Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 34/ मन्त्र 49
    ऋषिः - प्राजापत्यो यज्ञ ऋषिः देवता - ऋषयो देवताः छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    3

    स॒हस्तो॑माः स॒हच्छ॑न्दसऽआ॒वृतः॑ स॒हप्र॑मा॒ऽऋष॑यः स॒प्त दैव्याः॑।पूर्वे॑षां॒ पन्था॑मनु॒दृश्य॒ धीरा॑ऽअ॒न्वाले॑भिरे र॒थ्यो̫ न र॒श्मीन्॥४९॥

    स्वर सहित पद पाठ

    स॒हस्तो॑मा॒ इति॑ स॒हऽस्तो॑माः। स॒हछ॑न्दस॒ इति॑ स॒हऽछ॑न्दसः। आ॒वृत॒ इत्या॒ऽवृतः॑। स॒हप्र॑मा॒ इति॑ स॒हऽप्र॑माः। ऋष॑यः। स॒प्त। दैव्याः॑। पूर्वे॑षाम्। पन्था॑म्। अ॒नु॒दृश्येत्य॑नु॒ऽदृश्य॑। धीराः॑। अ॒न्वाले॑भिर॒ इत्य॑नु॒ऽआले॑भिरे॒। र॒थ्यः᳕। न। र॒श्मीन् ॥४९ ॥


    स्वर रहित मन्त्र

    सहस्तोमाः सहच्छन्दसऽआवृतः सहप्रमाऽऋषयः सप्त दैव्याः । पूर्वेषाम्पन्थामनुदृश्य धीराऽअन्वालेभिरे रथ्यो न रश्मीन् ॥


    स्वर रहित पद पाठ

    सहस्तोमा इति सहऽस्तोमाः। सहछन्दस इति सहऽछन्दसः। आवृत इत्याऽवृतः। सहप्रमा इति सहऽप्रमाः। ऋषयः। सप्त। दैव्याः। पूर्वेषाम्। पन्थाम्। अनुदृश्येत्यनुऽदृश्य। धीराः। अन्वालेभिर इत्यनुऽआलेभिरे। रथ्यः। न। रश्मीन्॥४९॥

    यजुर्वेद - अध्याय » 34; मन्त्र » 49
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ज्या प्रमाणे (सहस्तोमाः) ज्यांची सर्वजण स्तुती करतात अथवा जे शास्त्रांचे अध्ययन, स्तुती साथ-साथ करतात तसेच (सहछन्दसः) जे वेदांचे अध्ययन मिळून करतात वा जे मिळून सुख उपभोगतात, त्या (वेदादिशास्त्राला आणि योगी जनांनप्रमाणे तुम्हीही व्हा) तसेच जे (आवृतः) ब्रह्मचर्य धारण करीत विद्याध्ययन पूर्ण करून गुरूकुलाहून स्नातक होऊन आपल्या घरी परत येतात आणि (सहप्रमाः) ज्यांचे प्रमाण, विचार, मत सारखे असतात, ते (दैव्याः) उत्तम गुण, कर्म, स्वभावाचे ध्यानमग्न योगी आणि (ऋषयः) वेदशास्त्रज्ञाता विद्वज्जन (एकमेकास अनुकूल राहून इष्टध्येय प्राप्त करतात की (न) जसा (रथ्यः) एक सारथी (रश्मीन्) लगामाच्या साह्याने घोड्यांनी एका दिशेने गंतव्य स्थानाकडे नेतो, तद्वत ते योगी आणि विद्वान (पूर्वेषाम्) पूर्वज विद्वनांच्या (पन्थाम्) मार्गाला (अनु, दृश्य) अनुकूल व हितकारी मानून (अन्वालेभिरे) त्या मार्गावर चालतात, त्याप्रमाणे हे मनुष्यानो, तुम्हीही त्या आप्तजनांच्या मार्गाचे अनुसरण करा. ॥49॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात उपमा व वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जे लोक राग, द्वेष आदी दोषांना दूर ठेवतात आणि आपसात प्रेमाने राहतात, ब्रह्मचर्य पूर्वक धर्मानुष्ठान करीत, वेदाभ्यास करीत, सत्य-असत्याचा निर्णय करीत केवळ सत्याचाच स्वीकार करतात आणि असत्याचा त्याग करून आप्त पुरूषांनी सांगितल्याप्रमाणे वागतात, ते लोक, जसा एक सारथी घोड्यांना, तद्वत अभीष्ट मार्गाचा अवलंब करू शकतात. त्याच लोकांना ऋषी म्हटले पाहिजे. ॥49॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top