Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 1/ मन्त्र 10
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः देवता - सविता देवता छन्दः - भूरिक् बृहती, स्वरः - मध्यमः
    5

    दे॒वस्य॑ त्वा सवि॒तुः प्र॑स॒वेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पू॒ष्णो हस्ता॑भ्याम्। अ॒ग्नये॒ जुष्टं॑ गृह्णाम्य॒ग्नीषोमा॑भ्यां॒ जुष्टं॑ गृह्णामि॥१०॥

    स्वर सहित पद पाठ

    दे॒वस्य॑। त्वा॒। सवि॒तुः। प्र॒स॒व इति॑ प्रऽस॒वे। अ॒श्विनोः॑। बा॒हुभ्या॒मिति॑ बा॒हुभ्या॑म्। पू॒ष्णः। हस्ता॑भ्याम्। अ॒ग्नये॑। जुष्ट॑म्। गृ॒ह्णा॒मि॒। अ॒ग्नीषोमा॑भ्याम्। जुष्ट॑म्। गृ॒ह्णा॒मि॒ ॥१०॥


    स्वर रहित मन्त्र

    देवस्य त्वा सवितुः प्रसवेऽश्विनोर्बाहुभ्यां पूष्णो हस्ताभ्याम् । अग्नये जुष्टङ्गृह्णागृह्णाम्यग्नीषोमाभ्यां जुष्टङ्गृह्णामि ॥


    स्वर रहित पद पाठ

    देवस्य। त्वा। सवितुः। प्रसव इति प्रऽसवे। अश्विनोः। बाहुभ्यामिति बाहुभ्याम्। पूष्णः। हस्ताभ्याम्। अग्नये। जुष्टम्। गृह्णामि। अग्नीषोमाभ्याम्। जुष्टम्। गृह्णामि॥१०॥

    यजुर्वेद - अध्याय » 1; मन्त्र » 10
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - जो (सवितुः) सर्व जगाचा उत्पत्तिकर्ता आणि सर्व ऐश्‍वर्याचा दाता आहे (देवस्य) जगास प्रकाशित करणारा आणि सर्वांसाठी सुखकारक आहे, अशा त्या परमेश्‍वराने उत्पन्न केलेल्या या संसारामधे (अश्‍विनोः) सूर्याच्या आणि चंद्राच्या (बाहुभ्यां) शक्ती-सामर्थ्याचा मी स्वीकार करतो. यापासून लाभ घेतो (पूष्णः) सर्वांना पुष्टि देणार्‍या प्राणांच्या (हस्ताभ्यां) ग्रहणाने आणि त्यागाने (अग्नेय) अग्निविद्येच्या विद्धतेसाठी (जुप्टं) विद्यावान् लोकांद्वारे सेवित अशा कर्माचा मी स्वीकार करतो (सर्वस्वी प्रयत्न करून अग्निविद्ये पासून आविष्कार व उन्नती करून त्याचे लाभ प्राप्त करतो) (अग्निषोमाभ्यां) अग्नी आणि जल यांच्यापासून शोध, शक्ती व तंत्रविद्या प्राप्त करून (जुष्टं) विद्वान् जन ज्या प्रकारच्या कर्मांची इच्छा करतात, मी त्या तंत्राचा आणि त्यापासून मिळणार्‍या फळाची म्हणजे लाभाची (गृह्णामी) प्राप्ती करून देतो. ॥10॥

    भावार्थ - भावार्थ - बुद्धिमान् विवेकी जनांकरिता हेच करणे उचित आहे की त्यानी विद्वज्जनांची संगती धरावी. तसेच स्वतः उत्तम पुरुषार्थ करून परमेश्‍वराने निर्माण केलेल्या प्रत्यक्ष सृष्टीचा प्रसार व उपयोग करावा म्हणजे संपूर्ण विद्यांच्या प्राप्तीकरता सूर्य, चंद्र, अग्नी आणि जल आदी पदार्थाच्या गुणादींचे ज्ञान प्राप्त करून सर्वाच्या शक्ती-सामर्थ्याच्यासाठी त्याचा वापर करावा. विद्यांचे अध्ययन आणि विकास करून त्यांचा प्रचार करावा म्हणजे ज्याप्रमाणे जगदीश्‍वराने सर्व पदार्थांची उत्पत्ति केली आहे व त्या पदार्थाचे धारण करून जो सार्‍या जगावर उपकार करीत आहे, त्याप्रमाणे आम्हा सर्वांनी देखील सर्वांच्या हितासाठी नित्य प्रयत्नशील राहावे. ॥10॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top