Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 1/ मन्त्र 27
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः देवता - यज्ञो देवता छन्दः - ब्राह्मी त्रिष्टुप्, स्वरः - धैवतः
    7

    गा॒य॒त्रेण त्वा॒ छन्द॑सा॒ परि॑गृह्णामि॒ त्रैष्टु॑भेन त्वा॒ छन्द॑सा॒ परि॑गृह्णामि॒ जाग॑तेन त्वा॒ छन्द॑सा॒ परि॑गृह्णामि॒। सु॒क्ष्मा चासि॑ शि॒वा चा॑सि स्यो॒ना चासि॑ सु॒षदा॑ चा॒स्यू॑र्ज॑स्वती॒ चासि॒ पय॑स्वती च॥२७॥

    स्वर सहित पद पाठ

    गा॒य॒त्रेण॑। त्वा॒। छन्द॑सा। परि॑। गृ॒ह्णा॒मि॒। त्रैष्टु॑भेन। त्रैस्तु॑भे॒नेति॒ त्रैस्तु॑भेन। त्वा॒। छन्द॑सा। परि॑। गृ॒ह्णा॒मि॒। जाग॑तेन। त्वा॒। छन्द॑सा। परि॑। गृ॒ह्णा॒मि॒। सु॒क्ष्मा। च॒। असि॑। शि॒वा। च॒। अ॒सि॒। स्यो॒ना। च॒। असि॑। सु॒षदा॑। सु॒सदेति॑ सु॒ऽसदा॑। च॒। अ॒सि॒। ऊर्ज॑स्वती। च॒। असि॑। पय॑स्वती। च॒ ॥२७॥


    स्वर रहित मन्त्र

    गायत्रेण त्वा छन्दसा परिगृह्णामि त्रैष्टुभेन त्वा छन्दसा परिगृह्णामि जगतेन त्वा छन्दसा परि गृह्णामि । सुक्ष्मा चासि शिवा चासि स्योना चासि सुषदा चास्यूर्जस्वती चासि पयस्वती च ॥


    स्वर रहित पद पाठ

    गायत्रेण। त्वा। छन्दसा। परि। गृह्णामि। त्रैष्टुभेन। त्रैस्तुभेनेति त्रैस्तुभेन। त्वा। छन्दसा। परि। गृह्णामि। जागतेन। त्वा। छन्दसा। परि। गृह्णामि। सुक्ष्मा। च। असि। शिवा। च। असि। स्योना। च। असि। सुषदा। सुसदेति सुऽसदा। च। असि। ऊर्जस्वती। च। असि। पयस्वती। च॥२७॥

    यजुर्वेद - अध्याय » 1; मन्त्र » 27
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - ज्या यज्ञामुळे ही (सुक्ष्मा) पृथिवी) उत्तम पदार्थांनी सुशोभित (असि) आहे (च) ज्या यज्ञामुळे सुखकारक गुणांची उत्पत्ती होते (च) तसेच ज्यामुळे ही भूमी मनुष्यासाठी (शिवा) मंगल कारिणी (असि) आहे, तसेच ज्या यज्ञामुळे ही पृथिवी उत्तमोत्तम सुख देणारी (स्योना) सुख उत्पन्न करणारी (असि) होते (च) आणि ज्यामुळे उत्तम सुख देत देत मनुष्यांना गति-गमन करण्याची सोय देते आणि ज्यामुळे (सुषदा) पृथिवी आनंदपूर्वक निवास करण्याची योग्य (असि) अशी झाली आहे, तसेच उत्तम यव आदी अन्ना (उर्जस्वती) ही पृथिवी अन्नदायिनी (अयि) होते (च) आणखीही ज्यामुळे ही भूमी उत्तम मधुररसपूरित फळें देणारी व (पयस्वती) प्रशंसनीय रस देणारी (असि) होते, मी यज्ञविद्येचा ज्ञाता, तुला त्या महोपकारी यज्ञाशी (गायत्रेण) गायत्री नामक (छन्दसा) हृदयास प्रसन्नता देणार्‍या छंदाशी तुला (परिगृह्णामि) संयुक्त करीत आहे. (यज्ञाकरिता तुला गायत्री छंदाचा प्रयोग करण्यास सांगत आहे) तसेच (त्रैष्टुभेन) त्रिष्टुभ्) (छन्दसा) स्वतंत्रपणे आनन्ददायी अशा छंदाचा उच्चार करून (त्वा) तुझ्यासाठी पदार्थ समूहाची (परिगृह्णामि) मी योग्य प्रकारे सिद्धता करीत आहे. तसेच मी (जागतेन) जगती नामक (छन्दसा) अत्यंत आनंददायी अशा छंदाद्वारे (त्वा) तुझ्यासाठी त्या भौतिक अग्नीचा (परिगृह्णामि) चांगल्याप्रकारे स्वीकार करीत आहे. ॥27॥

    भावार्थ - भावार्थ - वेदांचा प्रकाश करणारा परमेश्‍वर आम्हांस सांगत आहे की हे मनुष्यांनो, तुम्ही वेदमंत्रांचे पठण केल्याशिवाय आणि त्या मंत्राचा अर्थ जाणल्याशिवाय यज्ञाचे अनुष्ठान करूं नये, कारण की त्याशिवाय वेदमंत्रांचा सुखरूप लाभ तुम्हांस प्राप्त होणार नाही. तसेच यज्ञाशिवाय तुम्ही शुभ गुणकारी अन्न, जल आणि वायू आदी जे पदार्थ आहेत, त्यांची शुद्धता करू शकत नाही. यामुळे तीन प्रकारच्या यज्ञाचे अनुष्ठान करावे, यत्नाने सर्व आवश्यक ती सिद्धता करावी आणि सदा सुखी राहावे. त्याचप्रमाणे या पृथ्वीवर वायु, जल आणि ओषधीनां दूषित करणारे, दुर्गंध, दोष उत्पन्न करणारे पदार्थ तसेच अपगुण निर्माण करणारे दुष्ट मनुष्य आहेत, त्यांचे सदा सर्वदा निवारण करावे. ॥27॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top