Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 1/ मन्त्र 3
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः देवता - सविता देवता छन्दः - भुरिक् जगती, स्वरः - निषादः
    7

    वसोः॑ प॒वित्र॑मसि श॒तधा॑रं॒ वसोः॑ प॒वित्र॑मसि स॒हस्र॑धारम्। दे॒वस्त्वा॑ सवि॒ता पु॑नातु॒ वसोः॑ प॒वित्रे॑ण श॒तधा॑रेण सु॒प्वा काम॑धुक्षः॥३॥

    स्वर सहित पद पाठ

    वसोः॑। प॒वित्र॑म्। अ॒सि॒। श॒तधा॑र॒मिति॑ श॒तऽधा॑रम्। वसोः॑। प॒वित्र॑म्। अ॒सि॒। स॒हस्र॑धार॒मिति॑ स॒हस्र॑ऽधारम्। दे॒वः। त्वाः॒। स॒वि॒ता। पु॒ना॒तु॒। वसोः॑। प॒वित्रे॑ण। श॒तधा॑रे॒णेति॑ श॒तऽधा॑रेण। सु॒प्वेति॑ सु॒ऽप्वा᳕। काम्। अ॒धु॒क्षः॒ ॥३॥


    स्वर रहित मन्त्र

    वसोः पवित्रमसि शतधारं वसोः पवित्रमसि सहस्रधारम् । देवस्त्वा सविता पुनातु वसोः पवित्रेण शतधारेण सुप्वा कामधुक्षः ॥


    स्वर रहित पद पाठ

    वसोः। पवित्रं। असि। शतधारमिति शतऽधारम्। वसोः। पवित्रं। असि। सहस्रधारमिति सहस्रऽधारम्। देवः। त्वाः। सविता। पुनातु। वसोः। पवित्रेण। शतधारेणेति शतऽधारेण। सुप्वेति सुऽप्वा। काम्। अधुक्षः॥३॥

    यजुर्वेद - अध्याय » 1; मन्त्र » 3
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (वसोः) यज्ञ (शतधारम्) असंख्य, अपरिमित अशा जगाचे धारण करणारा आहे आणि (पवित्रम्) एक शुद्धिकारक कर्म (असि) आहे. (वसोः) यज्ञ (सहस्रधारम्) अनेकानेक ब्रह्मांडांना धारण करणारा व (पवित्रम्) शुद्धिचे कारण आहे आणि सुखदायक आहे. (त्वा) त्यायज्ञास (देवः) स्वतः प्रकाशस्वरूप असा (सविता) वसु आदी तेहतीस देवांची उत्पत्ती करणारा परमेश्‍वर (पुनातु) यज्ञास पवित्र करो. हे जगदीश्‍वरा, आम्हां सर्वांकडून ज्या यज्ञाचे अनुष्ठान केले जात आहे, त्या (वसो।) यज्ञाद्वारे (पवित्रेण) वायुमंडळाची (वातावरणाची) शुद्धी करण्याकरिता, वेदातील विज्ञानाने (शतधारेण) आणि अनेक विद्या धारण करणार्‍या वेदाला (सुप्वा) उत्तम प्रकारे पवित्र करणार्‍या या यज्ञाला पवित्र कर हे विद्यावान् पुरुष, किंवा हे जिज्ञासू मनुष्य, तू (काम्) वेदातील श्रेष्ठ वाणी पैकी कोणत्या वाणीच्या अर्थाला (अधुक्षः) करण्याची मनीषा बाळगून आहेस? किंवा कोणत्या वाणीचा अर्थाला जाणण्याची इच्छा बाळगतोस? ॥3॥

    भावार्थ - भावार्थ - जी माणसे यज्ञाचे अनुष्ठान करून पवित्र होतात, जगदीश्‍वर त्यांना पुष्कळ ज्ञान देतो आणि अनेकविध सुख देतो. जे लोक अशा प्रकारचे याज्ञिक कर्म करणारे आहेत किंवा जे परोपकारी आहेत, त्यांनाच सुखाची प्राप्ती होते. आलस्य करणाऱ्यांना कधीच नाहीं. या मंत्रात (कामधुक्षः) (काम+अधुक्षः) या शब्दाने वाणीविषयी प्रश्‍न विचारला आहे. ॥3॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top