत, अनुकूल आणि मार्गदर्शक असावेत) ते दोघे (नः) आम्हा याज्ञिक यजमाना साठी (शिवौ) मंगल करणारे (भवतम्) असावेत/व्हावेत ॥3॥
भावार्थ - भावार्थ - मनुष्यांसाठी उचित आहे की विद्येचा प्रचार प्रसार करण्यासाठी नेहमी अध्ययन, अध्यापन करीत राहावे आणि कधीही मंगलकारी आचरणास सोडूं नये, कारण की हेच सर्वोत्तम कार्य आहे ॥3॥
इस भाष्य को एडिट करेंAcknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
Shri Virendra Agarwal
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal