Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 34/ मन्त्र 48
    ऋषिः - अगस्त्य ऋषिः देवता - मरुतो देवताः छन्दः - पङ्क्तिः स्वरः - पञ्चमः
    5

    ए॒ष व॒ स्तोमो॑ मरुतऽइ॒यं गीर्मा॑न्दा॒र्यस्य॑ मा॒न्यस्य॑ का॒रोः।एषा या॑सीष्ट त॒न्वे व॒यां वि॒द्यामे॒षं वृ॒जनं॑ जी॒रदा॑नुम्॥४८॥

    स्वर सहित पद पाठ

    ए॒षः। वः॒। स्तोमः॑। म॒रु॒तः॒। इ॒यम्। गीः। मा॒न्दा॒र्यस्य॑। मा॒न्यस्य॑। का॒रोः ॥ आ। इ॒षा। या॒सी॒ष्ट॒। त॒न्वे᳖। व॒याम्। वि॒द्याम॑। इ॒षम्। वृ॒जन॑म्। जी॒रदा॑नु॒मिति॑ जी॒रऽदा॑नुम् ॥४८ ॥


    स्वर रहित मन्त्र

    एष व स्तोमो मरुतऽइयङ्गीर्मान्दार्यस्य मान्यस्य कारोः । एषा यासीष्ट तन्वे वयाँविद्यामेषँवृजनठञ्जीरदानुम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    एषः। वः। स्तोमः। मरुतः। इयम्। गीः। मान्दार्यस्य। मान्यस्य। कारोः॥ आ। इषा। यासीष्ट। तन्वे। वयाम्। विद्याम। इषम्। वृजनम्। जीरदानुमिति जीरऽदानुम्॥४८॥

    यजुर्वेद - अध्याय » 34; मन्त्र » 48
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (मरुतः) मरणधर्मा मनुष्यानो, (मान्दार्यस्य) प्रशंसनीय कर्म करणार्‍या आणि उदारचेता (मान्यस्य) आणि सत्कार करण्यास जे पात्र आहेत, अशा (कारोः) परिश्रमी कारागीरांची आम्ही (सज्जनांनी केलेली) (एषः) ही (स्तोमः) प्रशंसा आणि (इयम्) ही (गीः) प्रिय वाणी (वः) तुम्हा सर्व सामान्यजनांसाठी उपयोगी व लाभकारिणी व्हावी, (अशी आमची कामना आहे) (समाजातील श्रेष्ठ लोकांनी शिल्पी, वैज्ञानिक, कलाकार आदीची प्रशंसा करून त्याना प्रोत्साहन दिले पाहिजे) तुम्ही सामान्यजन (इषा) इच्छापूर्तीसाठी वा अन्नप्राप्तीसाठी (वयाम्) तरूण व शक्तिवान लोकांच्या (तन्वे) शरीराच्या रक्षणासाठी (आ, यासीष्ट) आनंदित मनाने तयार रहात जा. आणि आम्ही (श्रेष्ठ विद्वज्जन (जीरदानुम्) उत्तम जीवन जगण्यासाठी (इषम्) उपयोगी ज्ञान आणि उत्तम भोजन प्राप्त करण्याचे यत्न करू तसेच (वृजनम्) दुःख निवारण करणारी शक्ती (विद्याम) तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी प्राप्त करू. ॥48॥

    भावार्थ - भावार्थ - मनुष्याचे कर्तव्य आहे की त्यांनी नेहमी प्रशंसनीय कर्में करावीत आणि शिल्पविद्या (तंत्रशास्त्र, विज्ञान, अभियांत्रिकी ज्ञान) जाणणार्‍या लोकांचा नेहमी सत्कार करावा. व त्यामागे त्यांच्यासाठी आणि स्वतःसाठी दीर्घायू, शक्ती आणि ऐश्‍वर्य प्राप्त करावे. ॥48॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top