Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 1/ मन्त्र 28
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः देवता - यज्ञो देवता छन्दः - विराट् ब्राह्मी पङ्क्ति, स्वरः - पञ्चमः
    6

    पु॒रा क्रू॒रस्य॑ वि॒सृपो॑ विरप्शिन्नुदा॒दाय॑ पृथि॒वीं जी॒वदा॑नुम्। यामैर॑यँश्च॒न्द्रम॑सि स्व॒धाभि॒स्तामु॒ धीरा॑सोऽअनु॒दिश्य॑ यजन्ते।

    स्वर सहित पद पाठ

    पु॒रा। क्रूरस्य॑। वि॒सृप॒ इति वि॒ऽसृपः॑। वि॒र॒प्शि॒न्निति॑ विऽरप्शिन्। उ॒दा॒दायेत्यु॑त्ऽआ॒दाय॑। पृ॒थि॒वीम्। जी॒वदा॑नु॒मिति॑ जी॒वऽदा॑नुम्। याम्। ऐर॑यन्। च॒न्द्रम॑सि। स्व॒धाभिः॑। ताम्। ऊँ॒ इत्यूँ॑। धीरा॑सः। अ॒नु॒दिश्येत्य॑नु॒ऽदिश्य॑। य॒ज॒न्ते॒। प्रोक्ष॑णी॒रिति॑ प्र॒ऽउक्ष॑णीः। आ। सा॒द॒य॒। द्वि॒ष॒तः। व॒धः अ॒सि॒ ॥२८॥


    स्वर रहित मन्त्र

    पुरा क्रूरस्य विसृपो विरप्शिन्नुदादाय पृथिवीञ्जीवदानुम् । यामैरयँश्चन्द्रमसि स्वधाभिस्तामु धीरासोऽअनुदिश्य यजन्ते । प्रोक्षणीरा सादय द्विषतो बधो सि ॥


    स्वर रहित पद पाठ

    पुरा। क्रूरस्य। विसृप इति विऽसृपः। विरप्शिन्निति विऽरप्शिन्। उदादायेत्युत्ऽआदाय। पृथिवीम्। जीवदानुमिति जीवऽदानुम्। याम्। ऐरयन्। चन्द्रमसि। स्वधाभिः। ताम्। ऊँ इत्यूँ। धीरासः। अनुदिश्येत्यनुऽदिश्य। यजन्ते। प्रोक्षणीरिति प्रऽउक्षणीः। आ। सादय। द्विषतः। वधः असि॥२८॥

    यजुर्वेद - अध्याय » 1; मन्त्र » 28
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (वीरप्शिन्) महान् उदार, महागुणवान्) जगदीश्‍वरा, तूच (यां) ज्या (स्वाधामिः) अन्न आदी पदार्थांनी युक्त आणि (जीवदानुम्) सर्व प्राण्यांना प्राणशक्ती देणार्‍या पदार्थांनी युक्त (पृथिवीम्) पुष्कळ प्रजायुक्त अशा पृथिवीला (उदादाय) वरच्या दिशेला उचलून (चन्द्रमसि) चन्द्राच्या जवळ स्थापित केले आहेस. त्यामुळे (धीरासः) धैर्यवान, स्थिरमती मनुष्य, तुझ्या आदेशांचे पालन करीत या पृथ्वीवर यज्ञाचे अनुष्ठान करतात (अथवा दुसरा अर्थ -) (चन्द्रमसि) आनन्दाने परिपूर्ण होऊन, प्रसन्न मनाने (धीरासः) बुद्धिमान पुरुष (यां) ज्या (जीवदानुं) जीवांची हितकारिणी या (पृथिवीं) पृथ्वीचे (अनुदिश्य) अनुकूल राहून सैन्याच्या आणि शस्त्रांच्या (उदावाय) मदतीने (निसृपः) वीर पुरुषांच्या पराक्रमाचे दर्शन घडविणार्‍या युद्धात (क्रूरस्य) शत्रूंच्या शरीरास विदीर्ण करणार्‍या संग्रामामधे शत्रूंवर विजय मिळवून (ऐयन्) राज्य प्राप्त करतात, तसेंच ज्याप्रमाणे वीर पुरुष (पुरा) पूर्वीच्या काळांत ज्या ज्यां क्रियांमुळे (प्रोक्षणीः) पदार्थांचे उत्तम प्रकारे सिंचन करून त्यांना (आसादाय) प्राप्त करीत आले आहेत, त्याप्रमाणे (विरीशन्) थोर ऐश्‍वर्याची इच्छा बाळगणार्‍या हे माणसा, तू देखील त्या क्रियांद्वारे ईश्‍वराचे पूजन आणि पदार्थांची प्रपात करून देणाऱ्या उत्तमोत्तम कर्माचे अवलंब न करीत जा. ज्यायोगे (द्विषतः) शत्रूंचा (वधः) नाश (असि) होईल अशा क्रिया आणि कर्मांचे आचरण करून नित्य आनन्दात मग्न राहा.

    भावार्थ - भावार्थ - ज्या ईश्‍वराने अंतरिक्षामधे नियम आणि क्रमानुसार पृथिवीची स्थापना केली आहे, पृथिवीच्या जवळ चन्द्रलोकाची आणि चंद्रलोकाजवळ पृथ्वीची स्थापना केली आहे, तसेच एकमेकाच्या जवळ अनेक ताराग्रहांची स्थापना आणि सर्वांच्या मध्यभागी अनेक सूर्यलोकांची स्थापना केली आहे. तसेच या सर्व तारा-ग्रहांमधे नानाविध प्रजेचे निर्माण केले आहे, तोच परमेश्‍वर सर्व मनुष्यांसाठी एकमेव उपास्य देव आहे. मनुष्यगण जोपर्यंत शक्ती आणि युक्ति-क्रियांदींनी युक्त होऊ व शत्रूंना पराभूत करीत नाहींत, तोपर्यंत राज्यसुखापासून वंचितच रहावे लागते. कारण असे की युद्ध आणि शक्ती प्रयोगाविना शत्रू भय मानीत नाहीं, भयभीत होत नाहीं,तसेच युद्ध आणि शक्तिसामर्थ्याशिवाय विद्वानजन विद्या आणि न्यायाचे पालन करू व करवू शकत नाहीत, न्याय आणि विनयाच्या अभावात प्रजेचे पालन करणे केवळ अशक्य आहे. याकरिता सर्वांनी जितेन्द्रिय राहून वर वर्णित पदार्थांची उपलब्धी करून सर्वांना सुखी करण्यासाठी सतत प्रयत्नशील असायला पाहिजे. ॥28॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top