Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 34/ मन्त्र 33
    ऋषिः - गोतम ऋषिः देवता - उषर्देवता छन्दः - निचृत परोष्णिक् स्वरः - ऋषभः
    3

    उष॒स्तच्चि॒त्रमा भ॑रा॒स्मभ्यं॑ वाजिनीवति।येन॑ तो॒कं च॒ तन॑यं च॒ धाम॑हे॥३३॥

    स्वर सहित पद पाठ

    उषः॑। तत्। चि॒त्रम्। आ। भ॒र॒। अ॒स्मभ्य॑म्। वा॒जि॒नी॒व॒तीति॑ वाजिनीऽवति ॥ येन॑। तो॒कम्। च॒। तन॑यम्। च॒। धाम॑हे ॥३३ ॥


    स्वर रहित मन्त्र

    उषस्तच्चित्रमाभरास्मभ्यँवाजिनीवति । येन तोकञ्च तनयञ्च धामहे ॥


    स्वर रहित पद पाठ

    उषः। तत्। चित्रम्। आ। भर। अस्मभ्यम्। वाजिनीवतीति वाजिनीऽवति॥ येन। तोकम्। च। तनयम्। च। धामहे॥३३॥

    यजुर्वेद - अध्याय » 34; मन्त्र » 33
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (वाजिनीवती) अन्न धान्य आदी अनेक संपत्तीमुळे धनवान असलेली (उषः) आणि उषःकाळासारखी मोहक कान्ती धारण करणार्‍या हे गृहिणी स्त्री अथवा स्त्रियांनो, संपत्ती आदी पदार्थ मिळविण्याची उचित वेळ म्हणजे प्रातःकाळ, ती ज्याप्रकारचे (चित्रम्) अद्भुत रूप-सौदर्य धारण करते (तत्) तसे रूप तु वा तुम्ही (अस्मभ्यम्) आमच्याकरिता (आम्हा पतीसाठी) (आ, भर) मोहकतेने धारण करा. (येन) ज्यामुळे आम्ही (म्हणजे तुमचे पती) (तोकम्) नवजात बालक (च) आणि (तनयम्) कुमारवयाच्या पुत्राला (च) ही (दामहे) प्राप्त करू. (पत्नीने उषःकाळासारखा सुंदर मोहक श्रृंगार करावा व पतीना प्रसन्न ठेवावे. ॥33॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे अति शोभिवंत मंगलकारिणी उषा सर्व आवश्यक (ध्यान, धारणा, योग, स्नान आदी) व्यवहार पूर्ण करविते, तशा प्रकारच्या जर स्त्रिया (गृहपत्नी) होतील (सकाळी लवकर उठून, दळण, जलभरण, झाड-लोट आदी कामें उरकतील) तर त्या आपल्या पतीला प्रसन्न ठेवतील आणि पुत्रपौत्रादीसह सदा आनंदी राहतील . ॥33॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top